रशियाने आधीही सायबर अटॅक करून इतर देशातील लसीच्या ब्लूप्रिंट चोरीचा प्रयत्न केलेला.

पहिल्या आणि दुसऱ्या लाटे दरम्यान कोरोना विषाणूच्या साथीने थैमान घातले होते. या साथीत जगभरात आतापर्यंत कितीतरी लाख लोकांनी जगभर प्राण गमावले आहेत. या साथीपुढे जगातील बलशाली सत्ता देखील हतबल झालेल्या दिसत होत्या. अगदी सूक्ष्म स्वरूपातील या विषाणूने परिस्थिती चिंताजनक केली होती.

या साथीच्या वाढत्या प्रसारामुळे जगभरातील मानवी समूहाला ‘जिवंत राहणे’ हीच आपली प्राथमिकता आहे हे अधोरेखित करायला भाग पाडले आहे.

साथीच्या प्रकारातील या विषाणूचा प्रादूर्भाव जगभरातील अनेक श्रीमंतापासून ते गरीबापर्यंत होतोय. कोरोना हा विषाणू नवीन असताना लोकांमध्ये भीतीचे वातावरण होते. मोठ्या प्रमाणात लोक आपले प्राण गमावत होते. ह्यावर सध्या तरी औषध नाही असे डॉक्टर सांगत होते.

ह्या विषाणूला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फक्त लस हाच एकमेव उपाय आहे हे जगभरातील डॉक्टर्स कडून सांगण्यात येत होतं . जगभरातील लोक हि लसीची एका चातकाप्रमाणे वाट बघू लागली होती. सर्व प्रगत देशांमध्ये लसीच्या संशोधनाची जणू स्पर्धाच लागली होती. लसीच्या संशोधनाने कोरोना विषाणू ला रोखणे एवढाच त्या देशांचा हेतू नव्हता, त्यामधून पैसे कमविणे हा मुख्य हेतू सुद्धा दडलेला होता.

लसीचे अंतिम चाचणी चे परीक्षण चालू आहे, अमुक एका देशाने लसीची लोकांमध्ये ट्रायल घ्यायला सुरुवात केली आहे. अमुक देशाने लसीच्या सर्व चाचण्या पास केल्या अशा बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. अखेर शेवटी ब्रिटन मध्ये फायझर ह्या कंपनी ने लस वितरित करायला सुरूवात केली.

त्यानंतर विविध देशांनी विकसित केलेल्या लसींचे जगभर वितरण होऊ लागले. मोठ्या प्रमाणात लोक लस घेताना दिसत आहे. पण ह्या लसींच्या संशोधनाच्या स्पर्धेतून अनेक देशांत  निर्माण झालेली चढाओढ, वादविवाद मात्र मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

त्याला कारण पण असंच आहे. नुकतंच रशियावर लसीची ब्लूप्रिंट चोरण्याचा आरोप करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी रशियाने सर्वप्रथम स्पुतनिक-V नावाने लस बनवली होती. मात्र या लसीला विकसित करणारी कंपनी गेमालेया नॅशनल रिसर्च इन्स्टिट्युट ऑफ अपिडोमिलोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजी विरोधात चोरीचा आरोप झाला आहे.

एका रिपोर्टनुसार यूकेमधील ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राजेनेका लसीची ब्ल्यूप्रिट रशियन गुप्तहेरांनी चोरली होती. त्यानंतर त्याचा वापर करून स्पुतनिक-V लस विकसित करण्यात आली असा दावा करण्यात येत आहे.

‘द सन’ च्या वृत्तानुसार, संरक्षणविषयक सूत्रांनी मंत्र्यांना सांगितले की, त्यांच्याजवळ रशियाचे राष्ट्रपती कार्यालय असलेल्या क्रेमलिनमधील गुप्तहेरांनी ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राजेनेका लसीचा फॉर्म्युला चोरला. त्यानंतर त्याचा वापार स्वत:ची लस विकसितकरण्यासाठी केला.

लसीच्या चोरीचा आरोप लागण्याची हि रशियाची काही पहिली वेळ नाही. तुम्हाला माहितीये का कि, गेल्या वर्षी सुद्धा  रशिया वर सायबर हल्ला करून लस चोरण्याचा आरोप करण्यात आला होता .. गेल्या वर्षी त्यांच्यावर काय आरोप झाले ते पण आपण बघूया 

रशियाच्या सेचेनोव्ह विद्यापीठाने करोना व्हायरसवर तयार केलेली लस सर्व क्लिनिकल चाचण्यांमध्ये यशस्वी ठरल्याचा दावा केला होता.

जुलै २०२०मध्ये अमेरिका, इंग्लंड आणि कॅनडाने संयुक्त निवेदनात  रशियाने हे संशोधन चोरले आहे, असा आरोप केला होता.

ब्रिटनच्या राष्टीय सायबर सुरक्षा केंद्राने आरोपात म्हटले होते की – एटीपी २९ ( APT29) या हँकिंग ग्रुपने लसीबाबत संशोधन कऱणाऱ्या ब्रिटनमधील प्रयोगशाळांवर सायबर हल्ले केले आणि माहिती चोरली. एटीपी २९ ग्रुप कोझी बेअर (Cozy Bear) नावानेही ओळखला जातो.

याबाबतच्या अहवालात दावा करण्यात आला होता की, एटीपी २९ हा रशियाच्या गुप्तचर यंत्रणेचा भाग असून करोनावरील लसींची माहिती मिळवण्यासाठी सायबर हल्ले करतो आहे. ब्रिटनच्या राष्टीय सायबर सुरक्षा केंद्राचे (एनसीएससी) संचालक पॉल चेचेस्टर याबाबत म्हणाले की, “करोनाच्या साथीचा सामना करण्यासाठी काम करत करणाऱ्यांविरूद्ध अशा सायबर हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो”.

अमेरिकेने रशियन सरकारशी संबंधित या  हॅकिंग ग्रुपबद्दल याआधीही आरोप केले आहेत. या हँकिंग ग्रुपने २०१६ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी कॉम्प्यूटर नेटवर्कमध्ये घुसखोरी करत इ-मेलची चोरी केली होती.

रशियाने हे आरोप फेटाळले होते. याबाबतच्या निवदेनात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना संशोधन चोरीची माहिती आहे की नाही याबाबत काहीही उल्लेख नव्हता. हे संशोधन चोरी करण्यासाठी रशियाने मोठी रक्कम दिल्याचा दावा ब्रिटीश अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता.

गेल्या वर्षी ब्रिटन-कॅनडा आणि रशिया यांच्या मध्ये झालेल्या ह्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी आता ह्यावर्षी कुठलं वळण घेतात हे बघणं महत्वाचं असेल.याचा लसीकरणाच्या मोहिमेवर कुठला हि फरक पडू नये एवढीच अपेक्षा सर्व देशातील सामान्य नागरिकांना असेल एवढं मात्र नक्की.

हे ही  वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.