ओशोंना भारतात आणणाऱ्या माँ लक्ष्मी ज्यांचा गांधी घराण्यात देखील मोठा दबदबा होता.

आचार्य रजनीश ओशो म्हणजे काही लोकांसाठी वादग्रस्त तर काही लोकांसाठी देव आहेत. 

थोडक्यात ओशोंन ओळखणारे तीन गट आहेत. त्यांच्या अनुयायांसाठी देव आहेत तर त्यांच्या विरोधकांसाठी तो एक वादग्रस्त मौलवी आहेत. कारण या गटाला वाटतं कि ओशोंनी लैंगिक मुक्तीला प्रोत्साहन दिले. तसेच रोल्स रॉयल्स आणि महागड्या घड्याळांमध्येच त्यांना अधिक रस होता. एक तिसरा वर्ग देखील आहे, जो ओशोचा अनुयायी नसला तरी त्याच्या सुविचारांनी प्रभावित झालेला असतो. या गटाला वाटतं कि  बुद्धानंतर सर्वात मोठा विचारवंत म्हणजे ओशोच आहेत. असो आपण आज बोलूया ओशोंच्या एका अनुयायीवर, जिचं नाव आहे माँ लक्ष्मी !

लक्ष्मी हि ओशो यांची अनुयायी तसेच पर्सनल सेक्रेटरी होती. 

लक्ष्मी ही मुंबईतील एका जैन कुटुंबातील मुलगी होती, जी लहानपणापासूनच आध्यात्मिक प्रवृत्तीची पण स्वभावाने बंडखोर होती. ती कुटुंबाच्या विरोधात जाऊन आयुष्याचे निर्णय घेतले. मग ते शिक्षण असो वा  लग्न. तिला लग्न करायचे नाही यावर ती ठाम होती.

तिच्या विचारांवर महात्मा गांधींच्या विचारांचा खूप प्रभाव होता. त्यांना प्रभावित होऊन वयाच्या चौतीसाव्या वर्षी, प्रबळ इच्छाशक्ती असलेली लक्ष्मी अखिल भारतीय महिला काँग्रेसमध्ये सामील झाली. दरम्यान काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने पक्षाने एक परिषद आयोजित केली होती.

त्यादरम्यान रजनीश काँग्रेस त्या परिषदेत अतिथी वक्ते होते तर लक्ष्मी सचिव होत्या.

या परिषदेत ओशो आले तेंव्हा सुरुवातीला लक्ष्मीवर ओशोंचा फारसा प्रभाव पडला नव्हता. ती त्यांना  कमी लेखत होती.

पण नंतर ओशोंच्या भाषणाने मात्र लक्ष्मीला अशा प्रकारे संमोहित केले की ती त्या नादात स्टेजवरून गेस्ट स्पीकरचे आभार मानायलाच विसरली. त्यानंतर तिचे आयुष्यच बदलले. लक्ष्मी नानात्र ओशोंच्या आश्रमात राहायला गेली.

ओशोचे तत्कालीन काँग्रेस सरकारशी चांगले संबंध होते.

तसेच लक्ष्मीला देखील इंदिरा गांधींच्या निवासस्थानी थेट प्रवेश होता. तिचे आणि इंदिराजींचे मैत्रीचे सबंध होते.

इंदिरा गांधी यांना त्यांचे वडील जवाहरलाल नेहरूंप्रमाणेच अध्यात्मिक जीवनात रस होता, “द ओन्ली लाइफ: ओशो, लक्ष्मी आणि द वर्ल्ड इन क्रायसिस” मध्ये कवी-कलाकार रशीद मॅक्सवेल म्हणतात कि, विमान अपघातात संजय गांधींच्या मृत्यूनंतर आई इंदिरा गांधींना त्यांचा दुसरा मुलगा राजीव गांधीनी  राजकारणात यावे असे वाटत होते. आणि ओशोच्या सचिव लक्ष्मीची मदत घ्यावी असे त्यांना वाटत होते.

एकदा इंदिराजींनी लक्ष्मीची राजीव गांधींशी ओळख करून दिली होती, जेणेकरून राजकारणात येण्यास नाखूष असलेला आपल्या मुलाचे मान वळवायला कदाचित लक्ष्मीची मदत होऊ शकते. त्यानंतर लक्ष्मी आणि राजीव गांधी यांच्यात तत्वज्ञानावर अनेकदा चर्चा होत असायच्या.

इंदिरा यांच्या लहानपणापासूनच त्यांना ओशोच्या विचारांची ओळख होती मात्र त्या एक महत्त्वाकांक्षी राजकारणी होत्या त्यामुळे त्या प्रत्यक्षात कधीच ओशोच्या आश्रमात गेल्या नव्हत्या नाहीत.

१९७७ पर्यंत जेव्हा इंदिरा गांधींना तात्पुरते सत्तेवरून काढून टाकण्यात आले तेंव्हा,लक्ष्मी यांना ‘ग्रीन पास’ देण्यात आला, तो पास अशासाठी कि, कोणत्याही वेळी काँग्रेस नेत्याला त्यांच्या घरी किंवा कार्यालयात भेटण्याचा अधिकार होता.

राजीव गांधी अनिच्छुक होते पण त्यांनी नंतर राजकारणात प्रवेश केला, त्यांचे मन वळविण्यात अनेकांची भूमिका महत्वाची ठरली त्यात एक नाव म्हणजे लक्ष्मी देखील होते.  राजीव गांधींशी झालेली ही ओळख नंतर रजनीशला अमेरिकेतून भारतात आणण्यासाठी लक्ष्मीच्या कामी आली.

संदर्भ – The Only Life: Osho, Laxmi, and the World in Crisis.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.