टाटा, अदानी, अंबानींसारखे श्रीमंत भारतात असूनही भारतात टॉपच्या मोबाईल कंपन्या का नाहीत
दोन दिवसांपूर्वीची बातमी आठवून पहा. चांगल्या चांगल्या मागे पाडत गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत तर जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहे. याच बरोबर जगातील पहिल्या २० श्रीमंत लोकांच्या यादीत रिलायन्स कंपनीचे मुकेश अंबानी यांचे नाव आहे. तसेच भारतातील आघाडीचा उद्योग समूह म्हणून टाटा कंपनीचे नाव घेतलं जात. मिठा पासून ते कार बनविण्यापर्यंत सगळ्या उद्योगात ही कंपनी आहे.
मोबाईल वापरणाऱ्यांच्या विचार केला तर जगात भारत दुसऱ्या नंबर वर आहे.
तरीही एकही मोठी भारतीय कंपनी मोबाईल बनवत नाही. या सगळ्या मार्केटवर चीनच्या कंपन्यांचा बोलबाला आहे. एवढं सगळं असतांना भारतातील उद्योगपती मात्र स्मार्ट फोन का बनवत नाहीत. मायक्रोमॅक्स सारख्या भारतीय कंपन्यांनी प्रयत्न केला. मात्र त्याला यात यश आले नाही. एकीकडे भारत सरकार सुद्धा मेक इन इंडिया सारखे कार्यक्रम योजना आणत आहे. मात्र यात सुद्धा एकही कंपनी स्मार्ट फोन सुद्धा बनवत नाहीत.
याचे काय कारण आहेत ते पाहुयात.
यासाठी पहिले स्मार्ट फोन मार्केटची पुरवठा साखळी ती कशी चालत पाहायला हवं. या कंपन्यांची साखळी ऍडव्हान्स बेस तयार झाली आहे. त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून पुरवठा साखळी आपले मक्तेदारी निर्माण केली आहे. म्हणजे मोबाईल तयार करण्यासाठी लागणाऱ्या जे काही सुट्टे पार्ट आहे ते तयार या जगातल्या काही ठराविकच कंपन्या करतात.
हे सगळे पार्ट तयार करणे सोपे काम नाही. त्या वस्तूंवर पेटंट मिळविले आहे. जगातील अनेक देशात पेटंटचे नियम खूप कडक आहेत. त्यामुळे त्यांची कॉपी करणं सुद्धा सोपं नसते. त्यामुळे ठराविक अशा ४ ते ५ कंपन्यांची मोनोपॉली म्हणजेच मक्त्तेदारी तयार झाली आहे.
कारचा विचार केला तर. कार बनविण्यासाठी लागणारे सुट्टे पार्ट जसे की, स्टील, नट-बोल्ट, सीट, प्लस्टीक हे काही ऍडव्हान्स नसतं. ते कुठेही जाऊन स्थानिक कंपन्यांकडून तयार करून घेऊ शकतात. खूप जास्त तंत्रज्ञानाचा वापर न करता कार बनवली जाऊ शकते.
असीयु युनिट, इंफोटेन्ट सिस्टीम, चिप सारख्या तसेच ऍडव्हान्स गोष्टी इतर कंपन्यांकडून कार तयार करणाऱ्या कंपन्या विकत घेऊ त्यात लावू शकातात. यामुळे स्मार्ट फोन पेक्षा कार बनविणे सोपे झाले आहे. आज जगातील आघडीच्या अनेक कंपन्या भारतात आपल्या कार बनवत आहेत.
काही ठराविक कंपन्यांची मोनोपॉली
टीसीएमसी या कंपनीची प्रोसेसर मध्ये मोनोपॉली तर सॅमसंग, हायमिक्स, सीगेट सारख्या कंपन्यांची स्टोरेज मोनोपॉली आहे. जगातील स्टोरेज या कंपन्यांचे कॅस्ट्रोल आहे. डिसप्ले बनविण्यात टीसीएस, एलजी, सॅमसंग या कंपन्या शिवाय मोठ्या प्रमाणात दुसरी कुठलीच कंपनी डिसप्ले तयार करू शकत नाही.
हे सगळे वस्तूंवर या या कंपन्यांचे पेटंट आहेत. तसेच हे बनवाय लागणाऱ्या मशीनवर आणि इंजिनियर लागतात ते सगळं कॉम्प्लिकेटेड आहेत. त्यामुळे टाटा, रिलायन्स, अदानी सारख्या कंपन्यांना कितीही पैसे खर्च केले तर मिळवता येत नाही. यामुळे या कंपन्या यात इंटरेस्ट दाखवत नाहीत.
मग या प्रश्न तयार होतो की भारत जर मोबाईलसाठी एवढं मोठं मार्केट आहेत तर या कंपन्या भारतात का येत नाही किंवा त्यांना इथे का आणला जात नाही. तर याच उत्तर आहे. या सगळ्या कंपन्याच हब हे चीन आहे. जर दुसऱ्या देशातील कंपन्या यात मध्ये लुडबुड करणार असेल तर त्याला त्रास देण्याचे काम चीन करतं.
मायक्रोमॅक्स, लावा सारख्या कंपन्यांनी तायवान, साऊथ कोरिया येथील कंपन्यांकडून सुट्टे भाग घेऊन मोबाईल तयार केले होते. मात्र स्मार्ट फोन मधील काही सुट्टे भाग हे चीन मध्ये तयार होतात. मग चीन अशे पार्ट हे या कंपन्यांना मिळू देत नाही त्यामुळे मायक्रोमॅक्स सारख्या कंपन्या बंद पडल्या.
तर एमआय, ओप्पो, विओ सारख्या कंपन्या हे सुट्टे भाग भारतात आणून स्मार्ट फोन तयार करतात. त्यांना स्मार्ट फोन मधील सुट्टे पार्ट मिळविण्यात काहीच हरकत होत नाही. त्यामुळे त्या भारता सारख्या देशात येऊन आरामात मोबाईल बनवू शकतात.
जर टाटा, रिलायन्स सारख्या कंपन्यांनी स्मार्ट फोन तयार करायला गेल्या तर त्यांना सुट्टे पार्ट चीन त्यांना ते मिळू देणार नाही. पुरवठा कसा रोखता येईल यासाठी प्रयत्न करेल. त्यामुळे या कंपन्या वैतागतील. यासाठी भारताला स्वतःची पुरवठा सारखी तयार करता आली तर या भारतीय कंपन्यांना स्मार्ट फोन तयार करणे सोपे जाऊ शकते.
मग काही जण म्हणतात की, जर स्मार्ट फोन मार्केटवर चीनचा एवढा बोलबाला आहे तर ॲप्पल कंपनीने कसा जम बसविला आहे.
यातलं महत्वाचं कारण सांगितलं जात ते म्हणजे जगात सार्वधिक फोन ॲप्पल कंपनीचे विकले जातात. आयफोन विकून मिळणार नफा हा खूप जास्त असतो. तसेच सुट्टे भाग बनविणाऱ्या कंपन्यांकडून ॲप्पल सुट्टे पार्ट बल्क मध्ये घेत. त्यामुळे या कंपनीला वस्तू विकणे हे लहान कंपन्यांचे फायद्याचे असते. त्यामुळे ॲप्पल कंपन्या विरोधात सुट्टे पार्ट तयार करणारे जात नाहीत.
यावर काय उपाय काय आहे मग
ऑलरेडी टाटा सारख्या कंपन्यांनी यावर काम करायला सुरुवात केली आहे. टाटा कंपनी स्मार्ट फोनसाठी लागणारे पार्ट तयार करणार आहे. त्यानंतर स्मार्ट फोन तयार करेल. यासाठी कंपनीने ५ हजार कोटीची इनव्हेसमेंट करून चेन्नई येथे प्लांट सुरू केला आहे. हळूहळू स्मार्ट फोन साठी लागणारे सुट्टे पार्ट तयार करेल.
टाटाची नेलको कंपनी अगोदरच लहान चिप तयार करते. मात्र चैन्नई येथे सुरु करण्यात येणाऱ्या प्लांट मध्ये ऍडव्हान्स तंज्ञानाचा वापर करून सुट्टे पार्ट तयार करण्यात येणार. याच बरोबर सॅमसंग कंपनीने भारतात सर्वात मोठा डिसप्ले तयार करणारा प्लांट उभा केला आहे. यामुळे डिस्प्ले संदर्भात के काही प्रॉब्लेम आहे लवकर सुटतील. वेदांता सारख्या मोठ्या कंपन्या सुद्धा स्मार्ट फोनसाठी लागणाऱ्या सुट्टे भाग बनविण्यासाठी पुढे येत आहे.
पेटंट, डिझाईन सारख्या गोष्टी करतांना काही अडचणी येतात त्यावर भारतात मोठ्या प्रमाणात काम सुरु आहे. यामुळे भारत स्मार्ट फोन भारतात स्वस्त भेटू शकतात. यापूर्वी देखील टाटा, रिलायन्स या कंपन्यांनी फोन बनविले आहेत. मात्र ते चीन मधून सुट्टे भाग मागवून.
हे ही वाच भिडू
- कॅशमध्ये आयफोन घेतला तरी, या जमाना गाजवलेल्या मोबाईल्सची सर त्याला येणार नाही…
- सगळ्या जगातले मोबाईल महाग होत चाललेत यामागं चीन आणि तैवानमधली भांडणं आहेत
- देशातला पहिला मोबाईल कॉल यांनी केला होता..