साध्या वायरमनने मनात आणलं आणि गावाला लोडशेडिंगमधनं मोकळं केलं…

पुन्हा एकदा राज्यात लोडशेडिंग सुरु झाल्याने शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्य नागरिकांचे टेन्शन वाढले आहे. मागच्या ७ वर्षात राज्यात लोडशेडिंग नव्हती. कोळसा टंचाईचे निर्माण झाल्याने लोडशेडिंग करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

महाराष्ट्राप्रमाणे झारखंड मध्ये देखील अशा प्रकारे वीजसंकटाला दरवेळी सामोरे जावे लागते. येथील एक शेतकऱ्याच्या मुलाने यावर उपाय शोधला असून देशी जुगाड करून गावाला पुरेल एवढी वीज निर्मिती केली आहे. एकप्रकारे गावाला विजेच्या संकटातून बाहेर काढले आहे. 

झारखंड हे राज्य मागास म्हणून ओळखले जाते. रामगड गावात कधीच पूर्णवेळ २४ तास वीज राहत नव्हती. दररोज वीज ये-जा करायची. रामगड गावात राहणारे केदार प्रसाद महतो यामुळे चांगेलाच वैतागायचा. प्राथमिक शिक्षण घेत असतांना त्याने ठरवलं होत की, गावात २४ तास वीज उपलब्ध राहील यासाठी काम करायचे. 

बारावी नंतर केदार महतो याने झारखंडची राजधानी रांची गाठली. येथे त्यांनी इलेक्ट्रीशिनचा कोर्स केला. त्यानंतर ते वायरमन म्हणून लहान मोठे काम करू लागला. केदार महतो रांचीला असतांना अधे- मध्ये गावात येत असे. त्यावेळी गावात कधीच वीज नसायची.  

२००४ पासून त्यांच्या गावात हिच परिस्थिती होती. नदीच्या पाण्याचा वापर करून वीज निर्मिती करता येऊ शकते हे वायरमन असणाऱ्या केदारच्या लक्षात आले होते. दरम्यान त्याने गावातली सेनेगढा नदीवर देशी जुगाड वापरून एक प्रकल्प उभा केला. एक दिवस नदीला अचानक पूर आल्याने हा प्रकल्प वाहून गेला. 

त्यानंतर केदारने नदीच्या मधोमध सिमेंटचा पिलर उभा केला. त्यात चुंबक, कॉईल, मोटार असा देशी जुगाड तयार करून टर्बाईन बनवले. त्याला हा सेटअप तयार करण्यासाठी १८ वर्ष लागली. यासाठी तीन लाख रुपये खर्च आला. गावातील काही मित्र आणि त्याने काम करतांना मिळालेल्या पैशातून हा खर्च केला. 

पाण्याचा उपयोग करून पहिल्याल्या प्रयत्नात १२ वोल्ट वीज तयार करता आली. २०१४ मध्ये दहा वर्षांच्या प्रत्ननानंतर नदीवर सुरु केलेल्या प्रकल्पातून एक किलोवॅट वीज तयार झाली होती. मात्र ही वीज गावासाठी पुरेशी नव्हती. यानंतर त्याने आपल्या प्रकल्पात काही बदल केले आणि त्याचा प्रत्यय ७ वर्षांनी दिसून आला. 

सततच्या प्रयत्नानंतर २०२१ मध्ये रामगढच्या प्रकल्पातून ५ किलोवॅट वीज तयार होऊ लागली आहे.  त्यातून १०० वॅटचे ४० ते ४५ बल्ब सुरु झाले आहेत. केदार माध्यमातून रामगड मध्ये जरी वीज पोहचत असली तरीही लोकांच्या घरात ती पोचली नाही. मात्र, त्यांच्या या कामामुळे रामगड गावातील प्रत्येक चौकात आणि मंदिर परिसर अंधारातून मुक्त झाला आहे.

आता गावातील सार्वजनिक ठिकाणी असणारे सर्व बल्ब हे केदारने तयार केलेल्या वीज प्रकल्पाच्या माध्यमातून चालत आहेत. 

केदार जो प्रकल्प नदीवर प्रकल्प उभा केला आहे तेथून ३३० किलोवॅट वीज तयार होऊ शकते. जर ३३० किलोवॅट वीज तयार झाली तर गावातील सर्व घरात वीज पुरवणे शक्य आहे. त्यासाठी ३० ते ३५ लाखांचा खर्च करावा लागणार आहे. यासाठी सरकारने मदत करावी अशी इच्छा केदारने व्यक्त केली आहे. 

शेतकऱ्याची पार्श्वभूमी असणाऱ्या केदारने संधी मिळाली तर आपण काय करू शकतो हे या उदाहरणावरून दाखवून दिले आहे. अशा प्रकारे देशी जुगाड करून वीज निर्मिती केदारने आत्मनिर्भर भारताचे स्वप्न एक प्रकारे पूर्ण केले आहे. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.