मॅकडोनल्डचा सर्वाधिक नफा हा बर्गर विकून येत नाही तर रियल इस्टेटमधून येतो, कस ते समजून घ्या

मॅकडोनल्ड ही जगभरातली सगळ्यात मोठ्या फूड चैन पैकी एक आहे. कमी अधिक नाही तर १२० देशांमध्ये याचं जाळ पसरलंय. त्यात ४० हजार आउटलेटआहेत. दिवसभरात ७ कोटींपेक्षा जास्त ग्राहकांची भूक मॅकडोनल्ड भागविते. 

मॅकडोनल्डचा मुख्य व्यवसाय बर्गर विकणे असला तरीही कंपनीची खरी कमाई रियल इस्टेट मधून होते. मॅकडोनल्डचे बिझनेस स्टॅटर्जी नेमकी काय आहे. कशा प्रकारे रियल इस्टेट मधून ही कंपनी पैसे कमविले ते पाहूया. 

रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनल्ड या भावंडानी १९४० मध्ये  मॅकडोनल्डची सुरुवात केली. कमी किंमतीत अधिक पदार्थ देणारे रेस्टोरंट म्हणून मॅकडोनल्ड ओळखू लागले होते. यामुळे मोठ्या  प्रमाणात गर्दी होऊ लागली होती. फ्रेंचायजी मागायला येणाऱ्या रे क्रोक यांनीच १९६१ मध्ये मॅकडोनल्ड खरेदी केलं. 

वकिलांचा सल्ला ऐकला रियल इस्टेट व्यवसायात आले  

मॅकडोनल्डची चैन जगभर पोहचविण्यासाठी रे क्रोक यांनी आक्रमक पवित्र घेत अनेक शहारत फ्रेंचायजी द्यायला सुरुवात केली. त्यांचे काही निर्णय फसले त्यामुळे रे क्रोक यांचे आर्थिक नुकसान झाले आणि त्यांच्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला.

आर्थिक संकटामुळे त्यांना आपले राहते घर सुद्धा गहाण ठेवावे लागले. त्यांच्या मदतीला एक वकील आला आणि त्याने बर्गर विकण्या पेक्षा रियल इस्टेचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. 

पुढच्या काळात रे क्रोक यांनी त्या वकिलाचा सल्ला मान्य केला पण बर्गर विकणे बंद केले नाही. याचमुळे मॅकडोनल्डच्या बर्गरचा खप ५० टक्कयांनी घटला तरीही त्याचा काहीच परिणाम कंपनीवर होत नाही. कंपनीची बॅलेंन्सशीट पाहिली तरी लक्षात येते. मॅकडोनल्डकडे जगभर बिलियन डॉलरची प्रॉपर्टी आहे आणि यातूनच दरवर्षी हजारो कोटींची कमाई कंपनी करते. 

मॅकडोनल्ड हे आउटलेट फक्त स्वतःच्या जागेवरच सुरू करत 

मॅकडोनल्डच्या आउटलेटची फ्रेंचायजी घ्यायची असेल तर साधारण ३० लाख रुपये डिपॉजिट भरावे लागते. आउटलेट मध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू म्हणजेच ब्रेड, सॉस पासून ते क्लिनींगसाठी लागणाऱ्या वस्तू मॅकडोनल्डच्या सप्लायर पासूनच खरेदी कराव्या लागतात. हे तुम्ही साध्या वडापाव, चहाची फ्रेंचायजी घ्यायला गेला तरी सेम प्रोसेस असते. त्यात काही वेगळं नाही. 

मॅकडोनल्ड डोकं लढवल खरं इथं. त्यांचे सगळे आउटलेट हे स्वतःच्याच जागेवर असतात. तुम्हाला फ्रेंचायजी घ्यायची असेल तर तुमची जागा अगोदर मॅकडोनल्ड कंपनीला ती विकावी लागते. आउटलेट सुरु केल्यानंतर दर महिन्याला त्याचा रेंट कंपनीला द्यावा लागतो. हा रेंट मार्केटपेक्षा १० ते २० टक्के जास्त असल्याचे सांगण्यात येत. यात दरवर्षी वाढ होत असते.   

रेंट बरोबर दर महिन्याला रॉयल्टी सुद्धा द्यावी लागते

हे झालं जागेच्या बाबतीत. एक तर तुम्हाला दर महिन्याला जागेच रेंट द्यावं लागत आणि तिथं लागणाऱ्या सगळ्या वस्तू या मॅकडोनल्डच्या सप्लायरकडूनच विकत घ्यावा लागतात. यामुळे कंपनीचा दुहेरी फायदा होतो. याच बरोबर आउटलेट मधून झालेल्या फायद्यातुन दर महिन्याला ४ ते ५ टक्के रॉयल्टी फी म्हणून द्यावी लागते. 

२०१९ चा विचार केला तर एका वर्षात मॅकडोनल्ड ११.६ बिलियन म्हणजेच ८५ हजार कोटी रुपये फ्रेंचायजी आणि रेंट मधून कमविले. तब्बल ६४ टक्के रेव्हेनु यातून येतो. याचा अर्थ असा होतो की, बर्गर विक्री हे मॅकडोनल्डचे उत्पनाचे दुय्यम साधन आहे. 

मग प्रश्न पडतो की, मॅकडोनल्ड तर्फे इतके नियम लावले जातात तरीही त्याची फ्रेंचायची का घेतली जाते ?   

ब्रॅड व्हॅल्यू 

तुम्ही कधीही, कुठल्याही मॅकडोनल्डच्या आउटलेट मध्ये जावा तिथे गर्दी असतेच. त्याच जागेवर हॉटेल, रेस्टोरंट टाकले तर ते चालेल की नाही याची काळजी असते. त्यामुळे दोन पैसे जास्त गेले तरी चालतील पण मॅकडोनल्ड सारखी फ्रेंचायजी घेण्याकडे लोकांचा कल असतो. आता पर्यंतचा विचार केला तर मॅकडोनल्ड फेल होण्याचे चान्सेस हे ५ ते १० टक्केच आहे.

मॅकडोनल्डचे पहिले अध्यक्ष हॅरी सॅनबॉर्न म्हणाले होते,

आम्ही टेक्निकल फूड बिजनेस मध्ये नाही. आम्ही खरं तर रियल इस्टेट व्यवसायात आहोत. आम्ही यासाठी ५० सेंटच बर्गर विकतो की, यातूनच आमचा भाडेकरू जागेच रेंट भरू शकेल. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.