वी आर नॉट पब्लिक प्रॉपर्टी” म्हणत विद्या बालनने चाहत्याच्या मुस्काडीत मारली होती

कलावंतांना त्यांच्या चाहत्यांचा कधीकधी अतिशय भयंकर उपद्रव होतो त्रास होतो. असे उपद्रव मूल्य असलेले चाहते  खरं तर  त्यांना नको असतात. पण एकीकडे त्यांना फॅन फॉलोअर्स देखील हवे असतात. त्यामुळे कोणता चाहता चांगला आणि कोणता वाईट हे समजणे कठीण असतं आणि त्यातूनच कधीकधी भयंकर असे प्रसंग घडतात.

अशाच एका प्रसंगाला अभिनेत्री विद्या बालनला सामोरे जावे लागले होते.

हा किस्सा आह महेश भट निर्मित आणि श्रीजित मुखर्जी दिग्दर्शित ‘बेगम जान’ या चित्रपटाच्या प्रमोशन त्या वेळेचा. हा सिनेमा मूळ बंगाली ‘राजकाहिनी’ चित्रपटाचा ऑफिशियल रिमेक होता. मूळ बंगाली चित्रपट श्रीजित मुखर्जीयांनीच दिग्दर्शित केला होता.

१४ एप्रिल २०१७ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट भले ही  यशस्वी झाला नसला तरी समीक्षकांचे लक्ष या सिनेमाने वेधून घेतले होते.एका बोल्ड विषयावरील स्टोरीला संयतपणे हाताळले होते. तसेच भारतीय फाळणीचा विषय यात अग्रभागी ठेवून हे कथानक आले होते. यात विद्या बालन ने एका देहविक्री करणाऱ्या स्त्री ची भूमिका केली होती. भारत पाक सीमेवर ती कुंटणखाना चालवत असते.

या चित्रपटाची जबरदस्त हवा निर्माण झाली होती. या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी संपूर्ण युनिट कलकत्त्याला गेले होते. कलकत्ता विमानतळावर एक चाहता विद्या बालन कडे आला आणि त्याने तिच्या सोबत सेल्फी काढण्याची विनंती केली. विद्या बालनला त्यात  काहीच गैर वाटलं नाही कारण असे प्रसंग तिच्या वाट्याला  रोजच  येत होते. तिने आनंदाने त्याला होकार दिला.

तो चाहता तिच्या शेजारी आला आणि आपल्या मोबाईल मधून तिच्या सोबत सेल्फी घेऊ लागला. पण सेल्फी घेताना त्याचा डावा हात तिच्या कमरेभोवती घुटमळला. 

विद्याला  सुरुवातीला काही कळले नाही . पण ज्यावेळी त्या हाताने तो तिला स्वतःकडे ओढू  लागला त्यावेळी तिला ते खूपच अन कम्फर्टेबल वाटू लागले. सेल्फी घेतानाचा अँगल व्यवस्थित व्हावा म्हणून तो मुद्दाम वेळ लावू लागला. आणि डाव्या हाताने तो तिच्या पाठीवर कमरेवर विचित्र पद्धतीने हात फिरवू  लागला. विद्याने  त्याच्याकडे रागाने पाहिले. परंतु त्या उर्मट आंबट शौकीन चाहत्याची हिम्मत क्षणाक्षणाला वाढत होती.

जेव्हा त्याचा हात तिच्या छातीकडे सरकू लागला त्यावेळी मात्र तिचा तोल गेला आणि तिने ताबडतोब तिच्या मॅनेजरला बोलून हा काय प्रकार करतो आहे असे सांगितले. तरी तो चाहाता आपल्या घाणेरड्या कृत्या पासून दूर हटत नव्हता.

शेवटी विद्याने त्याला ढकलले आणि त्याच्या मुस्काटात ठेवुन दिली. 

सिक्युरिटी, पोलीस सगळे लोक जमा झाले. त्यांनी त्याच्या हाताला पकडले. त्यावेळी विद्याने जोरात सांगितले “तू समजतोस काय स्वतःला आम्ही पब्लिक फिगर असलो तरी पब्लिक प्रॉपर्टी नाही हे लक्षात ठेव आणि यापुढे असले धंदे बंद कर!”

दुसऱ्या दिवशी ही ब्रेकिंग न्यूज ठरली. आणि सर्व प्रिंट मीडियाने ‘वुई आर पब्लिक फिगर अँड नॉट पब्लिक प्रॉपर्टी!’ अशी हेडलाईन न्यूज दिली.

पडद्यावरील रील लाईफ मधील कलावंतांची प्रतिमा सामान्य जनतेला रियल लाइफ मधील प्रतिमा सारखीच  वाटू लागते आणि त्या पद्धतीने ते त्या कलावंत अशी रिऍक्ट होऊ लागतात. खरंतर रिल लाईफ आणि रिअल लाईफ हे पूर्णत:  वेगवेगळे असतात. यातील भेद ज्यादिवशी जनतेला आणि कलावंतांना कळेल त्यादिवशी सिनेमाची साक्षरता वाढली असे म्हणता येईल.

  • भिडू धनंजय कुलकर्णी

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.