धारावी झोपडपट्टी आता स्लम टूरिझम…

भारत भेटीवर येणाऱ्या पर्यटकांना जगप्रसिद्ध ताजमहाल, अजंठा वेरूळ, कुतुबमिनार नेचर वॉक, किल्ले, महाल, हिल स्टेशन या सारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांचं जास्त आकर्षण वाटतं असेल असा तुमचा समज असेल तर ट्रीप अॅडव्हायझरने नुकत्याच केलेल्या सर्व्हेक्षणाने तुमचा अंदाज चुकीचा ठरला आहे.

या कंपनीने आशियातील टॉप टेन ट्रॅव्हलर चॉइस एक्स्पेरियन्ससाठी केलेल्या सर्व्हेक्षणात आशिया यादीत मुंबईतील धारावी झोपडपट्टी १० व्या क्रमांकावर असून तिने या जगातील सात आश्चर्यात सामील असलेल्या ताजमहालचा पत्ता कट केला आहे आणि ताजमहाल पेक्षाही आधिक कमाई ही या धारावी झोपडपट्टीची आहे.

मुंबईतली धारावी म्हणजे फक्त दुर्गंधी आणि गरीबीपुरती मर्यादित नाहीये आलंच असेल पण धारावी म्हणजे खरंच लय मोठा विषय ठरलाय तो स्लम टुरिजम मुळे…

धारावी झोपडपट्टीला हजारो लोक भेट देतात आणि या झोपडपट्टी पर्यटनाला म्हणजेच स्लम टुरीजमला लोकांची आधिक पसंती मिळत आहे. हे झोपडपट्टी पाहण्यासाठी विदेशी पर्यटक का येतात, हे स्लम टूरिझम काय? भारतात हे पोहचलं कसं? या सर्व प्रश्नाचीं उत्तरं आपण पाहूयात..

पहिल्यांदा पाहूयात विदेशी पर्यटक धारावीला भेट का देतात ?

झोपडपट्टी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहत ते म्हणजे घाणीचं साम्राज्य, भीक मागणारे लोकं आणि पत्र्याची किंव्हा छोट्या छोट्या झोपड्या आसणारे घरं. पण हे खरंच असं असतं का हे पाहण्यासाठी किंव्हा त्याचा अभ्यास करण्यासाठी हे विदेशी पर्यटक इथे येत असतात.

धारावी झोपडपट्टी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखली जाते.

मुंबईत आलेला विदेशी पर्यटक इथे भेट दिल्याशिवाय जातच नाही असं झोपड्डीत राहणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या महत्वाच्या आणि गरजू गोष्टी नसताना हे लोकं इथे कसे जगतात ? कसे राहतात ?हा अनुभव घेण्यासाठी हे लोकं इथे येत असतात.

२०१६ मध्ये मेलिसा निसबेट नावाच्या विदेशी पर्यटकाने धारावीचा ६ तास दौरा केला आणि त्यावर त्यांनी बोलताना असं सांगितलं की “आम्ही व्हिक्टोरियाच्या काळापासूनच्या झोपडपट्ट्यांना भेटी दिल्या. आधी मनोरंजन म्हणून आणि नंतर सामाजिक सुधारणेच्या हेतूने”.  त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर म्हणता येईल की जगभरातले पर्यटक हे इथल्या लोकांचं जीवन आणि राहणीमान या विषयी जाणून घेण्याच्या आणि आभ्यासाच्या दृष्टीकोनातून येतात. झोपडपट्टी पर्यटन वाढल्यापासुन धारावी झोपडपट्टी पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढलीय असं काही पर्यटकांनी सांगितलं आहे.

पण हे झोपडपट्टी पर्यटन नावाची कन्सेप्ट आहे तरी काय आणि याची सुरवात कधी झाली ?

ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरीने १८८४ मध्ये पहिल्यांदा ‘स्लमिंग’ म्हणजे झोपडपट्टी हा शब्द प्रकाशित केला होता. १८८४ पर्यंत न्यू यॉर्क शहरातील श्रीमंतं लोकांनी बोवेरी आणि लोअर ईस्ट फाइव्ह-पॉइंट डिस्ट्रिक्टला भेट देण्यास सुरुवात केली. जेथे गरीब स्थलांतरित समुदायतील लोकं राहत होते. हे लोकं कसे राहतात, काय करतात असा विचार त्यांनी केला.

त्या अगोदर १९८० मध्ये, दक्षिण आफ्रिकेतील कृष्णवर्णीय लोकांनी कृष्णवर्णीय लोकं कसे जगतात याबद्दल स्थानिक सरकारमधल्या ब्रटीश लोकांनां शिक्षित करण्यासाठी टाउनशिप टूर आयोजित केल्या. या दौर्‍याने जगभरातील पर्यटकांना आकर्षित केलं आणि ज्यांना वर्णभेदाबद्दल अधिक जाणून घ्यायचं होतं.

अशा लोकांनी १९९० मध्ये, त्याने विकसनशील जगाच्या सर्वात वंचित भागात, ज्यांना झोपडपट्ट्या देखील म्हणतात अशा ठिकाणांसह आंतरराष्ट्रीय टूर आयोजित करण्यास सुरुवात केली. त्याला नाव देण्यात आलं स्लिम टूरिझम म्हणजेच झोपडपट्टी पर्यटन !

मग हे स्लिम टूरिझम भारतात आलं कसं ?

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून मुंबईच्या धारीवीची ओळख आहे. त्यामुळे अनेक विदेशी पर्यटक इकडे येत असतात हीच बाब लक्षात घेऊन भारतात २००५ साली झोपडपट्टी पर्यटन हे सुरू झालं.

२००५ साली कृष्णा पुजारी यांनी रिऍलिटी टूर्स अँड ट्रॅव्हल्सची सुरूवात केली. ही कंपनी आगोदरच धारावी झोपडपट्टीवर लक्ष ठेवून होती.

कृष्णा पुजारी सांगतात “कंपनीचे सहसंस्थापक आणि माझे ब्रिटिश मित्र क्रिस्ट वे यांनी मला पहिल्यांदा झोपडपट्टी पर्यटनाविषयी सुचवलं तेव्हा मी गोंधळलो होतो. एखाद्याला झोपडपट्टी बघायला का आवडेल? पण नंतर माझ्या लक्षात आलं की तिथे बघण्यासारखं आणि शिकण्यासारखं बरंच काही असतं”. तेंव्हा पासुन धारावी हे टूरिझम ठीकाण म्हणून प्रसिध्द व्हायला सुरवात झाली.

इथे फिरण्यासाठी नाही तर इथल्या लोकांनी बनवलेल्या अनेक गोष्टी खरेदी करण्यासाठी आणि त्या ठिकाणच्या लोकांना भेटण्यासाठी विदेशी पर्यटक येत असतात. हे पर्यटन सुरू होऊन जवळपास १५ वर्षांपेक्षाही जास्त काळ झाला आहे. धारावी झोपडपट्टीची कमाईही आधिक आहे.

इतकं कि, भारतात सुंदरतेचं प्रतिक मानल्या जाणाऱ्या ताजमहालपेक्षाही जास्त आहे.

मग धारावीची इतकी लोकप्रियता का?

धारावी झोपडपट्टी ही जवळपास ५५० एकर मध्ये वसलेली आहे. आणि याठिकाणी छोटे मोठे कारखानेही आहेत. तसेच घरगुती व्यवसाय देखील आहेत. या झोपडपट्टीत जवळपास १० लाख लोक राहतात असा अंदाज बांधला जातो.

धारावीची वार्षिक उत्पन्न रु. ३,०७८ कोटी आहे. तर इथे वर्षाला ताजमहल पेक्षाही अधिक लोकं भेट देतात ज्यामुळे धारावीच्या उत्पन्नात आधिक वाढ होते. काही खासगी सर्व्हेनुसार धारावी हे भारतातील इतर सर्व पर्यटन स्थळांपेक्षा आधिक लोकप्रिय ठिकाण झालेलं आहे.

धारावीची वाढती लोकप्रियता तसेच परेदेशी पर्यटकांचा धारावीकडे वाढता कल यामुळे ताजमहल पेक्षाही आधिक धारावी लोकप्रिय आहे हे समजतं, तसेच उत्पादनाचे आकडे आणि छोटे मोठे उद्योग यामुळेही धारावी प्रसिध्द आहे.

हे ही वाच भिडू :

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.