गुरु गोबिंद सिंगांच्या पुत्रांच्या बलिदानाची साक्ष म्हणून ‘वीर बाल दिवस’ साजरा होतो

“चिड़ियाँ नाल मैं बाज लड़ावाँ गिदरां नुं मैं शेर बनावाँ सवा लाख से एक लड़ावाँ ताँ गोविंद सिंह नाम धरावाँ” अशी गर्जना करणारे शिखांचे १०वे धर्मगुरू यांचे शीख धर्मसाठी विशेषतः शीख धर्माला वॉरिअर पंथ बनवण्यात मोठं योगदान होतं. त्यांच्याबरोबर त्यांच्या चार मुलांनाही शीख धर्माच्या रक्षणासाठी बलिदान दिला होतं.

बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग या त्यांच्या मुलांनी तर वयाच्या ९ व्या आणि ७ व्या वर्षी बलिदान दिलं होतं.

१७०४ चा डिसेंबर महिना होता. गुरु गोविंदसिंगांनी जोरदार तडाखे दिल्यांनतर मुघल त्यांच्या मागं हाथ धुवून मागे लागले होते.

मग २० डिसेंबरला बाहेर कडाक्याच्या थंडी असताना मुघलांनी आनंदपूर साहिब किल्ल्यावर अचानक हल्ला केला.

गुरु गोविंद सिंग यांना त्यांना धडा शिकवायला तयार झाले. पण त्यांच्या संघातील शिखांना इतक्या मोठ्या मुघल सैन्यासमोर धोका पत्करणे पटले नाही. त्यांनी गुरु गोविंद सिंगांना तिथून निघुन जाण्यास सांगितले. शेवटी मग गुरु गोविंद सिंग यांनीही समूहाची विनंती मान्य करून संपूर्ण कुटुंबासह आनंदपूर किल्ला सोडला. सारसा नदीतील पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान होता. त्यामुळे नदी पार करताना गुरु गोविंद सिंग यांचे कुटुंब वेगळे झाले.

मात्र सारसा नदी पार करताना अनर्थ घडला. सारसा नदीतील पाण्याचा प्रवाह अतिशय वेगवान होता. त्यामुळे नदी पार करताना गुरु गोविंद सिंग यांचे कुटुंब वेगळे झाले. 

गुरु गोविंद बाबा अजित सिंग आणि बाबा जुझार सिंग या दोन साहेबजाद्यांन बरोबर चमकौरला पोहोचले. तर त्यांची आई गुजरी दोन लहान नातू – बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांच्याबरोबर राहिल्या. 

या सगळ्यांची काळजी घ्यायला त्याच्यासोबत गुरूसाहेबांचा सेवक गंगूही होता. त्यांनी माता गुजरी यांना त्यांच्या दोन्ही नातवंडांसह त्यांच्या घरी आणले. मात्र माता गुजरीजवळ सोन्याची नाणी पाहून गंगूला लोभ सुटला. आणि ह्याच हव्यासापोटी त्यानं दगा केला. त्याने बक्षीस मिळवण्यासाठी कोतवालांना माता गुजरी यांच्याबद्दल माहिती दिली.

 मुघलांनी माता गुजरी यांना त्यांच्या दोन लहान नातवंडांसह कैदेत ठेवलं.

त्याला सरहदचा नवाब वजीर खान याच्यासमोर हजर करण्यात आलं. वजीरने बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग यांना इस्लाम स्वीकारण्यास सांगितलं.”मात्र जीव गेला तरी बेहत्तर पण धर्म सोडणार नाही” असं बाणेदार उत्तर या दोन बाल योध्यांनी दिले. दोघांनीही धर्म बदलण्यास नकार दिल्यावर वजीर खानचा पारा चढला. २६ डिसेंबर १७०४ रोजी नवाबाने या दोघांनाही भिंतीत जिवंत गाडण्याची निर्दयी आदेश दिला . त्याचवेळी माता गुजरी यांचा सरहिंद किल्ल्यावरून कडेलोट करण्यात आला.

गुरु गोविंद सिंग यांच्या कुटुंबाचे हे हुतात्म्य आजही इतिहासातील सर्वात मोठे बलिदान मानले जातं.  शीख नानकशाही कॅलेंडरनुसार आजही श्रद्धाळू  दरवर्षी २० डिसेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान शहीद सप्ताह पाळतात.

गुरु गोविंद सिंग यांच्या चार पुत्रांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी २६ डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा केला जातो. जानेवारी २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली होती.

हे ही वाच भिडू

 

Leave A Reply

Your email address will not be published.