माश्याबद्दलच्या या अजब गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का ?

भारतातील एकूण भूभागापैकी बराचसा भाग पाण्याने वेढलेला आहे. समुद्र, नदी अशा निसर्गाच्या सौंदर्याची प्रतीके आपल्याला देणगी म्हणून मिळाली आहेत. या पाण्यातील सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे मासा. मत्स्यअवतारातील देव म्हणून असो किंवा लहानपणी छंद म्हणून पकडलेले विहिरीतले लहान मासे असो अथवा मिटक्या मारून खालेले मासे असो. भिडू हे मासे विविध कारणांनी आपल्या आयुष्यातील महत्वाचे घटक आहेत. याच माश्यांबाबतच्या काही खास गोष्टी आज तुम्हाला सांगायच्या आहेत.

  • जास्तकरून मासे अंडे देतात परंतु काही मासे जसे कि “पंधरा शार्क” सारखे मासे छोट्या माश्यांना जन्म देतात. “पंधरा शार्क” मासा आपल्या शरीराचे तापमान वाढवू शकतो त्याच बरोबर अतिशय थंड पाण्यात देखील टिकून राहू शकतो.
  • काही माश्यांच्या जातीमध्ये नर मासा हा मादी माश्यापेक्षा आकाराने लहान असतो. जगातील सर्वात लांब मासा म्हणजे “व्हेल (Whale)” मासा हा ६० फुट लांबीचा व २५ टन वजनाचा असून त्याला ४००० दात असतात.
  • जास्त करून चांगल्या प्रतीच्या लिपस्टिक ब्रांड मध्ये माश्यांची चरबी मिळवलेली असते.
  • सगळ्यात जास्त काळ जगणारा मासा हा ऑस्ट्रीलिया मध्ये आढळण्यात आला, २०१३ मध्ये या माश्याचे वय ६५ वर्ष होते.
  • जास्तकरून काही मासे जिभेने नाही तर आपल्या शरीराने स्पर्श करून त्याचा स्वाद ओळखतात.
  • शार्क असा एकमेव मासा आहे त्याच्या डोळ्यांना पापण्या असतात.
  • “इलेक्ट्रिक ईल(Electric eels)” नावाच्या माश्यामध्ये एवढी वीज असते कि त्याला स्पर्श करताच एखाद्या माणसाचा मृत्यू होऊ शकतो.
  • जास्त करून मासे पाण्याच्या उलट्या दिशेने नाही पोहू शकत.
  • मासे देखील पाण्यामध्ये बुडून मरु शकतात, मनुष्या प्रमाणेच त्यांना देखील जगण्यासाठी ऑक्सिजन ची गरज असते आणि जर पाणी दुषित असेल तर मासे श्वास घेऊ शकत नाही आणि त्या पाण्यातच बुडून मरु शकतात.
  • स्टारफिश (Starfish) नावाच्या माश्याकडे मेंदू नसतो परंतु ह्या माश्याची त्वचा अनोखी आहे जी त्याला आजूबाजूच्या परिसराची जाणीव करून देते.
  • गोलिअथ टाइगर फिश (goliath tigerfish), हा मासा इतका भयानक आहे कि तो मगरीला देखील खाऊन टाकतो.
  • फ्रील्ड शार्क (Frilled shark) हे एक शार्क माश्यांमधील प्रजात आहे, ज्याचा गर्भकाल हा ३-५ वर्षाचा असतो.
  • माश्यांच्या सेवना नंतर दुध किंव्हा दही खाल्याने त्वचेवर पांढरे डाग पडतात.
  • हजारो मासे माणसांनी फेकलेला कचरा व प्लास्टिक पिशव्या खाऊन मरतात.
  • काही शार्क मासे आपल्या जीवनकाळात स्वतःचे ३०,००० दात हरवतात आणि हे शार्क मासे पृथ्वी वर ४० करोड वर्षांपासून जिवंत आहेत.
  • वैद्यानिकांचे असे मानणे आहे कि जगभरात मिळून ३२,००० जातीचे मासे आहेत.
  • शार्क मासा एका वर्षात जवळ जवळ १२ लोकांना मारतो, परंतु मनुष्य प्रत्येक एक तासाला साधारण पणे ११,४१७ शार्क मासे मारतात.
  • काही वाळवंटातील मासे जसे कि “(Desert Fish)” हे उच्च तापमानात देखील राहू शकतात. हे डेझर्ट फिश 40° C तापमानात देखील जिवंत राहतात.
  • एक “मडस्कीपर (mudskipper)” मासा जास्त करून पाण्याच्या बाहेर राहतो आणि हा मासा आपल्या पंखांच्या मदतीने जमिनीवर देखील चालू शकतो.
  • एनाब्लेप्स (Anableps) नावाच्या माश्याला ४ डोळे असतात, हा मासा एका वेळी वर, खाली, उजवी कडे व डावी कडे चारही बाजूना पाहु शकतो.
  • सगळ्यात विषारी मासा म्हणजे “स्टोन फिश (stone fish)”, हा मासा खाल्यावर काही क्षणातच मृत्यू होऊ शकतो.
  • सगळ्यात वेगाने पोहणारा मासा म्हणजे “सैल फिश (sailfish)” हा मासा रस्त्यावर चालणारऱ्या कार पेक्षाही अधिक वेगाने पोहतो.
  • एक गोल्डफिश (goldfish) मासा फक्त ३ सेकंदासाठी गोष्टी लक्षात ठेऊ शकतो.
  • डॉल्फिन हा मासा पाण्याच्या खाली देखील २४ किलोमीटर पर्यंत चा आवाज ऐकू शकतो.
  • एक नीळा व्हेल नावाचा मासा न खाता ६ महिने जिवंत राहू शकतो.
  • जेलीफिश (jellyfish) मासा पृथ्वी वर ६५ करोड वर्षांपासून जीवित आहे.
  • सगळ्यात हळू पोहणारा मासा म्हणजे “सीहॉर्स (seahorse)”मासा. हा इतक्या हळूवार पणे पोहतो जणू काही एखादे वृद्ध मनुष्य च चालत आहे.

हे ही वाचा भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.