या कारणामुळे अमिताभ बच्चनला चारचौघात थोबाडीत खावी लागली होती…

भारतीय सिनेमाचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन यांच्या अभिनय कारकिर्दीतकडे आणि एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे संपूर्ण जगभरात मोठ्या आदराने आणि कौतुकाने पाहिले जाते. संपूर्ण दुनियेतील चित्रपट शौकिनांमध्ये हे त्यांच्या सिनेमाबद्दल मोठे कुतूहल असते.

अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. सोशल मीडियावर त्यांचा या वयातील वावर देखील कौतुकास्पद आहे. त्यांच्या ब्लॉगचे करोडो फॉलोअर आहेत. या ब्लॉग मधून कधीकधी अतिशय मनोरंजक अशी माहिती देखील त्यांच्या चाहत्यांना वाचायला मिळते.

या ‘हायली रिस्पेक्ट’ असलेल्या व्यक्तीला देखील एकेकाळी कुणाकडून तरी चक्क श्रीमुखात खायला मिळाली होती! ही थप्पड रुपेरी पडद्यावरची नव्हती. तर प्रत्यक्ष चार चौघात त्यांना हा प्रसाद मिळाला होता! कुणी केली होती हिम्मत अमिताभ बच्चन यांना थप्पड मारण्याची? काय होता हा किस्सा?

हा किस्सा आहे सत्तरच्या दशकातील. त्यावेळी अमिताभ बच्चन सुलतान अहमद यांच्या ‘गंगा की सौगंध’ या चित्रपटाचे चित्रीकरण हरिद्वारला करत होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत रेखा अमजद खान, प्राण, जीवन आणि सुलोचना यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण हरिद्वार आणि त्याच्या सभोवती असलेल्या लक्ष्मण झूला या परिसरात झाले आहे.

चित्रीकरण संपल्यानंतर याच लक्ष्मण झूला वरून अमिताभ बच्चन आपल्या हॉटेलकडे चालले होते.

त्यावेळी अमिताभ यांच्या कार होती माकडांनी गराडा घातला. या माकडांना तिकडे ‘लंगूर’ असे म्हणतात. पांढरेशुभ्र तोंड आणि ब्राऊनिश कलर असलेल्या या लंगूरची शेपटी भली मोठी असते आणि त्यांच्यात ताकद देखील खूप जास्त असते.

अमिताभ बच्चन यांच्या कारमध्ये काही केळी होत्या. त्याकडे पाहून त्या लंगूरांनी गोंधळ झालेला सुरुवात केली.त्यांना ती केळी खायची होती. अमिताभ बच्चन यांनी आपली कार बाजूला घेऊन ते खाली उतरले. एका छोट्या लंगूरला त्यांनी आपल्या हाताने केळी खाऊ घालायला सुरुवात केली. हा सगळा प्रकार पाहून आणखी काही लंगूर देखील तिथे गोळा झाले. त्यांना देखील अमिताभ केळी खाऊ घालले.

तेवढ्यात समोरून एक लंगूर रागाने त्यांच्याकडे येत होता. अमिताभ बच्चन यांचे त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हते. कदाचित तो या लंगूरांचा ‘सिनियर’ असावा. अमिताभचे त्याच्याकडे अजिबात लक्ष नव्हते. अमिताभ त्या छोट्या लंगूराना केळी खिलवण्यात मशगुल होते. त्या ‘सिनियर’ लंगूर ला आपल्याकडे अमिताभ बच्चन दुर्लक्ष करीत आहेत हे अजिबात आवडले नाही.

त्याचा ‘इगो’ कदाचित दुखावला आणि त्याने सरळ समोर येऊन अमिताभ बच्चन यांच्या श्रीमुखात लगावली!

हा प्रकार इतका अनपेक्षित आणि अचानक झाल्याने क्षणभर कुणालाच काहीच कळले नाही! अमिताभ बच्चन देखील बावरून गेले आणि दुसर्‍या क्षणी त्यांच्या तोंडातून हसू आले. त्यांनी त्याला देखील केळी दिली. अमिताभ चे मेकअप दीपक सावंत यांनी पटकन बिग बी याना कारमध्ये घातले आणि ते हॉटेलच्या दिशेने निघून गेले.

या थप्पड सोहळ्याच्या काही क्षण पूर्वीचा एक फोटो अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर मध्यंतरी शेअर केला होता, आणि त्यांनी हा मजेदार घटनाक्रम वाचकांना विदित केला होता!

– भिडू धनंजय कुलकर्णी

– हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.