इंग्लंडच्या राजाकडून सत्कार झालेला मराठवाड्यातला मुलगा म्हणजे शरद तांदळे…

गेल्या दोन दिवसांपासून शरद तांदळे हे नाव चर्चेत आहे. निमित्त ठरलय ते म्हणजे म्हणजे शरद तांदळे यांचे जूने भाषण. या भाषणाद्वारे वारकरी संप्रदायाबद्दल चुकीचे भाष्य करत भावना दुखावल्याचे  मत वारकरी संप्रदायातील लोकांनी व्यक्त केले आहे. 

https://www.facebook.com/100009399333416/videos/2957510804572202/

 

या व्हिडीओवर अनेक संमिश्र भावना व्यक्त करण्यात आलेल्या आहेत. एकीकडे शरद तांदळे यांनी वारकरी संप्रदायाचा अपमान केला म्हणून त्यांना माफी मागण्याचे आवाहन केले जात आहे तर दूसरीकडे शरद तांदळे योग्यच बोलले आहेत अस म्हणणाऱ्यांचा एक वर्ग आहे.

नेमके हे शरद तांदळे कोण आहेत…?

शरद तांदळे हे बीड जिल्ह्यातल्या वंजारवाडीचे. छोटसं गाव. जे त्याच्या वडिलांनी शिक्षक होण्यासाठी सोडलं. ते शिक्षक होवून वंजारवाडीतून बीडमध्ये आले. शिक्षकाचा पोरगा म्हणून शरदची ओळख गावात झाली.

महाराष्ट्रात असणाऱ्या, तालुक्यातल्या गावी स्थलांतरीत झालेल्या शिक्षकांच्या पोरांची आयुष्यं जशी गेली तसच या शरदचं आयुष्य गेलं. 

लहानपणापासून किस्यांनी भरलेलं बालपण. कधीही कुठलाही शिक्षक येणार आणि पोराचे मार्क विचारणार. मग शरद मार्क सांगणार. अधल्या मधल्या मुलांच दुख: हे असतय की ते कुठच ठामपणे नसतात. शरद तांदळे तसेच अधल्यामधल्यांचा हिरो. त्यानं प्रथा आणि पंरपरेप्रमाण ६०, ७० टक्के पाडले आणि इंजनिरिंगला ॲडमिशन घेतलं. 

मराठवाड्यातल्या मुलांच औंरंगाबादच इंजिनिरिंग कॉलेज.

तिथं या पोरानं ॲडमिशन घेतलं. इंजनिरिंगने या अधल्यामधल्या मुलांला जॉब दिला नाही पण एक गोष्ट मात्र नक्कीच दिली ती म्हणजे आपण कायपण करु शकतो. शरदनं तिथं “विजयी युवक” नावाच मॅग्झीन काढलं. त्याला काय करायचं होतं तर तर पोरांना नोकरीला लावायचं होतं. मग शरदचा शरदभाऊ झाला. शरदभाऊ हळुहळु फोकसमध्ये आले. मराठवाड्यातून स्वप्न शोधायला आलेल्या औरंगाबादकरांसाठी तो “शरदभाऊ” झाला.

भाऊ होणारे सगळे राजकारण करतात. मराठवाड्यातल्या मुलासांठी तर तो श्राप असल्यासारखाच वाटतो. शरद देखील त्याच वाटेनं गेला. एका मॅग्झीनमुळे तो हिरो झालेला. त्या मॅग्झीनमध्ये नोकऱ्यांचा विषय तो आणायचा. खरतर पिढ्यांना काय पाहीजे याची अचूक नस त्याला सापडलेली.

पण शरद’भाऊ’च्या नादात कालांतराने जे प्रत्येकाचं होतं तेच शरदच झालं. 

शरदनं वेगळं करायचं म्हणून इंजिनिरिंग नंतर सॅप कोर्स करायचां निर्णय घेतला. आत्ता इंजिनेरिंग नंतर कोर्स करायचा म्हणजे पैसे लागणार होते. त्याच्या आईनं तेव्हा दागिणे घाणवट ठेवले. पोरगं काहीतरी करलं हा दुर्देम्य आत्मविश्वास आपल्या आईबापाच्या अंगात असतोच. पण आईबापाला माहीत नसतं हे पोरगं किती गहाळ आहे. शरदनं आईनं गहाणवट ठेवून घेतलेले ७० हजार रुपये घालवले.

झालं अस की, हैद्राबादला जायच्या अगोदर शरद औंरगाबादमध्ये मित्राकडं थांबला. तिथं पैसे गुल्ल झाले. आत्ता कोर्स तर करायचा होता. तो केला तरच जॉब हातात असणार होता. मग मित्रानं १८ हजार दिले. तो त्या जिवावर हैद्राबादला गेला. उपाशी झोपला, कोर्स पुर्ण केला.

आत्ता अखंड मराठवाड्याचं स्वप्न असतं पुण्यात यायचं. शरद पुण्यात आला. आपण लय भारी कोर्स केलाय या अविर्भावात त्यानं प्रत्येकाची चौकट ट्राय केली. करण्यासारखं काही मिळालं पण नाही आणि त्याला कुणी दारात उभा पण केला नाही. 

अशा वेळेला त्याचा एक इंजनियर झालेला मित्र म्हणला, ट्रान्सफॉर्मच काम आलय करतो का? हा पट्टा लगेच होय म्हणाला. या पठ्यानं ते काम पुर्ण केलं. आत्ता त्याला वाटलं हे कंत्राटदाराचं काम तर जमेल. त्यानं कंत्राटदाराच काम करण्यास सुरवात केली.

कंत्राटदार यासाठी कारण जे पाठीमागे बोलून हिणवलं जातं ते पुढ बोलावं ठसठशीत. शरदनं स्वत:च्या नावापुढं कंत्राटदाराचा विशेषण लावून घेतलं. याच दरम्यान एका मागून एक कामं तो मिळवत गेला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं, जशी UPSC,MPSC करुन स्वप्न बघणारी एक पिढी आहे तशीच मुकादम होवूया म्हणून वाट्टेल ते काम करणारी देखील एक पिढीय. पुर्वाश्रमीच राजकारण शांत बसून देत नव्हतं. त्यानं काय केलं तर,

तीन वर्षात एकशे पच्याहत्तर पोरांना एकत्र आणलं. हि पोरं कॉन्ट्रक्टर होती वाट्टेल ते काम करायची. 

आत्ता बिझनेसमॅन होण्याचा नवा किडा त्याला चावला होता. पण पहिल्यापासून या पोरानं एक गोष्ट नक्की ठरवलेली आपण एकट मोठ्ठ व्हायचं नाही तर सर्वांना घेवून एकत्र लढायचं. शरद तांदळेनं इंडियाना नावाची सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. तरुण उद्योजकांसाठी संपूर्ण भारतात गव्हर्मेंट  डिपार्टंमेंटचे टेंडर दाखवणारं ई- टेंडरवर्ल्ड नावाचं टेंडरिंग सोल्यूशनचे ॲण्ड्राईड ॲप्लिकेशन बनवलं.

पुढं हाउ टू बिकम अ कॉन्ट्रक्टर नावाचा एक कोर्स चालू केला. त्यात गव्हर्मेंटचे कॉन्ट्रक्ट कसे घ्यायचे, काम कशी करायची असल्या शिकवण्या घेण्यास त्यानं सुरवात केली. 

कॉन्ट्रक्टर म्हणजे राजकिय संबध निर्माण करणं, गोड बोलून पैसा चारणं हे गणित त्यानं मोडलं. मी केलं तू पण करु शकतो म्हणून महाराष्ट्रात नव्या कॉन्ट्रक्टर पोरांच त्यानं एक जाळ विणण्यास सुरवात केली. स्वत:ची कंपनी म्हणून प्रवास सुरू झाला आणि बघता बघता कंपनी कोटीत उलाढाल करु लागली. 

अधिकृत कॉन्ट्रक्टर म्हणून शरदच्या तालमीत गरिबाघरची पोरं उभा राहू लागली.

MPSC, UPSC आणि इंजनिरिंगच्या वातावरणात हे क्षेत्र पण आपलं असू शकतय हे मुलांना समजू लागलं. त्याच्या जग बदलण्याची दखल घेतली गेली ती इंग्लंडच्या युवराजाकडून.

इंग्लंडचा युवराज प्रिन्स चार्लकडून त्याचा वायबीआय यंग आंत्रप्रेन्यूअर ऑफ दि इयर, 2013 हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 

आत्ता पुढचा टप्पा सुरू झालेला. खूप पैसा मिळवून स्वत: अंबानी न होता प्रत्येक पोराला छोटाछोटा अंबानी करण्याच्या स्वप्नानं वेग घेतलेला.

एका विमानातून अमेरिकेत जाताना त्याला पुष्पक विमानाची आठवण झाली. आयुष्यात पैसा नावाची गोष्ट आल्यानंतर त्यानं पहिल्यांदा वडिलांना चारचाकी गिफ्ट दिलेली. मधल्या काळात त्याच्या वडिलांच निधन झालेलं. निधनानंतर गरुडपुराणाचे पारायण ठेवण्यात आले होते. यमपुरी कशी? आत्मा कुठे जातो? नचिकेत तिथून कसा परत आला असले विचार झपाट्यानं त्याच्या डोक्यात सुरू झाले.

यातून त्याच्या समोर उभा राहिला तो रावण. 

तांदळेनी भारतात येताच पुण्यातील नेर्लेकर ब्रदर्सकडून पुराणतन वाडग्मय मिळवले, रावण वाचण्यास सुरवात केली. सेट झालेल्या बिझनेसकडे दुर्लक्ष होवू लागलं पण यानं रावणाचा पाठलाग सोडला नाही.

Screen Shot 2018 09 29 at 9.15.48 AM

यात त्याला सल्ले देणारे अनेकजण आले हा नाद वाईट. तू मोठ्ठा माणूस झालायस. पण या पठ्यानं रावण समजून घेतला. रावणावर पुस्तक लिहलं आणि ते बाजारात आलं. सहा आठ महिन्यात या पुस्तकाच्या चार हजारांच्या वरती प्रती विकल्या गेल्या. 

माणसं म्हणून लागली रावण असा होता? असाही रावण असू शकतो हे लोकांना नव्यानं समजू लागलं. दहा तोंडाच्या आणि वीस डोळ्यांच्या रावणानं खूप चांगल्या गोष्टी देखील बघायला शिकवल्या होत्या.

या माणसानं कॉन्ट्रक्टर लाईनीच लोकशाहीकरण केलं याचं क्रेडिट तरी शरद तांदळेंना नक्कीच द्यावं लागतं. कारण पैसा कमवणारी लोकं भरपूर आहेत पण पैसा कमवा हे तरुणांना सांगणारी माणसं कमी आहेत.. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.