थरूर… सॉरी अभिनेता चंद्रचुड सध्या काय करतो..?

सोशल मिडियावर चर्चा सुरु आहे ती काँग्रेसचे शशी थरूर आणि टी.एम.सी खासदार महुवा मोइत्रा यांच्या फोटोची. तुम्ही म्हणत असाल हेडिंग तर अभिनेता चंद्रचूड सिंहचं दिलं आहे आणि स्टोरी शशी थरूर यांची का सांगत आहेत ? तर विषय असा आहे की काँग्रेसचे शशी थरुर आणि अभिनेता चंद्रचूड यांच्या दिसण्यात असलेलं साम्य. शशी थरुर यांचे वेगवेगळे फोटो व्हायरल होतायत आणि दिसण्यामुळे चर्चा होतीये ती, अभिनेता चंद्रचूड सिंहची.

तेरे मेरे सपने, माचीस, बेताबी सारखे हिट देणारा चंद्रचूड सिंह सध्या काय करतो म्हणून विचारलं जातंय.

११ ऑक्टोबर १९६८ रोजी चंद्रचूड सिंहचा जन्म उत्तरप्रदेश मधील अलिगढ येथे झाला. त्याला लहानपणापासून पिक्चरची आवड होती. त्यासाठी त्याने क्लासिकल म्युसिकचा क्लास सुद्धा लावला होता. तो शाळेत असल्यापासून नाटकात सहभागी होत असे. शाळा आणि कॉलेजे झाल्यानंतर चंद्रचूडने दिल्लीतील वसंत व्हॅली शाळेत संगीत विषय शिकवायला सुरुवात केली होती. मध्यंतरी प्रसिद्ध अशा डून स्कुल मध्ये इतिहास विषय शिकवत होता. 

तर दुसरीकडे चंद्रचूड अभिनेता होण्याची इच्छा सुद्धा कमी झाली नव्हती. १९८८ ला दिल्ली सोडून तो मुंबईत आला. १९९० मध्ये चंद्रचूडला एका पिक्चर मध्ये काम मिळाले पण त्याच शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही. त्याच पुढचे ५ वर्ष त्याला कुठल्याही पिक्चर मध्ये रोल मिळाला नाही मात्र त्याने बॉलिवूड मध्ये काम करण्याची जिद्द सोडली नाही. 

असिस्टंट डारेक्टर म्हणून चंद्रचूड सिंहने बॉलीवूड मध्ये एन्ट्री केली. 

चंद्रचूडची रोल असणारा पहिला पिक्चरच शूटिंग मध्येच बंद पडल्याने त्याच स्वप्न अर्धवट राहिलं. मात्र दुसरीकडे अनिल कपूर, अनुपम खेर, गोविंदा, मीनाक्षी शेषाद्री असा स्टार कास्ट असणारा आवारगी पिक्चर आला होता. महेश भट हे या पिक्चरचे डायरेक्टर होते. याच पिक्चरचा असिस्टंट डायरेक्टर म्हणून चंद्रचूडला काम मिळाले होते. हा पिक्चर बॉलीवूड मधील क्लासिक म्हणून ओळखला जातो.     

त्यानंतर चंद्रचूडने प्यार किया तोह डरना क्या आणि द वेटर इन स्लो मोशन या शॉर्ट फिल्म मध्ये काम केलं मात्र हे दोन्ही पिक्चर रिलीजच झाले नाही. 

चंद्रचूडला ब्रेक अमिताभ बच्चन यांच्या प्रोडक्शन हाऊसमुळे. चंद्रचूड बॉलीवूड मध्ये काम करण्याची भरपूर इच्छा होती. तसा तो मेहनत सुद्धा घेत होता. मात्र नशीब साथ देत नसेल तर कामच होत नाहीत. असंच चंद्रचूड सिंहच्या बाबतीत झालं. मात्र तो हार मानणारा नव्हता. तो अनेक ठिकाणी ऑडिशन देत होता. 

शेवटी जया बच्चन यांनी ‘तेरे मेरे सपने’ च्या ऑडिशनसाठी बोलवलं. जया बच्चन यांनी चंद्रचूड यांची ‘तेरे मेरे सपने’ साठी चंद्रचूड यांची निवड केली. हर्षद वारसी, प्रिया गिल आणि सिमरन अशी स्टार कास्ट या पिक्चर होती. ३ कोटींचं बजेट असणाऱ्या या पिक्चरने १३ कोटींची कमाई केली होती. चंद्रचूड याने केलेल्या कामाची चांगली प्रशंसा करण्यात आली होती. 

‘तेरे मेरे सपने’ मधील काम पाहून त्याचं वर्षी चंद्रचूड याला माचीससाठी निवड करण्यात आली. त्याच्या सोबत ओम पुरी, तब्बू आणि जिमी शेरगील सारखी तगडी स्टारकास्ट होती. यात चंद्रचूड याने क्रिपाल सिंहचा रोल सगळ्यांच्या लक्षात राहिला होता. माचीससाठी चंद्रचूडला फिल्म फेअरचा बेस्ट मेल डेब्यू  अवार्ड मिळाला होता. 

१९९५ मध्ये हा पिक्चर रिलीज झाला मात्र अजूनही पॉलिटिकल थ्रिलर म्हणून माचीस नाव घेतलं जात. चप्पा चप्पा चरखा चले गाणं अजूनही अनेकजण गुणगुणत असतात. २ कोटींचं बजेट असणाऱ्या या पिक्चरने ६३ कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. याच पिक्चर मध्ये के के आपलं पाहिलं गाणं ‘छोड आये हम ये गलिया’ हे गाणं गायलं होत.

चंद्रचूड काम पाहून त्यांना १९९७ मध्ये बेताबी मध्ये घेण्यात आले. मात्र या पिक्चरने म्हणावा तसा प्रभाव पाडला नाही. १९९९ मध्ये चंद्रचूडला सलग ४ पिक्चर मध्ये काम मिळाले. सगळे पिक्चर हे तगडी स्टार होती. दिल क्या करे, दाग द फायर, सिलसिला है प्यार का सारख्या पिक्चर मध्ये काम केलं.

दिल क्या करे हा पिक्चर प्रकाश झा हे डायरेक्टर होते. यात अजय देवगण, महिमा चौधरी काजोल सारखे तगडे स्टार कास्ट होती. चंद्रचूड सोम दत्तची भूमिका केली होती. ९ कोटी बजेट असणाऱ्या या पिक्चरने १९ कोटी ६९ लाखांचा कमाई केली होती.

दिवसेंदिवस चंद्रचूडच्या कामाची चर्चा होत होती.

चंद्रचूडला मोठ्या स्टार कास्ट सोबत काम करण्याची संधी मिळत होती. १९९९ मध्येच दिल क्या करे नंतर दाग द फायर सारख्या पिक्चर मध्ये संजय दत्त, महिमा चौधरी आणि चंद्रचूड मेन रोल मध्ये होते. चंद्रचूड याने वकिलाचा रोलची चांगलीच चर्चा झाली होती. यानंतर सिलसिला है प्यार का मध्ये मेन ऍक्टर चंद्रचूड होता. 

२००० साली आलेल्या जोश पिक्चर मध्ये शाहरुख खान, ऐश्वर्या राय यांच्या सोबत चंद्रचूड ने काम केलं.   सपोर्टींग ऍक्टरसाठी नॉमिनेशन मिळाल होत. मात्र या पिक्चरला बॉक्स ऑफिस काही जास्त कमाई करता आली नाही. याच वर्षी आलेल्या क्या कहना रिलीझ झाली. यात चंद्रचूड यांनी अनुपम खेर, सैफ अली खान, प्रीती झिंटा यांच्या सारख्या सोबत काम केलं होत. 

१९९५ ते २००० चा काळ चंद्रचूडसाठी गोल्डन काळ होता. २००१ मध्ये चंद्रचूडचा एक अपघात झाला आणि त्याच्या करायला उतरती कळा लागली. यानंतर २००२ मध्ये त्याने जुनून, भारत भाग्य विधाता, मोहब्बत हो गयी है तुमसे सारख्या पिक्चर मध्ये काम केलं मात्र त्याची फारशी चर्चा झाली नाही. 

२०१३ मध्ये झिला गाजियाबाद सारख्या एखाद्या दुसऱ्या मोठ्या पिक्चर मध्ये काम मिळालं. पण म्हणावे तसा रोल त्याला मिळाला नाही. लहान मोठे काम त्याला करावे लागले. २ सप्टेंबर ला डिजनी हॉट स्टार आलेल्या कट पुतली या पिक्चर मध्ये अक्षय कुमार सोबत पुन्हा एकदा चंद्रचूड सिंह दिसला. मात्र ९० चा काळ गाजवणारा चंद्रचूड नव्हता.                

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

  

Leave A Reply

Your email address will not be published.