दक्षिण भारतातून पार्ले-जी संपल्यात जमा होती, तेव्हा शक्तिमानचा प्रोजेक्ट कामी आला…

भारतात इतर ठिकाणी पार्ले-जी कंपनी चांगली कमाई करत होती. पण दिवसेंदिवस दक्षिण भारतात पार्ले जी बिस्कीटची विक्री घटत चालली होती. यामुळे मार्केटिंग टीम टेन्शन मध्ये होती. दक्षिण भारतात बिस्कीटची विक्री वाढविण्यासाठी काय करता येईल यासाठी खलबत सुरु होती.

पाच सहा महिन्यांच्या अभ्यासानंतर पार्ले कंपनीच्या लक्षात आले की, दक्षिण भारतात पार्लेची विक्री वाढायची असेल तर लहान मुलांना फोकस केलं पाहिजे. त्यासाठी इव्हेंट आयोजित करण्याचे ठरवले. 

हा काळ होता नव्वदीचा.

यावेळी शक्तिमान सिरियल्स लहान मुलांच्या सगळ्यात आवडत्या सिरीयल पैकी एक होती. शक्तिमानला फॉलो करणाऱ्या मुलांची संख्या जास्त होती. 

यामुळे पार्लेजीच्या मार्केटिंग टीमने शक्तीमानला घेऊन इव्हेंट आयोजित करायचे ठरवले. त्या-त्या ठिकाणी शक्तिमान जाईल आणि लहान मुलांना भेटतील असा हा इव्हेंट होता. या इव्हेंट मध्ये सहभागी होण्यासाठी कुठलीही एन्ट्री फी ठेवण्यात येणार नव्हती

इव्हेंटची सुरुवात चैन्नई येथून करायचे ठरले. इव्हेंटपूर्वी चेन्नईतील सर्व शाळांमध्ये जाऊन जाहिरात करण्यात आली. शक्तिमान चेन्नईत येतोय अशा प्रकारची जाहिरात होती. लहान मुलांमध्ये असणाऱ्या क्रेज वरून शक्तिमानची निवड करण्यात आली होती. शक्तिमानला भेटायचे असेल तर एक छोटीशी अट ठेवण्यात आली होती. ती म्हणजे पार्लेजी चे २ पॅकेट विकत घ्यावे लागणार होते.

रेकॉर्डब्रेक मुलं जमविण्यात कंपनी यशस्वी 

या इव्हेंटसाठी चैन्नईत एक मैदान भाड्याने घेण्यात आले. सकाळी ९ वाजता  इव्हेंट सुरु होणार होता. मुकेश खन्ना म्हणजेच शक्तिमान आपल्या ड्रेस मध्ये रेडी होता. पहिल्या अर्ध्या तासात मुलचं आले नाहीत. दहा हजार मुलं जमतील असं आयोजकांचा अंदाज होता. यासाठी लाखो रुपये फी देऊन मुकेश खन्ना बोलविण्यात आले होते. आता कार्यक्रम फेल जाणार यामुळे पार्ले जी वाले टेन्शन मध्ये आले होते

हळूहळू चैन्नईच्या विविध भागातून स्कुल बस मधून शाळकरी मुलं येऊ लागले. थोड्याच वेळात मैदानात १ लाख मुलं जमा झाली. हा काळ होता जेव्हा प्रत्येक लहान मुलासाठी शक्तिमान नायक होता.आपल्या मुलानं शक्तिमानला भेटावं अशी आई-वडिलांची इच्छा असायची. आपल्या नायकाला भेटता आल्याने मुल एकदम खुश झाली होती.  

एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात लहान मुलं जमायची ही पहिलीच वेळ होती. एक प्रकारे हा रेकॉर्डच ठरला होता. दुसऱ्या दिवशी चैन्नईतील सगळ्या न्यूज पेपर मध्ये पहिल्या पानावर फोटो सहित बातमी आली होती. चैन्नईत पार्लेला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. कंपनीला दक्षिण भारतात सक्सेसफुल होण्याचा मार्ग मिळाला होता. 

shaktiman

यानंतर पार्ले-जीने दक्षिण भारतातल्या मोठ्या शहरात अशाच प्रकारच्या इव्हेंटचे आयोजन केले आणि याचा फायदा कंपनीला झाला. आपला नायक पार्ले जी बिस्कीट खायला सांगतो हे गणित या मुलांच्या मनात पक्कं फिट झालं होत. यामुळे ही सर्व लहान मुले पार्ले जी डायरेक्ट कॅनेक्ट झाले होते. दक्षिण भारतात पुन्हा एकदा पार्ले जी बिस्कीट शक्तिमानमुळे घराघरात पोहोचले.   

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.