ॲम्ब्युलन्ससाठी मोदींचा ताफा थांबला, मनमोहन सिंगांच्या काळात तीन जणांनी प्राण गमावले होते

नरेंद्र मोदी यांच्या दौरा होणार आणि चर्चा होणार नाही असं क्वचितच होतं. सध्या ते दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्यादरम्यान अशी एक गोष्ट घडली की त्याची देशभर चर्च होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ताफा गुजरातमधील रस्त्यांवर जात असताना ॲम्ब्युलन्सला वाट करून देण्यासाठी थांबवण्यात आला.

पंतप्रधान मोदी अहमदाबादहून गांधीनगरला जात असताना ही घटना घडली आहे. भाजपच्या नेत्यांकडून आणि पक्षाच्या हँडेलवरून जो व्हिडिओ व्हायरल केला जात आहे त्यामध्ये मोदींच्या ताफ्यातील वाहनं रस्त्याच्या बाजूला थांबली आहेत आणि ॲम्ब्युलन्सला मार्ग मोकळा करून देण्यात आल्याचं दिसत आहे.

गुजरात भाजपच्या ऑफिशियल ट्विटर हॅण्डलवरून खरे प्रधानसेवक या कॅप्शनखाली हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हीआयपी कल्चरच्या विरोधात अनेक पावलं उचलली आहेत त्यातलच हे एक उदाहरण असल्याचं सांगितलं जात आहे. देशातल्या व्हीआयपी कल्चरबद्दल आधीच सामान्य नागरिकांमध्ये राग आहे. हेच लक्षात घेउन तर मोदी यांनी ही कृती केली नाही ना असं देखील विचारलं जात आहे.

कारण जेव्हा मंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा जातो तेव्हा तासंतास रस्ते बंद केल्याचे अनुभव आपल्याकडे अनेकांनी घेतले आहेत. 

यामध्ये ॲम्ब्युलन्ससारख्या इमर्जन्सी वाहनांना वाट करून नं दिल्याने मृत्यू झाल्याच्या घटना देखील समोर आल्या होत्या. अगदी पंतप्रधानांच्या ताफा जात असल्यामुळे ॲम्ब्युलन्स हालली नाही आणि पेशंटला प्राणाला मुकावं लागल्याच्या घटना या देशाने पहिल्या आहेत.

विशेषतः पंतप्रधानपदाच्या काळात अशाच तीन घटना घडल्या होत्या ज्याने देशभर चर्चा झाल्या होत्या.  पहिली घटना घडली होती नोव्हेंबर २००९ मध्ये चंदीगडमध्ये घडलेली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग चंदीगडाच्या दौऱ्यावर होते. पोस्ट ग्रॅजुएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल (पीजीआय)कॉलेज या चंदीगडमधील कॉलेजमध्ये पंतप्रधान कॉन्व्हेकेशन समारंभासाठी आले होते. 

मात्र त्यावेळी पंतप्रधानांचं येणं सुमित वर्मा या ३२ वर्षांच्या तरुणाच्या जीवावर बेतलं.

अतिशय आजारी असलेल्या सुमित वर्माला त्याच्या कुटुंबीयांनी अंबाला येथून चंदीगडला नेले होते, जिथे त्याला एका खाजगी रुग्णालयात डायलिसिससाठी दाखल करण्यात आले होते. परंतु जेव्हा त्याला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला तेव्हा त्याला पीजीआयमध्ये नेण्यात आले परंतु हॉस्पिटलकडे जाणारे बहुतेक मार्ग ब्लॉक केलेले आढळले. पंतप्रधानांची सुरक्षेसाठी केलेल्या अरेंजमेंटमुळे सुमित वर्मा वेळेत हॉस्पिटलला पोहचू शकला नाही आणि त्याचा मृत्यू झाला.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांना या घटनेमुळे प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले.

जेव्हा पंतप्रधान दिल्लीला पोहचले तेव्हा पंतप्रधान कार्यलयाकडून या घटनेबद्दल माफी मागण्यात आली आणि दुःख व्यक्त करण्यात आलं होतं.  

त्यांनतर २०१० मध्ये देखील अशाच घटना चालू राहिल्या. जुलै महिन्यात पंतप्रधान मनमोहन सिंग कानपुर दौऱ्यावर होते. त्याचवेळी अमन खान या ८ वर्षाच्या मुलगा अपघातात जखमी झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेणं आवश्यक होतं मात्र पंतप्रधानांसाठी केलेल्या सुरक्षेच्या अरेंजमेंटमुळे तो टायमिंगला पोहचू शकाल नाही आणि त्याचा मृत्यू झाला असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला होता.

 त्यानंतर सोनिया गांधी यांनी लिहलेल्या पात्रात अमनच्या आईने माझ्या मुलासारखी परिस्थिती दुसऱ्यावर येऊ नये त्यासाठी काळजी घेण्याची विंनती केली होती. 

पंतप्रधानांच्या सुरक्षा अधिकार्‍यांनी (एसपीजी) अमनच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला होता परंतु तो प्रवास करत असलेल्या कारचा मार्ग वळवण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता असं म्हटलं होतं. पुन्हा डिसेंबरमध्ये देखील असाच प्रसंग घडला. 

अनिल जैन या व्यक्तीला रुग्णालयात नेत असताना राजघाटाजवळ रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाला.

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ताफ्याला जाण्यासाठी रस्ते अडवल्यामुळे त्यांना वेळेवर रुग्णालयात ताफ्याच्या हालचालीसाठी राजघाटावर दहा मिनिटे वाहतूक ठप्प झाल्याचे मान्य करून पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचं त्यावेळी सांगितलं होतं. 

यांनंतरही व्हीआयपीना स्पेशल ट्रीटमेंट देण्याच्या नादात सामान्य नागरिकांचा मृत्यू झाल्याची उदाहरणं समोर आली होती. त्यामुळे मोदींच्या ऍम्ब्युलन्सला वाट करून देण्याच्या घटनेकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पहिले जात आहे.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.