इलॉन मस्कच्या स्पेसएक्स प्रमाणे अंतराळ गाजवू शकणारे स्टार्टअप भारतात पण आहेत….

इलॉन मस्कने एका रात्रीत ३ लाख २९ हजार ३६ कोटी रुपये देवून ट्विटर विकत घेतलं आणि भाऊंच्या कार्याची एकच चर्चा व्हायला लागली. याआधी इलॉन मस्कच्या टेस्ला, न्यूरोलिंक, स्पेस एक्स, द बोरिंग कंपनी या कंपन्या होत्याच आणि त्यात आता ट्विटरची भर पडली.

या सगळ्या कंपन्या एक से बढकर एक. याच कंपन्यांच्या जीवावर जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस असलेला मस्क आज जगातला सगळ्यात जास्त चर्चेत असलेला माणूसही झाला आहे. पण इथपर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास तितका सोपा नव्हता.

एवढं सगळं एम्पायर उभं करताना २००८ मध्ये मस्क चांगलाच गंडला होता.

 

त्यानं त्याची पे-पाल ही कंपनी विकून त्यातनं आलेले पैसे स्पेस एक्स आणि टेस्ला या कंपन्यांवर लावले होते. मात्र या दोन कंपन्या म्हणाव्या तशा प्रगती करत नव्हत्या. टेस्लाच्या सुरवातीच्या रोडस्टर मॉडेलवर तो पाण्यासारखा पैसा ओतत होता पण फायनल मॉडेल काय बनत नव्हतं.

२००९ ते २००८ दरम्यान स्पेस एक्स कंपनी देखील खडतर पॅचमधून जात होती. कंपनीचं फ्लॅगशिप प्रॉडक्ट असलेल्या ‘फाल्कन १’ रॉकेटची पहिली तिन्ही प्रक्षेपण अयशस्वी झाली होती.

सप्टेंबर २००८ मध्ये चौथे प्रक्षेपण यशस्वी झाले होते, पण तरीही कंपनी २००८ च्या उत्तरार्धात दिवाळखोर होण्याच्या मार्गावर होती. स्पेस एक्सकडं कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठी देखील पुरेसे पैसे नव्हते.

मात्र त्याचवेळी इलॉन मस्कला एक कॉल आला.

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासा मधून तो कॉल आला होता.

नासानं इलॉन मस्कच्या कंपनीला १.५ बिलिअन डॉलरचं काम दिलं होतं. या काँट्रॅक्टमुळं मस्क दिवाळखोर होता होता वाचला होता.त्यानंतर मग मस्कनं कधी मागं वळून पाहिलंच नाही आणि अगदी रॉकेटच्या स्पीडमध्ये तो जगातला सगळ स्पेस एक्सनं मस्कचं अक्ख एम्पायर तारलं होतं.

हे झालं अमेरिकेचं….

पण भारतात देखील स्पेस एक्स सारख्या अनेक प्रायव्हेट स्पेस कंपन्या पुढं आल्यात. पुढं आल्यात म्हणजे त्यांची स्पेस प्रॉडक्ट्स पण  स्पेस एक्ससारखीच उज्वल भविष्य असलेली आहेत.

मेन म्हणजे इस्रोच्या मदतीनं हे स्टार्टअप अगदी योग्य दिशेनं पाऊल टाकताना दिसतात. भारतानं स्पेस सेक्टर प्राव्हेट प्लेयर्ससाठी खुलं केल्यानंतर, हे स्टार्टअप्स उघडायला सुरवात झाली होती.

यापैकी अग्निकुल कॉसमॉस, स्कायरूट एरोस्पेस, बेलाट्रीक्स एरोस्पेस

अशा स्टार्टअप्समध्ये भारताला इलॉन मस्क मिळेल असंच काम चालू आहे.

यापैकीचं प्रमुख स्टार्टअपची माहिती घेऊ…

१) अग्निकुल कॉसमॉस

कॉसमॉस IIT मद्रास मधील एक स्पेस टेक स्टार्टअप आहे. यांचा फोकस आहे कमी पे लोड वाहून नेण्याची क्षमता असलेले रॉकेट बनवण्याचा. कमी याच्यासाठी की जास्त लोड वाहून नेण्याची क्षमता असलेल्या रॉकेटमध्ये पूर्ण वजन भरेपर्यंत थांबावं लागतंय.

त्यामुळं कधी छोट्या वजनाचे सॅटेलाइट अर्जंटमध्ये पाठवायचं असल्यास प्रॉब्लेम होतोय.दुसरं म्हणजे इतके दिवस आपलं इस्रो जगात लहान लहान सॅटेलाइट पाठवण्यासाठी ओळखलं जायचं मात्र आता इस्रोला असली कामं सोडून रिसर्च आणि इतर प्रोजेक्टवर लक्ष द्यायचं आहे. त्यामुळे हे छोटे सॅटेलाइट लाँच करण्याचं मार्केट टॅप करण्याचा अग्निकुलचा प्लॅन असणारे.

त्यासाठी त्यांनी अग्निबाण हे रॉकेट बनवलं आहे.

प्लग-अँड-प्ले कॉन्फिगरेशन असलेलं हे रॉकेट 100 किलो पेलोड वाहून नेण्यास सक्षम आहे. ग्राहकांच्या गरजेनुसार परवडणाऱ्या किंमतीत सॅटेलाइट लॉन्चिंगची सेवा देण्याच्या दृष्टीने हे रॉकेट बनवण्यात आले आहेत.

त्याचबरोबर ट्रकवर रॉकेट लाँचपॅड बसवण्याचाही त्यांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे.त्यासाठी अग्निकुल कॉसमॉसनंइस्रो बरोबर एक ‘MOU’ देखील साइन केला आहे ज्यामुळं लाँचपॅड बनवण्यात, रॉकेट टेस्टिंग करण्यात इस्रोची जी एक्सपर्टीज आहे त्याचा त्यांना फायदा घेता येईल.

२) स्कायरूट एरोस्पेस

पवनकुमार चंदना, नागाभरत डाका या इस्रोमध्ये काम केलेल्या वैज्ञानिकांनी ही कंपनी काढली आहे. अवघ्या  २४ तासात असेम्बल करता येतील रॉकेट बनवण्याचा त्यांचा उद्देश आहे, भारताच्या स्पेस प्रोग्रॅमचे जनक विक्रम साराभाई यांच्या नावावरून या कंपनीने विक्रम-१, विक्रम-२ आणि विक्रम-३ हे रॉकेट्स बनवले आहेत.

त्यांचे हे रॉकेट या कॅटॅगरीतल्या इस्रोच्या रॉकेटपेक्षा पण भारी आहेत. ‘लो-अर्थ ऑर्बिट’मध्ये ३३० किलोपर्यंत पेलोड वाहून नेण्याची या रॉकेट्सची क्षमता आहे.

३) बेलाट्रिक्स एरोस्पेस

या तीन स्टार्टअप मधलं हे सगळ्यात जुनं स्टार्टअप आहे. कोणताही गाजावाजा न करता या कंपनीचं काम अतिशय सिक्रेट पद्धतीनं चालू असतं. मीडियामध्ये जेवढी माहिती लीक झाली आहे त्यानुसार या स्टार्टअपनं गरुडा आणि चेतक ही दोन रॉकेट बनवली आहेत. यात महत्वाचे म्हणजे रॉकेट्स एकदा सॅटेलाइट लाँच केल्यानंतर कामातून जात नाही तर त्यांचा पुनर्वापर करणं शक्य आहे मस्कच्या स्पेसेक्सच्या रॉकेट्सचाही असाच पुनर्वापर करण्यात येतो.

त्याचबरोबर इलेक्ट्रिक प्रोपेलसिव्ह सिस्टिमवर असलेलं रॉकेट बनवण्यावरही हे स्टार्टअप काम करत असल्याचं सांगण्यात येतं. रॉकेटला ‘थर्स्ट’ देण्यासाठी प्रोपेलसिव्ह सिस्टिम असते आणि जर ती इलेक्ट्रिक केली तर रॉकेटमधला इंधनाचा भार कमी होईल आणि रॉकेटची पे लोड वाहून नेण्याची क्षमता वाढेल.

अशा एक से बढकर एक आयडिया घेऊन हे स्टार्टअप काम करत आहेत. त्यामुळं जगभरात इस्रोचा जसा जलवा आहे तसाच या स्टार्टअप्सचाही असेल यात वाद नाही. यातूनच भारतालाही एलन मस्कच्या तोडीचा माणूस मिळेल आणि स्पेस एक्स सारखी कंपनी उभी राहील, अशी आशा करायला हरकत नाही.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.