MPSC, UPSC पुण्याच्या बाहेर घेवून जाणारा मास्तर.

सध्या काय करतो ? MPSC,UPSC.

गेल्या चार पाच वर्षात महाराष्ट्राच्या तरुणांमध्ये सर्वात मोठा बदल कुठला झाला असेल तर दिसेल तो मुलगा मुलगी MPSC, UPSC करू लागला. हा ट्रेन्ड गावागावात रुजला. अभ्यास करायचां पोस्ट काढायची, आयबापाचं नाव झळकवायचं हे स्वप्न घेवून हजारो पोरं पुण्यात येवू लागली.

कधीकाळी सामाजिक क्रांन्तीच पुणं आणि खासकरून त्यातल्या पेठा या MPSC, UPSC वाल्यांचा माहेरघर बनल्या.

MPSC, UPSC सोबतच स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्रात कोणत्या तरी एके ठिकाणी केंद्रिकरण होण्याची गरज होतीच. काही निवडक क्लासेसनी आपलं केंद्र पुणे आणि पर्यायाने पेठा केल्या आणि महाराष्ट्रातून मुले पेठेत येत गेली. क्लासेस सोबत लायब्रेरी, नोट्स, चहा, मेस, रुम अस पर्यायाने एक वेगळं अर्थकारण पेठेत शिरलं. मुलंही दिवसरात्र कष्ट करुन पास होवू लागली. पुण्याला जाणारा पास होतो हा समज चांगल्या पद्धतीने मुलांमध्ये रुजू लागला. वास्तविक ते खरं देखील होतं पण त्याचं महत्वाच कारण पुण्यात असणाऱ्या सोयी सुविधा नव्हत्या. तर राज्यभरातून स्पर्धा परिक्षेसाठी आलेल्या मुलांचा एकमेकांसोबत संपर्क करुन देण्याच महत्वाच काम या पेठेत झालं.

2008 मध्ये आलेल्या मंदीमुळे खाजगी क्षेत्राबद्दल निर्माण झालेली भिती इथपासून ते सरकारी नोकरीची सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि या दरम्यान ग्रामिण भागातील मुलांचा यशस्वी होण्याचा वाढलेला टक्का. या सर्व कारणांमुळे मुलं वाढली. क्लासेस वाढले. फी आणि पैसै वाढले. दरम्यान पेठेचा पुर्ण बाजारीकरण झालं. नाही म्हणायला काही निवडक क्लासेल प्रामाणिकपणा जपत गेले मात्र वाढत्या खर्चामुळे मुलांचा खर्च कमी करणं त्यांना देखील अशक्य होतं.

आजची पेठेची परिस्थिती काय ?

लायब्रेरीची फी 500 ते 2000 पर्यन्त. रुमचं भाड 3000 ते 4000, मेस 2000. क्लासेसच्या फी वर्षाला साधारण लाखाच्या घरात आहेत तर लागणाराच असा खर्च सोडून प्रत्येक मुलांचा महिना 12 ते 15 हजार कमीत कमी खर्च होतो. पहिल्या अटेंम्टमध्ये पास होणाऱ्या मुलाचा खर्च देखील किमान तीन लाख होतोच. आत्ता विचार करा चार अटेम्प्ट पाच अटेम्प्ट, आणि गेली पाच दहा वर्ष या पेठेत स्वत:ची स्वप्न शोधणारी मुलं आहेत.

आत्ता आपल्यातल्या अशाच एका मास्तरांची गोष्ट.

अरुणराज जाधव अस त्या तरुणाचं नाव. अरूणराज जाधव मुळचे लातूरचे. पण संपुर्ण शिक्षण पुण्यात. हा मुलगा 2013 साली UPSC मध्ये उतरला. COEP मधून इंजनिरींग केलेला. जॉब सोडून UPSC मध्ये आला. पहिल्या अटेम्प्टमध्ये राज्यसेवा, लोकसेवा मेन्स दिली. घरची परिस्थिती बेताची होती. त्यात घरचा विरोध जॉब सोडण्याला होताच. अशा स्थितीत त्याला महिना 100 डॉलर येत. हे पैसे त्याचा इंजिनिरिंगचा मित्र सुशील माळुंजकर दर महिन्याला न चुकता पाठवायचा. प्री, मेन्सच्या खर्च त्याला परवडणारा नव्हता. UPSC ची स्वप्न बघितलेला हा तरुण एक सरकारी नोकरी करू लागला. नायब तहसीलदार मुलीशी लग्न झालं आणि त्यांनीच अरुण जाधव यांना नोकरी सोडून वेगळा विचार करण्यास पाठिंबा दिला आणि याने UPSC च्या मुलांना शिकवण्याचा निर्णय घेतला. दरम्यानच्या काळात अरुण जाधव UPSC च्या मुलांना शिकवणारे मास्तर झाले होते आणि त्यांची पत्नी ज्यांच नाव मनीषा गंपले त्यापण आज पुणे येथे सहाय्यक राज्यकर आयुक्त आहेत.

गेली वर्ष दोन वर्ष हा मुलगा MPSC, UPSC च्या क्लासेसमध्ये शिकवण्याच काम करत होता. मुलं यायची एक दोन तास करायची आणि पून्हा निघून जायची. एखादाच धाडस करून बोलायचा. शे-दोनशे-पाचशे मुलांपैकी एखादा दूसरा मुलगा व्यक्तिगतरित्या संपर्कात रहात होता. दोन तीन महिन्यानंतर कमी होणारी संख्या पाहिली की या कोचिंगच्या मर्यादा लक्षात येत असत.

हे सगळं आपल्या आजूबाजूलाच होतय पण उत्तर नाही अशा वेळी या मुलाने खऱ्या अर्थाने मास्तर होण्याचा निर्णय घेतला.

आज पाच येतील दहा येईल हा विचार करत या सर्व मुलांना पुण्याच्या बाहेर घेवून जाण्याचा निर्णय घेतला. पुण्यापासून बाहेर रांजणगाव गणपतीच्या इथे त्याच्या मनात असणार परिसर त्याला पहायला मिळाला. आठ एकरात असणाऱ्या या परिसरात पन्नास सिंगल रुम आणि पंचवीस डबल रूम होत्या. इंडस्ट्रीसाठी तात्पुरती बांधण्यात आलेली कॉलनीच त्याला भाड्याने मिळाली. आठ एकरच्या परिसरात संद्रिय शेतीबरोबर मुलांना रहाण्याची खाण्याची सोय करूनच आपण स्पर्धा परिक्षेचा वेगळा जॉनर निर्माण करु शकतो हे त्यानं शोधल.

58968120 335078467203043 5061373685638627328 n
विद्यावर्धिनी कॅम्पस.

डिसेंबर महिन्यात विद्यावर्धिनीची सुरवात करण्यात आली. अवघ्या चार महिन्यात इथे 100 मुलं हजर झाली. दिवसरात्र सोबत असणारे शिक्षक. आपल्या वेळेनुसार रात्री-अपरात्री अभ्यासिकेत जायची सोय. त्यातही मुलींना सुरक्षित असणारं वातावरण यामुळे चांगलाच जम बसला. कधीकाळी आपला मित्र आपल्याला महिन्याला 100 डॉलर पाठवायचा हे लक्षात ठेवून या मुलांना जेवण, खाणं,रहाणं आणि क्लास अशी एकत्रित फी महिन्याला 4 ते 5 हजार ठेवली. तेव्हाच्या 100 डॉलरच्या प्रमाणात.

आजची स्थिती काय आहे तर ती 100 मुलं महिन्यासाठी 4-5 हजारामध्ये आपल्या शेतात बसून अभ्यास करतात तशी करतात. पेठेच्या गजबजाटापासून दूर कुठेतरी काहीतरी वेगळं करायचं स्वप्न घेवून अरूणराज जाधव आणि त्यांची टिम देखील लढतेय. वेगळं काही करू पाहतेय.

अरुणराज जाधव यांचा फोन नंबर : 9763006162 

विद्यावर्धीनीचा पत्ता. 

https://www.google.com/maps/place/Vidyavardhini+Centre/@18.7514456,74.2332289,17.28z/data=!4m5!3m4!1s0x3bc3291f104013b5:0xc01fc148b811e44e!8m2!3d18.751398!4d74.2348793

हे हि वाच भिडू.

4 Comments
  1. Shailesh kale says

    Vidhyavardhini is best campus in the pune for all compitative aspirant…
    Natural environment is best I this campus
    Teacher staff is very helpful and careful staff
    All the team member of vidhyavardhini r always support and motivate for every students .

  2. Shailesh kale says

    Good sir..u r doing great work for all compitative aspirant ..

  3. Mrunal Gomsale says

    Keep it up arun dada…

  4. Samadhan Misal says

    Hello Arun Sir,
    You’re doing fantastic job over there.
    Keep it up…!
    All the best…!

Leave A Reply

Your email address will not be published.