संघाने भारताबाहेर हिंदुत्वाचं जाळं पसरवलं आणि हिंदुत्वाची परफेक्ट इकोसिस्टिम उभी राहिली

हिंदू मुस्लिम वादाचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचला आहे. इंग्लंडमधून हिंदू मुस्लिम समाजातील तणावाच्या बातम्या येत आहेत. बातमे जरी बाहरेची असेल तर याचं कारण मात्र आपल्या इथल्यासारखंच आहे. २८ ऑगस्टला झालेल्या भारत-पाकिस्तान मॅचनंतर इंग्लडमधल्या या लेस्टर शहारत तणाव निर्माण झाला. लेस्टर हे ब्रिटनमधील असं शहर आहे जिथं आशियायी वंशाची लोकसंख्या इंग्लिश वंशीयांपेक्षा जास्त आहे. त्यानंतर या वादाचं लोण बर्मिंगहॅममध्ये पसरलं जिथं मुस्लिमांची लोकसंख्या सर्वाधिक आहे.

इस्लामिक कट्टरतावादी आणि हिंदुत्ववादी हिंदू यांच्यामुळे हा तणाव निर्माण झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

गार्डियन वृत्तपत्राने तर कट्टर राष्ट्रवादी हिंदुत्व विचारधारेच्या लोकांना या हिंसेसाठी जबाबदार ठरवलं आहे. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटना हिंदू राष्ट्रवादाचा प्रसार करत आहेत हे सविस्तर सांगणारं एक्सप्लेनर्स गार्डियनमध्ये छापून आली आहेत.

मग अशावेळी प्रश्न आहे तो म्हणजे संघाची आणि पर्यायाने भाजपाची मुख्य विचारधारा असलेले हिंदुत्वाचे विचार भारताबाहेर कसे पसरत गेले?

२०१४ मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर त्यांनी भारताबाहेर मोठे इव्हेंट घेऊन पक्ष जाणीव पक्षाच्या विचारधारा मानणाऱ्या अनिवासीत भारतीय आणि भारतीय  वंशाच्या नागरिकांना एकत्र करत असल्याचं पर्यटन केलेलं दिसतात. विशेषतः अमेरिकेत मोदी यांनी घेतलेले असे मेळावे चांगलेच चर्चेत राहिले.

2019 मध्ये जेव्हा मोदींनी अमेरिकेला भेट दिली होती  तेव्हा टेक्सासमध्ये त्यांच्या समर्थकांनी “हाऊडी मोदी” कार्यक्रम आयोजित केला होता. ज्यामध्ये तत्कालीन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि 50,000 समर्थक उपस्थित होते. भाजपाच्या वाढत्या पाठिंब्याबरोबरच हिंदुत्व ग्रुप आणि चॅरिटीममध्ये देखील वाढ होत गेली आणि यामुळे हिंदुत्व विचारांची इकोसिस्टिम विदेशातही स्ट्रॉंग झाली असं जाणकार सांगतात.

मात्र हिंदुत्व विचारांचं जाळं विदेशात पसरवायला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने याआधीच सुरवात केली होती. पॅन हिंदू युनिफिकेशन म्हणजेच जगभरातल्या सर्व हिंदूंना एकत्र करण्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योजेनेचा हा भाग होता. त्यामुळेच भारतातून गेलेल्या स्थलांतरित स्वयंसेवकांनी 1947 मध्ये केनिया आणि म्यानमारमध्ये प्रथम संघाच्या परदेशी शाखा सुरू केल्या होत्या. 

1953 च्या सुरुवातीला सरसंघचालक गोळवलकर यांनी प्रचारकांना दिलेल्या व्याख्यानात परदेशातील हिंदूंना जगभरामध्ये ”वसुधैव कुटुंबकम” हा हिंदू धर्माचा मेसेज पोहचवण्याचं आवाहन केलं होतं.  

पॉलिटिकल साइण्टिस्ट बेनेडिक्ट अँडरसन परदेशात राहून हिंदू राष्ट्रवादाचा प्रचार करण्याला ” लॉन्ग डिस्टन्स नॅशन्यालिझम” असं नाव देतात. परदेशात गेलेल्या भारतीयांमध्ये मायभूमीला सोडून राहावं लागत असल्याने अपराधी भावना असते. मग अशा हिंदूंना इकडे मायदेशातील कामांसाठी निधी जमा  करणे, स्वयंसेवी कामे करणे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वापरलं जात असल्याचं अँडरसन सांगतात.

या कामात संघाचा राष्ट्रवादी संदेश, मायभूमीची आठवण आणि आणि मागे राहिलेल्या नातेवाईकांशी कनेक्ट होणं हे फॅक्टर यामध्ये महत्वाचा रोल प्ले करत असल्याचं दिसून येतं.

जरी हिंदुत्वाच्या मुद्यावरून एकत्र येत असले तरी या ग्रुप्सकडून मोठ्या प्रमाणात सामाजिक कामं देखील केलं जातात. सामाजिक कामं करतां इतर परदेशातील भारतीयांशी संबंध वाढतात त्यामुळे परदेशात ओळख हरवलेल्या भारतीयांना आपली एक कम्युनिटी बनवता येते आणि त्या कम्युनिटीमध्ये सामाजिक कामांच्या जीवावर ढिंग देखील मिरवता येते.

संघानं बरोबर हेच हेरल्याचं जाणकार सांगतात. परदेशातल्या या हिंदुत्ववादी ग्रुप कढुन 1978 आंध्र चक्रीवादळ, गुजरातमध्ये जानेवारी 2001 चा भूकंप, डिसेंबर 2004 मध्ये दक्षिण-पूर्व किनारपट्टीवरील सुनामी, हिमालयाच्या पायथ्याशी 2015 मध्ये आलेला पूर  या भारतातल्या नैसर्गिक आपत्तीच्या दरम्यान भरभरून मदत केली होती. 

मात्र इतके दिवस सामाजिक काम करणारे हे परदेशातील हिंदुत्व गट राजकीय कामांत गुंतले ते 2013-14 च्या दरम्यान.  

 2013-14 मध्ये नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या मैदानात आपली दावेदारी जाहीर केली होती. दहा वर्षांनंतर भाजपाला आपलं सरकार सत्तेत आणायचं होतं. त्यावेळी मोदींच्या कॅम्पेनमध्ये या ग्रुप्समधील अनेक आयटी एक्स्पर्ट खास भारतात येऊन प्रचार करत होते. नरेंद्र मोदी यांचा जो सोशल मीडिया आणि इतर साधनांच्या माध्यमातून जो टेकसॅव्ही प्रचार झाला होता याचे श्रेय याच  परदेशी प्रचरकांना देण्यात आलं होतं.

संघाच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या गटांची उपस्थिती अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशात मजबूत आहेत. त्या प्रत्येक देशात हिंदू स्वयंसेवक संघ या बॅनरखाली एकत्रित येतात. उदाहरणार्थ अमेरिकेतली हिंदू स्वयंसेवक संघ अमेरिका या नावाखाली तिथले हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्रित येतात. त्यांची देखील भारताच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखी शाखा भरते. तसेच महिलांसाठी भारतातल्या संघासारखीच हिंदू सेविका संघ नावाची वेगळी संघटना देखील असते. 

या प्रगत देशांमध्ये असलेल्या आधुनिक विचार हि काही प्रमाणात या संघटनांमध्ये उतरलेले दिसतात. 

उदाहरणार्थ अमेरिकेत हिंदू स्वयंसेवक संघामध्ये महिला देखील पूर्णवेळ कार्यकर्त्या बनू शकतात. प्रत्येक देशात हिंदू स्वयंसेवक संघ ऑटोनॉमस असल्याचं सांगितलं जातं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सगळ्यांचं कॉर्डीनेशन करतं. अनेकदा हिंदू स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं नागपूरला प्रशिक्षण शिबीर देखील घेतलं जातं अशी माहिती वॉल्टर अँडरसन यांच्या The RSS -a view to the inside या पुस्तकात मिळते. 

थोडक्यात सांगायचं तर भारताबाहेरसुद्धा हिंदुत्व विचारधारेची इकोसिस्टिम उभी करण्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यश आलं असून त्यासाठी संघाने अनेकवर्षे संघटात्मक काम केल्याचं दिसतं.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.