चिमण्या जगवण्यासाठी नाशिकच्या व्यक्तीने ४५० हून अधिक देशी झाडांच्या जाती जगवल्या..

लुप्त होत जाणारी वनस्पती हे सगळ्यांच टेंशन वाढवणारी बाब आहे. विदेशी झाडे दिसायला जरी चांगली असेल तरी त्याचे दुष्परिणाम हे दीर्घकाळ भोगावे लागणार आहेत. त्याच्या परिमाण पर्यावरच्या संतुलनावर होतोय.

देशी जातींचे झाडे लुप्त होण्यामुळे चिमण्यांच्या अधिवासावर देखील परिमाण होत आहे. याची दखल घेत देशी झाडे, वनस्पतीं वाचविण्यासाठी नाशिकचा एक तरुण पुढे आला आहे. त्याने देशभरातून लुप्त होणाऱ्या प्रजातीच्या बिया, झाडे जमा केली आहेत. 

मोहम्मद दिलावर असे या तरुणाचे नाव आहे. त्याने लुप्त होणाऱ्या ४५० वनस्पतींना वाचवत नाशिक मुंबई, पालघर, पुण्यातील ५० जंगलांमध्ये ही झाडे लावली आहे. दिलावर हे चिमण्यांचे संरक्षण करणाऱ्या Nature Forever Society संस्थेचे सदस्य आहेत.

नाशिक येथे राहणारे दिलावर हे २००५ पासून चिमण्यांसाठी काम करतात. नाशिक मधील जंगलात फिरत असतांना दिलावर यांच्या लक्षात आले की, ज्या प्रमाणात देशी झाडे कमी होत आहेत येथे चिमण्या सुद्धा दिसणे कमी झाले आहे.  शहरातील नर्सरी, डोंगरावर विदेशी जातींचे झाडे सगळीकडे दिसत आहे. भारतीय जातींची झाडे लुप्त होत चालली आहे.

चिमणी आणि देशी झाडे लुप्त होणे एकमेकांवर अवलंबून आहे. चिमण्यांसाठी अन्न असणारे  किटक हे देशी झाडांवर जन्माला येतात. विदेशी झाडे लावण्यात येत असल्याने त्याचा परिणाम चिमण्यांवर होत आहे. त्याचा अधिवास धोक्यात आला आहे. त्यानंतर दिलावर यांनी ४५० जातींच्या झाडे, झुडपे गोळा केली. त्यांनी ही झाडे विविध शहरातील ५० जंगलात फॉरेस्ट सिटी तयार करून लावली आहेत.

२०१५ मध्ये पुण्यातील विप्रो कंपनीच्या जागेत मोहम्मद दिलावर यांच्या टिमने ३५ एकरात देशी झाडे लावले. झाडे लावायला सुरुवात केली तेव्हा दिलावर यांच्याकडे २४ जातींची झाडे होती. मात्र, कामाला सुरुवात केल्यावर पहिल्या काही दिवसात विप्रो कंपनीच्या जागेत २४० प्रकारचे देशी झाडे लावले आहेत. 

या प्रकल्प राबविण्यात आल्यानंतर दिलावर यांच्या संस्थेकडून मुंबई, पालघर, पुणे नाशिक येथे वन विभाग, खासगी संस्थांच्या मदतीने देशी जातींची झाडे २५ जंगलात लावली आहे. या प्रत्येक जंगलात ४० पेक्षा अधिक देशी जातींचे झाडे लावली आहेत. 

स्थानिक प्रजाती टिकण्यासाठी प्रयत्न 

जैव विविधतेच संतुलन टिकून ठेवायचे असेल तर  देशी प्रजातीच्या झाडे टिकणे फार महत्वाचे आहे. जैव विविधतेत टिकून ठेवायची असेल तर स्थानिक झाडे टिकली पाहिजे. ती झाडे तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतात. एकदा लावल्यावर त्याची जास्त काळजी घेण्याची गरज नाही. पक्षांना अन्न म्हणून लागणारे कीटक जागविण्याचे काम हे देशी प्रजातीचे झाडे करत असतात.

२०१७ मध्ये आलेल्या एक अहवालानुसार भारतातील ३८७ देशी झाडांपैकी ७७ झाडे हे लुप्त होत असल्याचे सांगितले आहे. तसेच या अहवालात पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या पश्चिम घाटातील १०० प्रकारचे देशी झाडे संपण्याच्या मार्गावर आहेत. या सर्व झाडांना टिकविण्याचे प्रयत्न करण्यात येत असल्याचे मोहम्मद दिलावर यांनी सांगितले.

बोल भिडूशी बोलतांना मोहम्मद दिलावर म्हणाले, 

चिमण्या बरोबर भारतीय जातींचे झाडे वाचविण्यासाठी आम्ही काम करत आहोत. चिमण्यांचे अन्न हे भारतीय झाडांवरचे कीटक आहेत. चिमण्यांची लाईफ सायकल टिकून आहे. पश्चिम घाटातील ४५० वनस्पती वाचविण्यासाठी प्रयत्न करतोय. मुंबई, नाशिक  अशा अनेक शहरात ५० जंगलांमध्ये ही लुप्त होणारी झाडे लावली आहेत.

खेडयांपेक्षा शहरात भारतीय जातींचे झाडे लुप्त होत आहेत. नर्सरी चालक आणि लॅन्ड स्केप अर्किटेक्टकडून विदेशी  झाडांना प्रोत्साहन दिले जाते. भारतीय झाड्यांच्या दिसण्या बद्दल एक भ्रम आहे. जगातील १० सुंदर असणाऱ्या झाडांची लिस्ट काढली तर एक झाड हे भारतीय आहे. सध्या आपण परदेशी झाडांना अधिक महत्व देत आहोत.

परदेशी जातीचे झाडे हे पर्यावरण, मानव आणि शेतीसाठी हानिकारक आहेत. जंगले ओस पडत आहेत. पर्यावरणाला हानी पोचविण्यात परदेशी झाड्यांचा मोठा रोल आहे. या सगळ्यांचा विचार केल्यास वर्षाला ५०० बिलियन डॉलरचे नुकसान होत असल्याचे दिलावर यांनी सांगितले. 

मोहम्मद दिलावर यांची संस्था काय काम करते

सरकार, खासगी संस्थांच्या वतीने वृक्षारोपचे कार्यक्रम घेण्यात येतात. त्यावेळी सर्व देशी झाडे लावण्यात यावे साठी प्रबोधन करते. जंगले वाचविण्याबरोबर आपल्या नर्सरी मधून देशी जातींची वनसंपत्ती विकतात. ४०० पेक्षा अधिक देशी जातींच्या वनसंपत्ती नर्सरीत उपलब्ध आहेत. 

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.