अंडरवर्ल्डच्या धमकीला भिऊन करण जोहर सिनेमाच्या प्रीमियर वेळी घरी बसला होता

नव्वद च्या दशकामध्ये बॉलीवूड वर अंडरवर्ल्ड ची मोठे दहशत होती. अंडरवर्ल्डचा काळा पैसा या उद्योगात येत होता. त्या सोबत दहशतवाद, हिंसाचार, खंडणी, अपहरण, सेक्स सर्वच वाढत होतं. या दशकात मार्च १९९३ मध्ये मुंबईत सिरीयल बॉम्ब ब्लास्ट झाले होते. त्यामागेही देखील अंडरवर्ल्ड होते आणि त्याचा बॉलीवूड सोबत थेट संबंध होता.

यातूनच अभिनेता संजय दत्त याला अटक करण्यात आली होती.

या दहशतीमुळे चित्रपट निर्माते पुरते घाबरून गेले होते. कधी कुठून कुणाचा काय फोन येईल याची गॅरंटी नव्हती. या दहशतीच्या सावटा खालीच चित्रपट निर्मिती चालू होती. धर्मा प्रोडक्शन यांच्या वतीने १९९८ साली ‘ कुछ कुछ होता है’ या चित्रपटाची निर्मिती झाली. या सिनेमाचे दिग्दर्शक करण जोहर यांनी केले होते.

दिग्दर्शनातील हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यामुळे या सिनेमाच्या रिलीजच्या वेळी ते मोठे उत्सुक होते. शाहरुख खान- राणी मुखर्जी आणि काजोल यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. सिनेमाची गाणी प्रोमो मधून आधीच बाहेर आल्यामुळे चित्रपट रसिकांमध्ये देखील मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. 

१६ ऑक्टोबर १९९८ या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या आदल्या दिवशी या सिनेमाचा प्रीमियर मुंबईच्या लिबर्टी या आलिशान चित्रपटगृहांमध्ये होणार होता. या प्रीमियर ची सर्वत्र मोठे हवा झाली होती. बॉलिवूडमधील प्रत्येक जण या चित्रपटाबद्दलच बोलत होता. दिग्दर्शक करण जोहर याचा देखील हा पहिला सिनेमा असल्यामुळे तो या सिनेमाबद्दल प्रचंड उत्सुक होता. त्याचवेळी एक मोठी घटना घडली ज्या मुळे जोहर कुटुंब हादरून गेलं.

प्रीमियरच्या तीन चार दिवस आधी करण जोहर यांच्या घरचा फोन खानला खणखणला.

हा फोन करण जोहरच्या आईने घेतला. हा फोन अंडरवर्ल्ड करून आला होता. अबू सालेम या टोळीतील एका पंटरचा हा फोन होता. या फोनमध्ये त्याने सांगितले ,” तुमचा मुलगा आता सध्या एका हॉटेलमध्ये माझ्यासमोर बसला आहे. त्याने लाल रंगाचा टी-शर्ट घातला आहे.

मनात आणलं तर मी त्याला आत्ता उडवू शकतो. पण तुम्हाला सावध करण्यासाठी हा फोन केला आहे. या गुरुवारी तुमच्या मुलाचा ‘कुछ कुछ होता है’ रिलीज होतोय. हा सिनेमा तुमच्या मुलाने रिलीज केला तर त्याची काही खैर नाही! 

करण जोहर ला आम्ही जिवंत सोडणार नाही. याला तुम्ही धमकी समजा नाही तर आणखी काही. पण तुमच्या मुलाला तुम्ही समजावून सांगा हा सिनेमा रिलीज करू नका आणि हो पोलिसात जायचा शहाणपणात अजिबात करू नका!” या धमकी वजा फोन मधून करण जोहरच्या आई पुरत्या घाबरल्या. भीतीने थरथर कापू लागल्या. तिने घरातील इतर सदस्यांना बोलून घेतले. करण जोहर देखील घरी आला. तिने सर्वांसमक्ष फोन मधील धमकीचा संदेश सांगितला.

त्या काळात अंडरवर्ल्ड कडून अशा धमक्या वारंवार येत असल्यामुळे सर्वजण खूप घाबरले. पण या फोनची माहिती पोलिसांना देणे गरजेचे आहे असे त्यांना वाटले आणि त्यांनी पोलिसांना या फोनची माहिती दिली. दोन दिवसांनी पोलिसांनी जोहर फॅमिलीला सांगितले, घाबरण्याचे काही कारण नाही. तुमच्या शेड्युलनुसार तुम्ही सिनेमाचा प्रीमियर करा आणि सिनेमा शुक्रवारी रिलीज करा.

फक्त प्रीमियरला करण जोहरला पाठवू नका. त्याला घरीच असू द्या आणि तुमच्या घरी आमच्या पोलिसांचा २४ तास बंदोबस्त असेल. काळजी करू नका.” करण जोहरला आपल्या पहिल्याच सिनेमाच्या प्रीमियर ला जाता येणार नाही हे कळाल्यावर खूप वाईट वाटलं कारण या प्रीमियरला त्याने त्याचा आवडता अभिनेता शम्मी कपूरला देखील बोलावलं होतं आणि शम्मी कपूर देखील झाला होत.

पण आता सिच्युएशन बदलली होती. करण जोहरला प्रीमियर ला उपस्थित राहणे शक्य नव्हते. ठरल्याप्रमाणे गुरुवारी लिबर्टीच्या अलिशान रुपेरी पडद्यावर ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमाचा प्रीमियर झाला. या प्रीमियरला पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. खात्री पटल्याशिवाय कोणालाही आत घेतलं जाऊ देत नव्हतं.

मीडियाला देखील पोलिसांनी विशेष पास देऊनच निमंत्रित केलं होतं.

अभिनेता शम्मी कपूर यांनी आपली उपस्थिती दाखवली. सर्वांना हा चित्रपट खूप आवडला. शम्मी कपूरने तर या सिनेमाचे खूप कौतुक केले. दुसऱ्या दिवशी संपूर्ण देशभर हा चित्रपट प्रदर्शित झाला. डे वन पासूनच या सिनेमाला चांगली लोकप्रियता विशेषतः तरुणाईने या सिनेमावर खूप प्रेम केले. करण जोहर मात्र त्याच्या पहिल्याच सिनेमाच्या प्रीमियर पासून वंचित राहिला. करण ने An unsuitable boy या आपल्या पुस्तकात डिटेल मध्ये हा अनुभव लिहिला आहे.

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.