डोनाल्ड ट्रम्पना राष्ट्राध्यक्षपदासाठी हे तीन भारतीय आव्हान देणारा आहेत
५ नोव्हेंबर २०२४ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. खरतर गेले काही महिने अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद डोनाल्ड ट्रम्प यांना झालेल्या अटकेनंतर जरा चर्चेत होतंच. पण आता अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद भारतीयांमध्ये जस्त चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे राष्ट्राध्यक्षाच्या पदासाठी तीन भारतीय वंशाचे उमेद्वार, आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निवडणुकीत उभे राहणार आहेत.
विवेक रामास्वामी, निक्की हेली आणि हर्षवर्धन सिंग अशी या तिघांची नाव आहेत. हे तीन उमेदवार आणि डोनाल्ड ट्रम्प यांना धरून एकूण १४ उमेदवार राष्ट्राध्याक्ष पदाच्या शर्यतीत शामिल आहेत.
राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक भले पुढच्या वर्षी होणार आहे पण रिपब्लिक आणि डेमोक्रेटिक या दोन पक्षांमध्ये या पदासाठीची शर्यत खूप आधी पासूनच सुरु होते. सध्या डोनाल्ड ट्रम्प यांना कायदेशीर आव्हानांचा सामना करावा लागत आहे. पण तरीही ते या शर्यतीत सगळ्यांच्या पुढे आहेत. असं असलं तरी विवेक रामास्वामी, निक्की हेली आणि हर्षवर्धन सिंग हे तिघेही डोनाल्ड ट्रम्प यांना तगडी टक्कर देत आहेत. हे तीन इंडो अमेरिकन उमेद्वार रिपब्लिक पक्षाकडून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत कसे शामिल झाले हे जाणून घेऊ.
सगळ्यात आधी जाणून घेऊ निक्की हेली यांच्या बद्दल निक्की हेली या रिपब्लिकन पक्षाच्या एकमेव महिला उमेदवारआहेत.
निक्की हेली यांचं मूळ नाव निम्रता रंधावा आहे. निक्की यांचे आई वडील अमेरिकेत गेले आणि तिथेच कॅरोलिनामध्ये स्थायिक झाले. निक्की हेली या ऑरेंजबर्ग प्रिपरेटरी स्कूल, इंक मधून पदवी घेतली आणि क्लेमसन विद्यापीठातून बॅचलर ऑफ अकाउंटिंगचं शिक्षण घेतलं. काही काळानंतर निम्रता म्हणजे निक्कीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि १९९६ मध्ये दक्षिण कॅरोलिना नॅशनल आर्मी गार्डमध्ये अधिकारी असलेल्या मायकल हेली नावाच्या अमेरीकन माणसाशी लग्न केलं. २००४ मध्ये निक्कीने कर कपात, इमिग्रेशन नियंत्रण आणि गर्भपात प्रतिबंध यांचा रिपब्लिकन पक्षासोबत प्रचार केला आणि राज्य प्रतिनिधींच्या सभागृहात एक जागा जिंकली. २००८ मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या.
त्यानंतर २०११ मध्ये निक्की हेली या साउथ कॅरोलिनाच्या गव्हर्नरपदी निवडून आल्या.
तेव्हा त्यांनी अमेरिकेच्या ११६व्या आणि पहिल्या महिला गव्हर्नर बनण्याचा मान मिळवला. त्यांच्या या कार्यकाळात साउथ कॅरोलिनामधल्या बेरोजगारीचा दर कमी झाला त्यामुळे साउथ कॅरोलिनाच्या अर्थव्यवस्थेत पण वाढ झाली. २०११ नंतर निक्की हेली या पुन्हा २०१४ ला साउथ कॅरोलिनाच्या गव्हर्नरपदी निवडून आल्या. अशाप्रकारे २०११ ते २०१७ पर्यंत त्यांनी साउथ कॅरोलिनच्या गव्हर्नरपदी काम केलं. त्यांनतर २०१७ मध्ये निक्की हेली यांची सिनेट मध्ये नियुक्ती झाली आणि त्यांनतर त्यांनी गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला.
त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात हॅली यांची संयुक्त राष्ट्रात अमेरिकेच्या राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या हाताखाली काम केलं असलं तरी त्या आता त्यांच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या त्या पहिल्या दावेदार होत्या, ज्यांनी अधिकृतपणे ट्रम्प यांना आव्हान देण्याचा दावा सादर केला होता. त्यांच्याशिवाय फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस, माजी राष्ट्राध्यक्ष माइक पेन्स, दक्षिण कॅरोलिनाचे यूएस सिनेटर टिम स्कॉट, न्यू हॅम्पशायरचे गव्हर्नर ख्रिस सुनुनू आणि अर्कान्सासचे माजी माजी गव्हर्नर आसा हचिन्सन हे देखील या शर्यतीत सामील झाले आहेत. आत्तापर्यंत निक्की हेली यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा कमी मतदान मिळाले आहे पण त्या सातत्याने देणग्या मिळवत आहेत. निक्की हेलीचा आतापर्यंतचा कार्यकाळ पाहता त्या अमेरिकेत वंश आणि लिंगाचे मुद्दे मांडत आहेत. त्यांना सुपर पीएसी, स्टँड फॉर अमेरिका फंड इंक सारख्या मोठ्या कंपनीकडून आणि केनेथ लँगोन, अॅलिस वॉल्टन आणि केनेथ फिशर यांसारख्या अब्जाधीशांकडून देणग्या मिळाल्या आहेत आणि २०२४ पर्यंत निक्की हेली डोनाल्ड ट्रम्प यांना मागे टाकतील अशी त्यांना खात्री आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या शर्यतीत पुढचं भारतीय वंशाचं नाव आहे, विवेक रामास्वामी.
रामास्वामी हे सुद्धा भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक आणि उद्योजक आहेत. निक्की हेली यांच्यानंतर विवेक रामास्वामी हे दुसरे इंडो-अमेरिकन आहेत, जे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत. विवेक रामास्वामी यांचा जन्म अमेरिकेतल्या ओहायो मध्ये सिनसिनाटी इथे झाला. त्यांचे आई-वडील केरळमधल्या पलक्कड इथून अमेरिकेला गेले होते. विवेक रामास्वामी यांनी हार्वर्ड कॉलेजमधून बायोलॉजी विषयात पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी येल विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण घेतलं. २०१४ मध्ये, विवेकने त्यांची फार्मा कंपनी रोइव्हंट सायन्सेस सुरू केली. विवेक रामास्वामी हे बायोफार्मा स्पेसमध्ये मायोव्हेंट सायन्सेस, युरोव्हेंट सायन्सेस, एंजिवेंट थेराप्यूटिक्स, अल्टाव्हेट सायन्सेस या इतर काही कंपन्यांचे संस्थापकही आहेत.
विवेक रामास्वामी यांनी बायोटेक क्षेत्रात त्यांचं नाव कमावलं आहे.
२०१५ मध्ये फोर्ब्स च्या कव्हरपेजवर देखील ते झळकले होते. फोर्ब्सच्या यादीनुसार २०१४ मध्ये विवेक रामास्वामी ३० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या श्रीमंतांच्या यादीत ३० व्या स्थानी होते. २०१६ मध्ये ४० पेक्षा कमी वय असलेल्या श्रीमंतांच्या यादीत ते २४ व्या स्थानी होते. नंतर २०२१ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश करण्यासाठी आपल्या कंपनीच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला. खरंतर विवेक आपल्या उत्कट भाषणासाठी अमेरिकन तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे.
रामास्वामी यांनी Woke, Inc: Inside Corporate America’s Social Justice Scam हे पुस्तक लिहिलं आहे.
यामध्ये अमेरिकेतल्या कंपन्यांपासून एनजीओपर्यंत पडद्यामागे सुरू असलेल्या कारवायांबद्दल लिहिण्यात आलं आहे. याशिवाय विवेक रामास्वामी यांनी नेशन्स ऑफ व्हिक्टिम्स: आयडेंटिटी पॉलिटिक्स, द डेथ ऑफ मेरिट आणि पाथ टू एक्सलन्स ही दोन पुस्तकंही लिहिली आहेत. राष्ट्राध्यक्षपदाची ही निवडणूक लढवण्यासाठी जो निधी लागणार आहे तो गोळा करण्यासाठी आणि त्यांच्या राजकीय कँपेनसाठी त्यांनी एक समिती स्थापन केली आहे. अमेरिकेतल्या आयोवा या राज्यात प्रचारसभा घेणार आहेत. तसच आमचा लढा हा विचारांवर आधारीत असेल असं रामास्वामी यांचं म्हणणं आहे.
भारतीय वंशातले हर्षवर्धन सिंग हे देखील अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत सामील झाले आहेत.
या शर्यतीत सहभागी झालेले ते तिसरे इंडो-अमेरिकन आहेत. तसच हर्षवर्धन सिंग हे रिपब्लिक पार्टीचे सगळ्यात जुने सदस्य आहेत. हर्षवर्धन सिंग यांनी पहिल्यांदा 2017 मध्ये न्यू जर्सीच्या गव्हर्नरच्या पदासाठी निवडणुकीत उभे राहिले होते. पण रिपब्लिकन पक्षाच्या अंतर्गत निवडणुका जिंकण्यातही ते अपयशी ठरले. यानंतर 2018 मध्ये त्यांनी लोकप्रतिनिधी सभागृहासाठी त्यांनी आपला दावा मांडला होता. पण त्र्य निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला. 2010 मध्ये हर्षवर्धन यांनी अमेरिकन सिनेटची म्हणजेच उच्च सभागृहाची निवडणूक लढवून नशीब आजमावलं, पण इथेही निराशाच झाली. यानंतर, 2021 मध्ये, त्यांनी पुन्हा एकदा न्यू जर्सीमधून गव्हर्नरची निवडणूक लढवली तेही ते जिंकू शकले नाहीत. थोडक्यात ते आजवर एकही निवडणूक जिंकू शकलेले नाहीत. त्यामुळे २०२४ च्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत त्यांचा कितपत निकाल लागतो हे पहावं लागेल.
रिपब्लिकन पुढच्या वर्षी त्यांच्या पक्षाच्या पुढच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराची औपचारिकपणे निवड करतील. २०२४ मध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन होणार असून त्यानंतर अंतिम नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. मिलवॉकी, विस्कॉन्सिन येथे होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीकडे अमेरिकेचे डोळे लागले आहेत आणि भारताचे सुद्धा डोळे लागले आहेत की, अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष हे भारतीय असतील कि नाही.
हे ही वाच भिडू :
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.