या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहित असतील तरच तुम्ही स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेवू शकता.

नरेंद्र मोदी. भारतीय राजकारणात २०१३-१४ साली त्यांना भारतीय जनता पक्षाने प्रचारप्रमुखपदाची सुत्रे दिली. पुढे तेच पक्षाचा पंतप्रधानपदाचा चेहरा असतील असा एकमुखी ठराव मांडला आणि मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ च्या इलेक्शन भाजपने लढवल्या. 

बघता बघता देशात मोदी लाट आहे. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकार हा शब्द देखील गायब होवून मोदी सरकार हा एकमेव शब्द परवलीचा झाला. मोदी हैं तो मुमकीन हे प्रचाराचे प्रमुख सुत्र झालं. मोदी आणि शहा असतील तर निवडणुका जिंकणारच या समीकरणातून देश अजून बाहेर पडू शकला नाही. एक्झिट पोलचा अंदाच आला फिरसे मोदी हे जवळपास फिक्स झालं. एक्झिट पोल चुकले तर देशाचा रोख पुन्हा एकदा मोदींनाच निवडून देईल हे अनेक राजकीय जाणकार स्पष्ट करत आहेत. 

गेल्या पाच साडेपाच वर्षात मोदींची लाट निर्माण करणारा सर्वात महत्वाचा फॅक्टर म्हणजे मोदीभक्त.

मोदीभक्त हे फेसबुकवर मोदींनी केलेली कामे लोकांपर्यन्त पोहचवू शकले. विरोधक बऱ्याचदा मोदीभक्तांवर टिका करतात पण अशा प्रकारे स्वत:चे भक्त निर्माण करण्यास गेल्या पंधरा वीस वर्षाच्या राजकारणात कोणताच नेता यशस्वी झाला नाही हे देखील नक्की. 

असो तर तुम्ही स्वत:ला मोदीभक्त म्हणून घेत असला, तुम्हाला नरेंद्र मोदीबद्दलचे हे सामान्य प्रश्न ठावूक असायलाच हवेत. 

 

१) नरेंद्र मोदी लहानपणी काय विकत असत ? 

  • अ) पिझ्झा 
  • ब) ढोकळा-फाफडा 
  • क) चहा 
  • ड) वर्तमानपत्र 

२) नरेंद्र मोदींच्या मतानुसार ते किती वेळ झोपतात ? 

  • अ) 3 तास 
  • ब) 4 तास 
  • क) 5 तास 
  • ड) 6 तास 

३) नरेंद्र मोदी लहानपणी कशाच पिल्लू घेवून घरी गेले होते ? ते आईच्या सांगण्यावरून परत सोडून आले ? 

  • अ) कुत्र्याचे 
  • ब) मगरीचे 
  • क) सापाचे 
  • ड) डुकराचे 

४) नरेंद्र मोदींनी अमेरिकेतून कोणत्या विषयात कोर्स पुर्ण केला आहे ? 

  • अ) M.B.B.S
  • ब) M.B.A
  • क) मॅनेटमेंट अॅण्ड पब्लिक रिलेशन 
  • ड) इतिहास 

५) नरेंद्र मोदींच लग्न वयाच्या कोणत्या वर्षी झालं ? 

  • अ) १६ वर्ष 
  • ब) १४ वर्ष 
  • क) १७ वर्ष 
  • ड) १८ वर्ष 

६) अमेरिकेने मोदींना किती वर्ष व्हिसा दिला नव्हता ? 

  • अ) ९ 
  • ब) १० 
  • क) १२ 
  • ड) १३ 

७) नरेंद्र मोदींवर कोणाचा प्रभाव आहे? कोणाची पुस्तके मोदींनी वाचली आहेत? 

  • अ) सी. विद्यासागर 
  • ब) म. गांधी 
  • क) स्वामी विवेकानंद 
  • ड) महात्मा फुले 

८) मोठे झाल्यानंतर नरेंद्र मोदींना कोणत्या क्षेत्रात काम करायचे होते ? 

  • अ) सर्कस 
  • ब) लष्कर 
  • क) अभिनेता
  • ड) राजकारण 

९) राजकिय नेत्यांमध्ये सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांमध्ये मोदींचा क्रमांक कितवा लागतो? 

  • अ) पहिला 
  • ब) दूसरा 
  • क) आठवा 
  • ड) पंधरावा 

१०) नरेंद्र मोदींचा चष्म्याच्या आवडता ब्रॅण्ड कोणता आहे ? 

  • अ) बुल्गेरी 
  • ब) रे बॅन
  • क) वर्साचे 
  • ड) यापैकी कोणताच नाही 

११) नरेंद्र मोदींना एकूण किती भाऊबहिण आहेत ? 

  • अ) ३ 
  • ब) ४ 
  • क) ५ 
  • ड) २ 

१२) नरेंद्र मोदी कोणत्या कंपनीच सीम कार्ड वापरतात ? 

  • अ) रिलायन्स जिओ 
  • ब) एअरटेल 
  • क) व्होडाफोन 
  • ड) आयडिया. 

रिझल्ट. 

चहा, पाच तास, मगरीचे, मॅनेजनेंट इन पब्लिक रिलेशन, अठरा, ९, स्वामी विवेकानंद, लष्कर, दूसरा, बुल्गेरी, पाच, व्होडाफोन.

 तुम्ही सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे दिली असतील, तर तुमच्याहून मोठा मोदीभक्त अन्य कोणीच नाही. ८ ते १० प्रश्नांची उत्तरे बरोबर असतील तर मोदीभक्त होण्याच्या मार्गावर आहात. ८ हून कमी असतील तर प्रयत्न करा मोदीभक्त व्हाल. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.