शाहरुख टिपू सुलतानवर चित्रपट आणतोय म्हणून आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात अडकवलं गेलं का?

आर्यन खान ड्रग्स प्रकरण !!!! आता या विषयाचा चावून चावून चोथा झालाय… पण आजचा विषय  शाहरुखच्या बाबतीतच आहे पण थोडासा वेगळाय.

लोकं बोलतांना मागचा -पुढचा विचार कुठ करतात? जे लिहिता आलं ते लिहितात आणि व्हायरल करत असतात.  

तुम्हाला आठवत असेल तर मागच्या वर्षी सोशल मीडियावर शाहरुख खानच्या नावाने एक बातमी व्हायरल झालेली. एका चित्रपटाचं पोष्टर व्हायरल झालं होतं कि, ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान टिपू सुलतानच्या भूमिकेत दिसत आहे.

शाहरुख खान टिपू सुल्तान वर चित्रपट काढणार अन त्यात टिपू सुलतान ची मुख्य भूमिका देखील स्वतः शाहरुख खान च करणार इत्यादी. तेंव्हा हि बातमी बराच राडा करत होती. लोकांनी अक्षरशः शाहरुख ला विरोध केला होता.   

या पोस्टसोबतच चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी करणारे मेसेस देखील फिरत होते. वास्तविक, व्हायरल पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, शाहरुख खान टिपू सुलतानचा अभिनय करत आहे.

या पोस्टर सोबतच लिहिलेल्या कॅप्शनमुळेच जास्त वाद निर्माण झाला होता, ते कॅप्शन असं होतं कि, “ज्या टिपू सुलतान ने आपल्या देशातील भारतीयांचा अपमान केला त्यांच्यावर चित्रपट बनवला जातोय आणि त्यांना महान योद्धा म्हणून दाखवण्यात येतं. ज्याने शेकडो मंदिरे उध्वस्त केली, ज्याने हिंदूंची हत्या केली, तो आज आपल्याच देशात नायक म्हणून पाहिला जातोय. चित्रपटासाठी अभिनेता देखील असाच   निवडला गेलाय कि, जो कट्टर जिहादी मानसिकतेने त्रस्त आहे, आता फक्त हिंदू लोकं तिकिटासाठी  ३००-५०० रुपये घालून हा चित्रपट पाहतील, मात्र आम्ही या चित्रपटावर तीव्र बहिष्कार टाकणार हे मात्र नक्की”  

collage 1588665648

शाहरुख खान टिपू सुलतानवर चित्रपट आणतोय म्हणून त्याच्या मुलाला ड्रग्स प्रकरणात अडकवलं गेलं का ?

 फक्त शाहरुख खान च नव्हे तर इतर हि काही बडे व्यक्ती या टिपू सुलतानमुळे अडचणीत आले होते.   आता शाहरुख खानच बोलायचं झालं तर त्याने टिपू सुलतान च्या चित्रपटाची घोषणा केली आणि त्याच्या काहीच दिवसात आर्यन खान प्रकरण सुरु झालं.  एक गोष्ट कायम चर्चेचा विषय असतो ते म्हणजे जो कुणी टिपू सुलतानच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो तो संकटात सापडतो.. हा काही आम्ही अंधश्रद्धेचा भाग नाहीये मात्र योगायोग जरूर आहे. 

अशाच काही घटना भूतकाळात देखील घडल्यात ज्या बद्दल बोललं पाहिजे, आता टिपू सुलतान कोण आहे. तो वाईट आहे कि चांगला आहे. तो स्वातंत्र्य सैनिक आहे कि लाखो लोकांचं धर्मांतरण करणारा व्यक्ती आहे हे वाद वेगळा आत्ता आपण आपल्या मूळ विषयावर येऊ. 

आता शाहरुख खान जसा अडचणीत सापडला तसंच एक उदाहरण म्हणजे संजय खान.

Sanjay Khan - IMDb

त्यांनी ‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान’ हा टीव्ही शो केलेला.  टीपू सुलतान या टीव्ही शोच्या शूटिंगदरम्यान अपघातात ते जबरदस्त भाजले गेले, ज्याच्या खुणा अजूनही त्यांच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या इतर भागावर दिसून येतात. या अपघातात संजय खान हा सुमारे ६५ टक्के भाजले होते. ते १३ महिने रुग्णालयात दाखल होते. आणि त्यादरम्यान त्यांच्यावर तब्बल ७३ शस्त्रक्रिया झाल्या. इतक्या शस्त्रक्रियांनंतरही त्यांच्या त्वचेचा रंग गोराच आहे म्हणजेच निवळला नाही. veteran actor sanjay khan birthday when bollywood actor burn at tv show tipu sultan shooting here is full detail KPJ

 

 

१९९० मध्ये जेंव्हा म्हैसूरच्या प्रीमियर स्टुडिओमध्ये टिपू सुलतानचे शूटिंग चालू होते. त्याचवेळी एका भीषण अपघाताने सगळी टीमला नुकसान सहन करायला लागलं होतं. मुंबईतील १०० हून अधिक कलाकार येथे उपस्थित होते. ४ फेब्रुवारी १९८९ रोजी रात्री उशिरा टिपू सुलतानच्या लग्नाचे दृश्य चित्रित केले जात होते. त्यानंतर फटाके वाजवताना सेटवर आग लागली, ज्यात ४२ जणांचा मृत्यू झाला, तर संजय खानसह २५ जण जखमी झाले होते. 

संजय खान नंतर एक उदाहरण म्हणजे विजय मल्ल्या !

विजय मल्ल्या ने लंडनमध्ये टिपू सुलतानची तलवार खरेदी केली होती.  टिपू सुलतानची दोनशे वर्षे जुनी तलवार विजय मल्ल्याने लंडनमधील एका लिलावात पाच लाख पौंडांपेक्षा जास्त किंमतीत खरेदी केली होती. या दुर्मिळ तलवारीच्या कांस्य हँडलवर वाघाचे डोक्याची प्रतिकृती असल्याचे सांगितले जाते. टिपूच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाच्या बाजूला पडलेली ही तलवार ब्रिटिशांना सापडली होती.

त्याने जगातील अनेक दिग्गजांना मागे टाकून टिपू सुलतानची हीच तलवार खरेदी केली होती. पण यानंतर सीबीआयने विजय मल्ल्या यांच्या घरावर आणि ऑफिसवर छापे टाकले होते. विमान कंपन्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या नावाखाली सरकारी बँकांकडून कर्ज घेतले, मात्र ४ हजार कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा आरोप मल्ल्या यांच्यावर करण्यात आला आहे. तेही काळा पैसा ठेवण्यासाठी सुरक्षित समजल्या जाणाऱ्या देशांमध्ये. सीबीआय विजय मल्ल्या यांच्या मागेच लागल्यामुळे शेवटी विजय मल्ल्या देश सोडून पळून गेला.

mall

जुन्या गोष्टीं जमा करण्याचा  शौकीन असलेल्या विजय मल्ल्या यांनी प्रचंड पैसा खर्च करून हि तलवार खरेदी केली होती, मात्र आता त्यांच्याकडे नंतर तलवार नाही असं सांगितलं गेलं. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे मल्ल्याशिवाय कुणालाही माहिती नाही कि, पुढे तलवरीच काय झालं. त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितल्याप्रमाणे २०१६ मध्येच ही तलवार मल्ल्याने कुणाला तरी दिली होती. कारण त्यांच्या कुटुंबीयांनी ही तलवार अशुभ असल्याचे म्हटले होते.

 त्याचप्रकारे शाहरुख ला देखील टिपू सुलतान चा चित्रपट काढणे महागात पडले असं एकंदरीत चर्चा आहे.

 हे ही वाच भिडू:

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.