रामजन्मभूमी वादात युपी जिंकायला काँग्रेस आणि आपने बाबांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे?

गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर ट्रस्टशी संबंधित जमीन वाद चांगलाच चर्चेत आलाय. २ कोटी रुपयांची जमीन ट्रस्टनं १८ कोटी  रुपयांत खरेदी केल्याच्या मुद्द्यावरून हा वाद सुरु झाला आहे. आता  याच प्रकरणावरून विरोधी पक्ष नेते भाजपवर निशाणा साधून याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करतायेत. एकमेंकांवर सुरु असलेल्या आरोपाच्या सत्रा  दरम्यान तपस्वी छावणीचे महंत परमहंस दास यांनी मोठा खुलासा केलाय.

महंतांच्या  म्हणण्यानुसार  अनेक राजकीय पक्षांनी भाजपचा विरोध करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला होता.  यासाठी त्यांना करोडो रुपयांची ऑफरही देण्यात आली होती. 

परमहंस दास यांनी एक पत्र पाठवून सांगितलं  की,  राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदीत कोणताही घोटाळा झाला नाही. सगळे आरोप हे राजकीय षडयंत्राचा एक भाग आहे.  त्यांनी आम आदमी पक्ष, समाजवादी पार्टी आणि काँग्रेसवर मोठा आरोप करत म्हंटले कि,  त्यांना ट्रस्ट आणि भाजपचा विरोध करण्यासाठी अनेक कोटींची ऑफर  देण्यात आली होती.

आपल्या पत्रात महंतांनी सांगितलं कि,

आज सकाळी ७ वाजता त्यांच्याजवळ दोन माणसं आली होती. ज्यांनी  त्यांना ट्रस्ट आणि भाजपचा विरोध करण्यासाठी १०० कोटी रुपयांची ऑफर दिली होती. पण जेव्हा त्यांनी हि ऑफर नाकारली, तेव्हा त्यांना मुख्यमंत्री बनण्याचीही ऑफर देण्यात आली.

त्यांनी म्हंटल कि,

जेव्हा मी या ऑफरसाठी नकार दिला, तेव्हा मला म्हंटले कि, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस जिंकल्यावर त्यांना प्रदेशचा मुख्यमंत्री बनवले जाईल.  जेव्हा मी सांगितले कि, मी एक संत आहे आणि राष्ट्रहित सर्वतोपरी आहे, तेव्हा ते निघून गेले.  ते दोघेही आम आदमी पक्ष आणि काँग्रेसने पाठवलेले होते. 

महंत परमहंसदास यांनी असंही म्हंटल कि, शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतीला आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, आणि काँग्रेसनं खरेदी केलंय. आता त्यांचे अनुयायी ट्रस्ट आणि भाजपच्या विरोधात एकत्र आले आहेत.

दरम्यान, आम आदमी पक्ष आणि काँग्रेस कडून राम मंदिर ट्रस्टवर लावलेल्या आरोपांवर याआधी शारदा पिठाचे शंकराचार्य जगतगुरु स्वरूपानंद सरस्वती यांचे उत्तराधिकारी  आणि रामालय ट्रस्टचे अध्यक्ष अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एका पत्रकार परिषदेत म्हंटले कि,  भगवान श्रीरामाच्या नावावर ट्रस्ट बनवण्यात आलंय. त्याचे उद्देश रामाच्या आदर्शाची स्थापना आहे.  तर या मुद्द्यावर लवकरात लवकर निष्पक्ष लोकांची एक कमेटी बनवली जावी आणि जो पर्यंत तपास सुरु आहे, ज्या लोकांवर आरोप लावले गेलेत त्यांना त्यांच्या जबाबदारीपासून  मुक्त करायला हवे.

अविमुक्तेश्वरानंदनंद सरस्वती यांनी थेट ट्रस्टचे महासचिव चंपत राय आणि ट्रस्टी अनिल मिश्रा यांच्यावर निशाणा साधत म्हंटलं कि,

‘ज्यांनी साक्ष दिली आहे, ज्यांनी  रजिस्ट्री करून घेतलीये, त्या दोघांनाही लगेच निलंबित कायला हवे. जोपर्यंत ते निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्यांना  सर्व प्रकारच्या जबाबदार्‍यापासून मुक्त केले पाहिजे. हि बाब समोर आलीच आहे तर खूप लांबपर्यंत  जाईल. “

दरम्यान, आपचे खासदार संजय सिंह आणि माजी कॉन्ग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्टशी संबंधित एका जमिनीच्या व्यवहारात भ्रष्टाचाराचा आरोप लावला.  त्यानंतर  ट्रस्टने सगळ्या प्रकरणावर आपले स्पष्टीकरण जारी करत आपल्या ट्विटर हँडलवर जमिनीच्या व्यव्हारासंबंधित काही कागदपत्रे शेयर केली होती.

 

दरम्यान,  या मुद्द्यावरून आता वातावरण पेट घेताना दिसतेय.  याच प्रकरणी साक्षी महाराज यांनी विरोधी पक्ष नेत्यांवर जोरदार निशाणा साधला होता.  त्यांनी म्हणतील की, राम मंदिराच्या बांधकामात जे भष्ट्राचाराचा आरोप लावतायेत, ते आपली पावती दाखवून चंदा परत घेऊन  जाऊ शकतात.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.