तालिबानने नवीन फतवा काढलाय..टीव्ही शो मध्ये आता स्त्रिया दिसणार नाहीत.

तुम्ही कधी ऐकलंय का कि भारत सरकारने बॉलीवूडच्या ऍक्टर – ऍक्ट्रेस साठी काही गाईडलाईन्स जाहीर केल्यात….चान्सच नाही…इथं सेन्सॉर बोर्डच्या काही ठराविक गाईडलाईन्स सोडल्या तर इतर कोणतेही बंधनं बॉलीवूडच्या कलाकारांवर नाही..हे बोलायला एक निमित्त म्हणजे पण अफगाणिस्तानात एक अशी घटना घडली आहे…

ती म्हणजे, अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने अलीकडेच ठेथिल अभिनेत्रींसाठी काही गाईडलाईन्स जारी केल्यात. कि अफगाणिस्तानमध्ये दाखवल्या जाणाऱ्या कोणत्याही टीव्ही शो आणि सिरियल्स मध्ये स्त्रिया दिसणार नाहीत…

तुम्ही फक्त कल्पना करा कि तुम्ही एखादी सिरियल्स पाहताय अन त्यात एकही हिरोईन नाही. सगळे पुरुषच आहेत..तर कसं वाटेल ते बघायला ?? म्हणजे आता अफगाणिस्तातल्या टीव्हीवर आता सास-बहु सिरीयल दिसणार हे मात्र पक्कं झालंय. हे ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी ते खरं आहे असंच चित्र आता अफगाणीस्तान मध्ये दिसणार आहे.   

 महिलांच्या पात्राशिवाय टीव्ही सीरियल कशा बनवल्या जातील आणि दाखवल्या जातील हे आता अफगाणीस्तान मध्येच दिसणार आहे.  

काही बातम्यांनुसार, तालिबानने टीव्ही आणि बातम्यांसाठी ८ कलमी धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार, अफगाणिस्तानमध्ये त्या सर्व टीव्ही शोवर बंदी घालण्यात आली आहे, ज्यामध्ये महिला पात्रच कोणत्याही प्रकारे दाखवले जाणार नाही.

पण या गाईडलाईन्स काय आहेत?

काय आहे हा सरकारी फतवा ???

– इस्लाम तसेच अफगाणी मूल्यांच्या विरुद्ध असलेल्या कार्यक्रमांवर बंदी.

– यात प्रेषित महंमद यांच्यासह अन्य धार्मिक नेत्यांच्या प्रतिमाचीत्रणास बंदी.

–  इस्लामवर आधारित या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, महिला न्यूज अँकर आणि महिला पत्रकारांनी हिजाब घालणे आवश्यक आहे. 

– तसेच महिलांना टीव्ही मालिकांमध्ये काम करण्यास किंवा दिसण्यावर पूर्ण बंदी आहे. 

– इस्लाम किंवा शरिया कायद्याची खिल्ली उडवणाऱ्या, पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी भाष्य करणाऱ्या किंवा इतर कोणत्याही धर्माचा आणि सांस्कृतिक मूल्यांचा प्रचार करणाऱ्या सर्व परदेशी चित्रपटांवरही बंदी घालण्यात आली.

यासोबतच चित्रपटांमध्ये पुरुषांचे नग्न अंग दाखवण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

– टीव्हीवर पुरुषांच्या शर्टवरही बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी तालिबानने अल्पवयीन मुली आणि मुलींना शाळेत जाण्यास बंदी घातली होती.

 एवढी जाचक बंधने टाकून तालिबान सरकार म्हणतंय कि, हे नियम नाहीत तर धार्मिक मार्गदर्शन तत्वे आहेत.

 हो सरकारचं म्हणनं आहे कि, वर सांगितलेले निर्देश आदेशात्मक नाहीत, तर धार्मिक मार्गदर्शन तत्व आहे. 

या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्यात महिलांनी अभिनय केला आहे अशी कोणतीही मालिका किंव्हा चित्रपट रिलीज होता कामा नये.  हि मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्याचा उद्देश तालिबान सरकारने सांगितला आहे तो म्हणजे,  मुल्यांचा प्रसार आणि वाईट प्रथांना प्रतिबंध यासाठी सरकारने स्थापन केलेल्या विभागाने हि मार्गदर्शक तत्वे जाहीर केलीत.

या वेळी तालिबान सरकार स्थापन करतांना तालीबानने असं जोशात सांगितलं होतं कि, आपली राजवट  आधुनिक मुल्यांचा पुरस्कार करणारी आहे. पण आज जाहीर केलेले मार्गदर्शक तत्वे पहिली तर सगळं काही उलटंच दिसून येतंय.

अफगाणिस्तान देशात माध्यमांसाठी सरकारने या प्रकारचे आदेश काढण्याची हि पहिलीच वेळ आहे.  मात्र याआधीच्या तालिबान राजवटीत तर टीव्ही आणि चित्रपट तसेच इतर माध्यमांवर बंदी होती.  

अफगाणिस्तानमधील पत्रकारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेच्या हुज्जातुल्ला मुजद्दीदी यांच्या मते, हा नियम अप्रत्याशित आहे. त्यांच्या अंमलबजावणीमुळे, टीव्ही शो बनवणाऱ्या लोकांना त्यांचे व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले जाऊ शकते अशी भीती देखील त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली आहे.

यापूर्वी १९९६ मध्ये तालिबानने अफगाणिस्तानमध्ये अशी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. त्यावेळी महिलांना पूर्णपणे बुरख्यात राहण्याचे आदेश दिले होते. महिला जर रस्त्यावरून चालत आहेत आणि चालता चालता जरी त्यांच्या बुरख्यातून हाताचा, मनगटाचा किंवा पायाचा कोणताही भाग दिसला तर शिक्षा केली जायची. जर ती रस्त्यावरून जाणारी स्त्री तिच्यासोबत एखादा पुरुष नसला तरीही त्यांना शिक्षा केली जात असत.  

अफगाणीस्तान मध्ये आता सास बहुच्या सिरियल्स दिसणार नाहीत हा विनोदाचा भाग सोडला तर हि बाब अत्यंत गंभीर आहे कि, १९९६ मध्ये जी तालिबानची राजवट होती त्यापेक्षाही भयंकर राजवट आत्ता लागू केली जातेय का याची चिन्हे दिसून येत आहेत. 

 

हे ही  वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.