महागड्या ब्रँडिंगच्या स्पर्धेत झुडीओचं आगमन झालं आणि आम आदमीचा ब्रँड उभा राहिला

शाळा कुठलीही असो पण एक गोष्ट हमखास शिकवली जाते की, अन्न, निवारा आणि वस्त्र या तीन आपल्या मनुष्य प्राण्यांच्या मुलभूत गोष्टी आहेत. आता अन्न आणि निवाऱ्याबाबत विविधता पहायला मिळेल. तसं कपड्यांबाबतही आहे म्हणा पण त्यात एक गोष्ट कॉमन लागते ती म्हणजे ब्रॅंड.

चारचौघात मिरवायचं म्हंटलं की, ब्रँडेड कपडे हमखास पाहिजेचं. पण या ब्रँडेड कपड्यांच्या नादात खिशाला लयं मोठी झळं बसते राव. म्हणजे हाय क्लास सोसायटीच्या लोकांची बात काही और आहे…पण मिडल क्लास लोकांचं लयं अवघडं होऊन बसतं.

पण भिडू ही परिस्थिती होती 1998 पर्यंतचं, कारण 1998 साली आम आदमीचा ब्रँड असलेल्या झुडिओचं आगमन झालं. आणि मिडल क्लास लोकांच्या ब्रँडेड कपड्यांच्या तिढा सुटला. आणि तो सोडवला प्रत्येक भारतीयांचा आयडॉल असणाऱ्या टाटा घराण्यानचं.

म्हणजे कसं ना आपल्या भारतात कुठल्याही गोष्टीची कमतरता जाणवली की, टाटा घराणं मसिहा बनून येतचं. मग ती छोटी गोष्ट असो किंवा मोठी, या प्रकरणात सुद्धा तसचं काहीसं झालं.

लेडीज, जेन्ट्सपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांसाठीचं स्वस्तात मस्त आणि ब्रँडेड कपडे मिळण्याचं हे डेस्टीनेशन. आणि फक्त कपडेचं नाही तर शुज, बेल्ट, डिओड्रंटसाठी सुद्धा झुडिओ फेमसं आहे.

टाटा ग्रुपच्या ट्रेंड लिमिटेडचा एक भाग आहे. सध्या या ट्रेंड लिमिटेडची म्हणजे झुडिओची मालकी नोएल टाटा यांच्याकडे आहे. नोएल टाटा म्हणजे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ. त्यांचा ट्रेंड लिमिटेडमध्ये झुडिओ बरोबरचं वेस्टसाइड, स्टार बझार, झारा असे इतर ब्रँडसुद्धा आहेत.

तशी कंपनीची सुरुवात ही 1998 मध्ये जरी झाली असली तरी त्याचं पहिलं ऑफलाईन स्टोअर सुरु झालं 2016 मध्ये. बंगळुरूमधील कमर्शियल स्ट्रीट येथे 8,000 चौरस फूट एरियात हे शॉप सुरु झालं. आणि काही वेळातचं ब्रँड कस्टमरच्या पसंतीस उतरला.

आपल्या बजेटमध्ये आणि तेही हाय क्वालिटी म्हंटल्यावर रांगा लागणं साहाजिकचं होतं. त्यामुळे लवकरचं तो एक मास मार्केट ब्रँड बनला. अगदी कॉलेजात जाणाऱ्या पोरा – पोरींनासुद्धा परवडू शकेल असा हा ब्रँड आहे. कपड्यांच्या आणि रंगाच्या व्हरायटीसोबत कंपनीने क्वालिटी सुद्धा तितकीच मेंटेन केलीये. आणि फक्त कपड्यांबाबतचं नाही तर त्यांचे बाकीचे प्रोडक्ट सुद्धा कमी किमतीत पण बेस्ट क्वालिटीतं असतात. आणि तेसुद्धा मॉलवाल्या फिलींगसोबत. 

हे म्हणजे एका दगडात तीन पक्षी. म्हणजे कसं शॉपिंग सुद्धा होते, मॉलमधील कपडे घेतल्याचं सुख वाटतं आणि खिशाला सुद्धा जास्त भार सहन करावा लागत नाही. 

काही वेळातच फुल फेमस झालेल्या या ब्रँडेची सध्याची नेटवर्थ म्हणाल तर करोडोंच्या घरात आहे. आज जर बघितलं तर कंपनीचे 70 पेक्षा जास्त शहरांमध्ये 160 च्या आसपास स्टोअर्स आहेत. आणि भविष्यात कंपनी आणखी स्टोअर्स सुरू करण्याच्या तयारीत आहेत.

हे ही वाचं भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.