आर्यन खानचं प्रकरण आणि प्रमोद महाजनांच्या खून खटल्यात एक साम्य आहे
बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानच्या माग लागलेली ईडापीडा टाळायचं काही नाव घेईना. त्याच्या मुलाला वाचविण्याचा आटापिटा शाहरुख कसा करतोय याची माहिती बातम्या तुम्हाला येतच असतील. कारण माध्यम अशा गोष्टींविषयी खूप सजग असतात.
असो तो आपला विषय नाही.
तर आर्यनला जामीन नाकारण्यात आलाय. त्यामुळे पुढील काही दिवस आर्यनचा मुक्काम पुढील काही दिवस आर्थर रोड जेलमध्येच राहणार आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर आर्यन विरोधात ड्रग्जचे सेवन करणे आणि त्यादिवशी पार्टीला उपस्थित राहणे याशिवाय कोणतेही आरोप नाहीत.
पण एनसीबीकडून सातत्याने आर्यनच्या जामीन देण्यावर विरोध केला जातोय. आतापर्यंत एनसीबीने आर्यनविरोधात केलेले सर्व युक्तीवाद हे व्हॉट्सअॅप चॅटच्या दाव्यावर करण्यात आले आहेत. आर्यनने अरबाज मर्चेंट आणि ड्रग्ज पेडलरसोबत ड्रग्जबद्दल चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडेदेखील आर्यन खानच्या संपर्कात असल्याचा संशय एनसीबीला आहे.
म्हणजे तपासादरम्यान आर्यन खानचं व्हॉट्सअॅप चॅट हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी व्हॉट्सअॅप चॅट हा पुरावा न्यायालयात किती प्रभावी ठरू शकतो ? त्यामुळे आर्यन खान अडकू शकतो का ? असा प्रश्न विचारला असता, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी महत्त्वाचे कायदेशीर पेच आणि संदर्भ सांगितले आहेत. त्यावेळी त्यांनी दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या खटल्याचा दाखला दिला.
पण मग विषय येतो तो काय झालं होत प्रवीण महाजन आणि प्रमोद महाजन यांच्या प्रकरणात..
२६ एप्रिल २००६ ला प्रमोद महाजन यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनी पूर्णा इमारतीतल्या राहत्या घरी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांनी स्वतः वरळी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपल्या गुन्ह्याची कबुली दिली होती. दरम्यान भाजपचे नेते आणि प्रमोद महाजनांचे मेव्हणे गोपीनाथ मुंडे यांनी त्यांना तातडीनं हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं. उपचारादरम्यान ३ मे रोजी प्रमोद महाजन यांचा मृत्यू झाला.
प्रमोद महाजन यांची मर्डर केस जेव्हा कोर्टात गेली, तेव्हा प्रवीण महाजन यांनी प्रमोद महाजन यांचा खून व्हायच्या आधी एक मॅसेज प्रमोद महाजनांना पाठवला होता. त्याबद्दलची साक्ष गोपीनाथ मुंडेंनी कोर्टात दिली होती. मुंडेंच्या साक्षीनुसार,
प्रमोद महाजन यांची हत्या करायच्या आधी प्रवीण महाजन प्रमोद महाजन यांच्या घरी गेले होते. तिथे त्यांनी एक कोटींची डिमांड केली होती. आणि जर पैसे दिले नाहीत तर त्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी सुद्धा दिली होती. त्यानंतर जो मॅसेज पाठवला होता त्यात,
‘now there will be war. There will either be victory or an end to it all…’
असा मॅसेज पाठवला होता. हा मॅसेज पाहिल्यानंतर प्रमोद महाजनांनी आपले मेहुणे गोपीनाथ मुंडे यांना बोलावलं होत. आणि प्रवीण महाजनांशी या विषयावर बोलायला सांगितलं.
आणि महाजनांच्या प्रकरणात हाच मॅसेज महत्वाचा पुरावा ठरला होता. त्याच मेसेजचा आधार घेत प्रवीण महाजन यांच्यावर आरोप केला होता. नंतर कोर्टात त्या मेसेजचा संदर्भ सिद्ध करावा लागला. आणि प्रवीण महाजन आरोपी ठरले होते.
अगदी त्याच पद्धतीत उज्ज्वल निकम म्हणतात की, एनसीबीला मुंबई हायकोर्टात आर्यन खान प्रकरणात व्हॉट्सअॅप चॅटिंग संदर्भातील दावा सिद्ध करावा लागणार आहे.
हे ही वाच भिडू
- मुंडेंचा सलग चार वेळा १ मताने पराभव झाला होता, तो ही त्यांचे मित्र प्रमोद महाजन यांच्या हातून..
- सचिनच्या फेरारी टॅक्स प्रकरणात प्रमोद महाजनांना शिव्या बसल्या होत्या
- प्रमोद महाजनांनी खूप आकांडतांडव केला मात्र या मालिकेचं प्रक्षेपण काही थांबलं नाही.