आपल्या करियरच्या शेवटी देखील त्यांनी व्हिव्ह रिचर्ड्सला सलग चार षटकार ठोकले होते

भारतीय क्रिकेटमधल्या १९८३ ची हिस्टॉरिक विक्ट्री मिळवून देणाऱ्या स्टार क्रिकेटर यशपाल शर्माला इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर पोहचवण्यासाठी स्टार अभिनेते दिलीप कुमारांनी मदत केली होती.

तर हा किस्सा असा होता की, 

आपल्या सुरुवातीच्या टप्प्यात यशपाल शर्मा पंजाबकडून रणजी ट्रॉफी खेळायचा. तो रणजी मॅचचा त्यावेळचा स्टार होता. रणजीमध्ये यशपाल एकूण १६० मॅचेस खेळला होता. ८९३३ रन्स केल्या. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने सर्वाधिक २१ सेंचुरी आणि २०१ टॉप स्कोर रन्स केल्या.

आता रणजी सामना बघायला असं विशेष मोठा व्यक्ती येतो हे क्वचितच घडायचं. योगायोगानं युसूफ साब म्हणजे आपले दिलीप कुमार ती रणजी बघाण्यासाठी आले होते. 

यावेळी मैदानावर यशपालची बॅटिंग सुरु होती. त्याने एवढा धुवांधार परफॉर्मन्स दिला की युसूफ साब त्याच्या बॅटिंगच्या प्रेमातच पडले. लगोलग त्यांनी यशपालला भेटण्यासाठी निरोप धाडला. यशपालला निरोप देताना, कोण्यातरी व्यक्तीनं तुम्हाला भेटायला बोलावलंय असा निरोप गेला होता.

झालं यशपाल भेटायला गेला. समोर बघतो तर काय साक्षात दिलीप कुमार त्याच्या पुढ्यात उभे होते. यशपालला शब्दच फुटेनात. दिलीपकुमारांनी यशपालला जवळ बोलावून सांगितलं की,

मी बघितलंय तू चांगलं खेळतोस. मी तुझ्यासाठी बीसीसीआयमध्ये एकाशी बोललोय.

त्यावेळी दिलीप कुमार यांनी राजसिंह डुंगरपूर यांच्याशी बोलणं केलं. आणि त्यानंतर यशपाल शर्मा यांना भारतीय संघात स्थान मिळाले.

पण यशपालला भारत ओळखू लागला ते १९८३ च्या सेमी फायनलमुळे. या मॅच मध्ये यशपालने इंग्लंडविरुद्ध ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर शानदार हाल्फ सेंच्युरी मारली होती. त्या मॅच मध्ये पहिल्या दोन विकेट नंतर मोहिंदर अमरनाथ आणि यशपाल शर्मा पीचवर आले. 

दोघांच्या भागीदारीत यशपाल शर्मान ९२ रन्स केल्या. त्याच्या या शानदार खेळीमुळं भारताला १९८३ च्या वर्ल्डकपच्या फायनलचा मार्ग मोकळा झाला होता.

१९७९ ते १९८३ या कालावधीत यशपाल मिडल ऑर्डर मध्ये भारतीय संघाचा कणा बनला होता.

पंजाबच्या लुधियानाचा असलेला यशपाल शर्मा आपल्या ४० वनडेच्या कारकीर्दीत कधीही शुन्यवर आऊट झाला नाही. १९८३ च्या वर्ल्डकपमध्ये तो भारताचा दुसरा सर्वाधिक रन्स काढणारा बॅट्समन होता.

यशपाल शर्माने भारतीय संघाकडून ३७ वनडे मॅचेस आणि ४२ टेस्ट मॅचेस खेळले. यशपालने १९७८ साली वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वनडेच्या कारकीर्दीत त्यांनी २८.४८ च्या सरासरीने ८८३ रन्स केल्या. तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ३३.४५ च्या सरासरीने १६०६ रन्स केल्या.

आपल्या करियरच्या पडत्या काळात ही यशपाल शर्मा यांनी हार्ड हीटिंग वाला गेम थांबवला नाही. एकदा तर एका फर्स्ट क्लास सामन्यात त्यांनी वेस्ट इंडिजच्या व्हिव्ह रिचर्ड्सला सलग चार बॉलला चार सिक्सर ठोकले होते. अगदी फॉर्ममध्ये नसताना देखील शून्यवत आउट व्हायचं नाही हा विक्रम त्यांनी टिकवला.   

भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर बीसीसीआयनं यशपाल शर्मांच्या खांद्यावर एक जबाबदारी टाकली. ती म्हणजे भारतीय टीमच्या नॅशनल सिलेक्शन कमिटीत त्यांची नियुक्ती केली.  २००३ ते २००६ या काळात आणि नंतर २००८ मध्ये पुन्हा एकदा सिलेक्शन कमिटीत शर्मा होते.

असा हा यशपाल भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या नेहमीच लक्षात राहील.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.