‘फिजिक्सवाला’ : शिकवण्याचा नादात व्हिडीओ सुरू केले, आज ८ हजार कोटींची कंपनी झाली

कोरोनामुळे सलग दोन वर्ष शाळा बंद होत्या. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचे महत्व वाढले आहे. गावातील मुलांनासुद्धा दर्जेदार शिक्षण मिळावेयासाठी मुलांचे आई वडील आग्रही आहेत. मात्र, भारतात ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या कंपन्यांची फी ही सर्वसाधारण लोकांना परवडणारी नाही. 

मात्र, याला एक स्टार्टअप कंपनी अपवाद ठरली आहे. गावातील मुलांनासुद्धा जेईई, नीट सारख्या परीक्षा देता याव्यात यासाठी कमीत कमी पैशात चांगले शिक्षण देत आहे.

उत्तरप्रदेश मधील प्रयागराज येथील एका तरुण शिक्षकाने २०१४ मध्ये फिजिक्सवाला नावाने युट्युब चॅनेल सुरु केले होते.

आता याच फिजिक्सवाला या स्टार्टअप कंपनीचे व्हॅल्यूवेशन ८००० कोटींपेक्षा पेक्षा जास्त झाली आहे. फिजिक्सवाला याने ८००० कोटींची इन्व्हेस्टमेंट  वेस्टब्रिज कॅपिटल आणि जीएसव्ही व्हेंचर्सकडून उभारली आहे. 

एकीकडे बायजु, अनॲकॅडमी सारखे ऑनलाईन शिक्षण देणारे स्टार्टअप कंपन्या अडचणीत येत आहे. या कंपन्यांनी काही कर्मचारी सुद्धा कमी केले आहेत. तर दुसरीकडे फिजिक्सवालाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात इनव्हेसमेंट करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे.   

कमी किंमतीत चांगले शिक्षण मिळावे यासाठी अलख पांडे या तरुण शिक्षकाने फिजिक्सवाला हे युट्युब चॅनल सुरु केले होते. तर २०१६ मध्ये कंपनीची स्थापना केली.  

शिकवण्याच्या नादाने युट्युब चॅनेल सुरु केले होते.  

अलख पांडे ला ८ वीला असतांना पासून शिकविण्याचा नाद होता. गल्लीतील इयत्ता ४ च्या मुलांचे  क्लास अलख घेत. फिजिक्स आवडत असल्याने त्यांनी मॅकेनिकल इंजिनियरिंग घेतले होते. इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असतांना दुसऱ्या क्लास मध्ये जाऊन शिकवत असे. 

क्लास घेतांना जीवनात काही तरी मोठे करायचे अस अलखला नेहमी वाटत होते. कमी किंमतीत चांगले शिक्षण मिळावे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. २०१४ पासून अलख पांडे ने युट्यूबवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली होती. 

अलखला अनेक कंपन्यांनी कोटी रुपयांची ऑफर दिली मात्र त्याने फिजिक्सवाला कंपनी विकली नाही. 

आता फिजिक्सवाला कंपनीचे व्हॅल्यूवेशन १ बिलियन पेक्षा जास्त झाली आहे. ते फक्त विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या प्रतिसाद. फिजिक्सवाला भारताची १०१ वा युनिकॉर्न बनली आहे. वेस्टब्रिज कॅपिटल आणि जीएसव्ही व्हेंचर्सकडून १० कोटी डॉलर इनव्हेसमेंट केली आहे. मिळलेल्या पैशातून फिजिक्सवाला कंपनीचा विस्तार, ब्रँडिंग, देशातील इतर शहरात ऑफलाइन क्लास सुरु करण्याची फिजिक्सवाला कंपनीची योजना आहे. 

क्लास घेऊन पैसे कमविणे हे ध्येय कधीच नव्हते असं अलख पांडे नेहमी सांगतो.

एप्रिलनंतर युनिकॉर्न क्लबमध्ये सामील होणारी फिजिक्सवाला ही दुसरी कंपनी बनली आहे. यानंतर फिजिक्सवाला स्टार्टअपचे संस्थापक अलख पांडे यांनी सांगितले की, केजी पासून ते १२ वी  पर्यंतच्या अभ्यासक्रमावर विशेष लक्ष देणार आहेत.

तसेच पांडे यांनी सांगितले आहे की, प्लेस्टोर वरून डाउनलोड फिजिक्सवाला या कंपनीचे ५२ लाख विद्यार्थांनी ऍप डाउनलोड केले आहेत. तर ६९ लाख लोकांनी फिजिक्सवाला युट्युब चॅनेल सबस्क्राईब केले आहे. २०२०- २१ मध्ये फिजिक्सवाला क्लास मधील १० हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी NEET आणि JEE सारख्या परीक्षा पास झाल्याचा कंपनीने दावा केला आहे. 

अलख पांडे यांच्या मतानुसार फिजिक्सवाला कंपनीत १ हजार ९०० कमर्चारी असून त्यातील ५०० जण हे शिक्षक असून त्याची १०० जण एक्सपर्ट आहेत. तर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी २०० सहयोगी प्राध्यापक आहेत. महत्वाचं म्हणजे प्रश्न काढण्यासाठी आणि पेपर तयार करण्यासाठी २०० शिक्षक आहेत.

२०२१-२२ मध्ये कंपनीच्या महसूलात ९ पटीने वाढ झाली आहे.

फिजिक्सवाला कंपनीची सुरुवात झाल्यापासून ही कंपनीत फायद्याचे सांगितले जाते.  २०२०-२१ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये कंपनीचा महसूल नऊ पटीने वाढला आहे. 

तसेच फिजिक्सवाला कंपनीतर्फे पुढच्या काही दिवसात बंगाली, मराठी, तमिळ, तेलगू, गुजराती, ओडिया, मल्याळम आणि कन्नड यासह नऊ स्थानिक भाषांमध्ये फिजिक्सवाला कंपनी अभ्यासक्रम सुरु करणार असल्याचे सांगण्यात येत आहेत. 

तसेच कंपनीतर्फे देशभरात १८ शहरात २० ऑफलाइन कोचिंग क्लासरूम देखील सुरु करण्याचा केल्याचे सांगण्यात आले. त्याला पाठशाला असे नाव दिले असून त्यात १० हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 

मागच्या काही दिवसात स्टार्टअप कंपन्यांना इनव्हेसमेंट मिळण्यास अडचण येत आहेत. एज्युटेक कंपन्यांनी २०२२ च्या सुरुवातीपासून ३ हजार ७०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. लॉकडाऊन नंतर आता शाळा, महाविद्यालये सुरु झाले आहेत. त्यामुळे ऑनलाईन एज्युकेशन देणाऱ्या बायजु, अनॲकॅडमी सारख्या कंपन्या संकटात सापडत असतांना फिजिक्सवाला कंपनीचा विस्तार वाढत आहे. 

वेस्टब्रिज कॅपिटलचे व्यवस्थापकीय संचालक संदीप सिंघल यांनी सांगितले की, कमी पैशांमध्ये चांगले शिक्षण देऊन फिजिक्सवाला कंपनीने विद्यार्थ्यांचा ट्रस्ट मिळविला आहे. फिजिक्सवाला कंपनीला भारतीय विद्यार्थांना आवश्यक असलेला अभ्यासक्रमाची माहित आहे. त्यामुळे कंपनीत इनव्हेसमेंट केल्याचे सिंघल सांगतात. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.