जयवंतराव टिळक, शरद पवारही ट्रॅफिकमध्ये अडकले अन् घाटातल्या ट्रॅफिकचा प्रश्नच सुटला

रोजच्या ट्रॅफिक जाम मुळे सर्वसामान्य जनता हैराण होते. सरकारच्या नावाने बोटं मोडली जातात पण त्याने काही फरक नाही. पण आता फरक पडेल असं वाटतंय कारण कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाहनांचा ताफा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पुणे शहरानजीक अडकलेला. 

त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चांदणी चौकातील ट्रॅफिकचा प्रश्न मनावर घेतला. बेकायदा ट्विन टॉवर पाडण्यासाठी वापरलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करत चांदणी चौकातला पूल जमीनदोस्त करणार अशी घोषणा त्यांनी केली. तर याच दिवशी रामदास आठवले ट्रॅफिकमध्ये अडकले होते. नेते मंडळी आता ट्रॅफिकने हैराण झाल्यामुळे आता ट्रॅफिकची समस्या फारच मोठी आहे याची जाणीव सर्वच स्तरावर दिसून येतेय.

जोपर्यन्त या ट्रॅफिक मध्ये एखादा मोठा नेता अडकत नाही तोपर्यंत तिथला प्रश्न सुटत नसतोय हे राज्याने यापूर्वी अनुभवले आहे. याचबाबतचे दोन किस्से बघुयात..

 पहिला किस्सा म्हणजे जयवंत टिळक यांचा… 

या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बॅ. अब्लुल रेहमान अंतुले होते तर पुण्याचे जयंतराव टिळक हे अंतुलेंच्या मंत्रिमंडळात वीजमंत्री होते.  

तर किस्सा असा घडला की, मुंबईत कॅबिनेटची बैठक होती. पण पुण्यात रात्री एका कार्यक्रमात वेळ झाल्याने जयवंतराव टिळक रात्रीचा प्रवास टाळत पुण्यातच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून टिळक बैठकीला निघाले. मात्र ते त्या बैठकीला वेळेत पोहचू शकले नाहीत.

खंडाळ्याच्या घाटातली ट्राफिक जाम ही प्रवाश्यांसाठी डोकेदुखी ठरत असायची. याच पुणे-मुंबई प्रवासात बोरघाटात चार ते पाच तास जयवंतराव टिळक वाहतूक कोंडीत अडकले होते. या ट्रॅफिकमुळे हे पुणे-मुंबई अंतर पार करायला अनेकदा सात ते आठ तास लागत असत असत.

त्यावेळी मोबाईल नव्हते. टिळक का आले नाहीत ? अंतुलेंनी बैठकीत सगळ्या मंत्र्यांना विचारले. अधिकची चौकशी केली तेव्हा कळाले की, टिळक पुण्याच्या घाटात ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत.

मुंबईत पोहचताच जयंतरावांनी मुंबईत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. 

इकडे बॅ. अंतुले यांनी कॅबिनेटच्या बैठकित निर्णय घेतला की, “संबंधित घाटात वाहतुक वारंवार जाम होती, हे वारंवार निदर्शनास आले आहे. म्हणून हा घाट तोडा. मंत्र्यांना एवढा त्रास सहन करावा लागत आहे तर सामान्य माणसांना किती त्रास होत असावा”. सारी यंत्रणा हलली आणि घाटात पर्यायी रस्ता उभारण्यास सुरुवात झाली.

जयंतराव टिळक यांच्या पुढाकाराने अंतुले मुख्यमंत्री राहिलेल्या दिड वर्षाच्या काळात घाटात दुहेरी रस्ता आणि उंचवटे तोडण्याचे काम अर्धे झाले. वाहतूक कोंडी काही प्रमाणात सुटली होती. आज विकसीत झालेल्या एक्सप्रेस हायवेचे श्रेय अंतुले यांच्या या पहिल्या निर्णयशक्तीला आहे.

जयंतराव टिळक हे वाहतूक कोंडीत अकडले आणि त्यांनी पाठपुरावा केल्यानेच या रस्त्याचं काम लवकर पार पडलं.

दुसरा किस्सा शरद पवारांचा…

ही तेंव्हाची गोष्ट आहे जेंव्हा राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार होते. तेंव्हा छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मुंबईहून नाशिककडे जाताना कसारा घाट लागतो. या कसारा घाटातल्या ट्रॅफिकचा प्रश्न मोठा अडचणीचा होता. छगन भुजबळ हे त्यासाठी पाठपुरावा करीत होते. 

मुंबई-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव अनेक वर्षे कागदावरच होता. या मार्गावरच्या रुंदीकरणाच्या कामाला केंद्र सरकारकडून परवानग्या मिळत नव्हत्या.  

या घाटातील वाहतूक कोंडीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फटका बसला होता. या ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्यामुळे वाट काढत पवार यांनी वाहनांचा ताफा सोडून काही अंतर चालत पार केले होते. 

शरद पवार ट्रॅफिकमध्ये अडकले आणि त्यांनी काही अंतर पायी चालल्यामुळे ही मोठी बातमी झाली होती. 

पवार दिल्लीत पोचताच त्यांनी राष्ट्रीय महामार्ग, वन व संबंधित यंत्रणांची बैठक बोलाविली. पवारांच्या पुढाकारामुळे महामार्गाच्या रुंदीकरणातील परवानगीचे अडथळे दूर झाले. त्यानंतर भुजबळ यांनी तातडीने कार्यवाही करून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आणि मुंबई-नाशिक महामार्ग रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.