एका बैठकीत १५६ बियर पिणारा ‘अॅड्रयू द जायंट’ हा जगभरातल्या दारूड्यांचा किंग होता !

हालेलुयिया ! काय म्हणता १५६ बियर. 

फेकत असेल !!! फेकत नाही. ऑन रेकार्ड आहे, अधिकृत, अधिकृतरित्या नोंद आहे.

जगात सर्वांधिक बियर एका बैठकीत संपवणारा माणूस म्हणून तो ओळखला जातो. त्याचं नाव अॅंड्र्यू द जायंट.  WWE माहित आहे का माहितीच असायला हवं. नाटकी हाणामाऱ्यांनी भरलेला शो आहे हा. WWE हिंदीत डब झाल्यानंतर तर फायटिंगवरचा विश्वासच उडला. काही लोकांनी तर पुन्हा एकदा केवड्याच्या वासावर आपल्या खीरमध्ये कोणी विष मिसळलेलं त्यावरुन फाईट करणाऱ्या ठाकूरचा सुर्यवंशम बघण्यास सुरवात केली.

असो तर तो WWE भूतकाळात WWF होता तेव्हाची हि गोष्ट. WWF मध्ये एक फायटर होता. सात फूट चार इंच उंचीचा. त्याचं वजन होतं ५०० पोंडच्या दरम्यान. आंद्रे द जाईंट हा WWF चा हेविवेट चॅम्पियन होता. अनेकांना तो आजही लख्ख लक्षात आहे तो होल्क हॉगनमुळे. हॉगन तर काल परवापर्यन्त खेळत होता. आत्ता काय करतो ते माहित नाही. लवकर त्याच्याबद्दल देखील सांगू तुर्तास अंड्रयू द जायंट बद्दल.

twitter

लोकांनी वेगवेगळ्या कारणांमुळे त्याला लक्षात ठेवला पण समस्थ बारकऱ्यांसाठी तो सर्वांधीक दारू पिणारा माणूस म्हणून लक्षात राहिला आहे हे विशेष. 

त्याच्या नावाने आज WWE मध्ये अवार्ड देखील दिला जातो. आजच्या बिग शो सोबत त्याची अनेकजण तुलना करतात पण अॅण्ड्रूय काहीतरी खास होता. तो रेसलर म्हणून काय होता हे इथं सांगण्यात अर्थ नाही त्यासाठी तुम्ही नेटवर असणाऱ्या त्याच्या मॅच देखील पाहू शकता. इथ आम्ही सांगतोय “बारमधल्या एका बाप माणसाबद्दल” 

अॅण्ड्रू हा फ्रान्सचा होता. फ्रान्स आणि वाईनचं नात वेगळ सांगण्याची गरज नाही. अस सांगितलं जात की अॅण्ड्रू द जायंट हा प्रत्येक मॅचच्या पुर्वी किमान सहा सात लिटर वाईन पिवून मॅच खेळण्यासाठी उतरायचा. 

twitter

त्याच खरं कारण होतं ते त्याच्या शरिरयष्ठीतच. त्याच्या अवाढव्य आकारामुळे त्याचे अनेक अपघात झाले होते. अपघात आणि त्यातून ऑपरेशन हे त्याच्या पाचवीला पुजलेलं. त्यातून तो पहिलवान होता. तो देखील WWF चा. मग काय त्याला त्रास कमी करण्यासाठी पिणं गरजेचं होतं. तो पित होता.

त्याच्या पिण्याच्या किस्यांमध्ये एक किस्सा सांगितला जातो तो म्हणजे एकदा बारवर तो नेहमीप्रमाणं बसला. एकामागून एक करत त्याने १०० च्या दरम्यान बियर पिल्या. आत्ता इतक्या बियर पिल्यानंतर चढणारच ना ! त्याला चढली. आणि तो डुलायला लागला. विचार करा साडेसात फुटाचा आणि ३०० किलोचा माणूस पिवून डुलतोय. त्याचा एक झोका तुमच्या अंगावर आला तर तुमचा चौकट राजा व्हायला वेळ लागणार नाही. त्याच्या याच झोक्यामुळं एका माणसाचा चौकट राजा झाला.

मग न्युयार्क पोलिसांनी त्याला सिक्युरिटीच्या नावाने एक पोलिस सोबत दिला. तो पोलिस अॅड्यू सोबत राहत असे आणि अॅड्यू झोके घ्यायला लागला की आसपासच्या लोकांना हटवत असे. 

twitter

त्याच इतकं दारू पिणं मात्र डॉक्टरांसाठी एक कोडच होतं. कितीही झालं तर अल्कोहलच एका विशिष्ट प्रमाणातच पोटात जावू शकत. अॅड्यूच्या पोटाचा आकार जरी विचारात घेतला तरी हे प्रमाण अतीच्या पुढचं होतं अस डॉक्टर सांगायचे. पण डॉक्टरांच कोण ऐकत असत का. अॅड्यू आपला सातच्या ठोक्याला एकतर WWF च मैदान गाठायचा नाहीतर जवळचा बार. 

तो बारचा किंग होताच पण मोठ्या माणसांच्या आतमध्ये वेगळं काहीतरी असतं. HBO ने त्याच्यावर डॉक्युमेंटरी केली. त्याच्या जवळचे लोक सांगतात तो खूप हळवा होता. लहानपणापासून अवाढव्य शरिरामुळे त्याला सर्वजण चिडवायचे. त्याच्या वडलांचा मृत्यू झाल्यानंतर तो अंत्यविधीसाठी पॅरिसला गेला. त्याच दिवशी तो हॉटेलमध्ये मेलेल्या अवस्थेत सापडला. लोकांनी देखील त्याचं त्याच्या वडलांच्या शेजारीच दफन केलं.

आजही तो सुखानं त्याच्या वडिलांच्या शेजारीच आहे. भले जग त्याला दारूड्यांचा किंग म्हणून ओळखो. 

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.