क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच एक आंतरराष्ट्रीय टीम अवघ्या ६ धावांवर ऑल आउट झाली आहे.

एखादी गोष्ट आपल्याला आवडत असेल तर त्याबद्दलचे रंजक आणि मजेदार किस्से कायमच आपल्या आठवणीत असतात. मग ते चित्रपटाच्या बाबतीत असो नाही तर क्रिकेटच्या किंवा अजून कुठल्या बाबतीत असो. क्रिकेट म्हणले तर अनेक किस्से, मॅच, रेकॉर्ड्स आजही आपल्याला जसेच्या तसे आठवतात.

अशीच एक गंमतीदार क्रिकेट मॅच दोन दिवसापूर्वी झाली.

तर या मॅच मध्ये झाल अस की, समोरच्या संघाने केवळ ४ बॉल टार्गेट पूर्ण केल. होय, रवांडाच्या महिला क्रिकेट संघाला एका टी-२० मॅच मध्ये लक्ष्य पूर्ण करायला फक्त ४ बॉल खेळावे लागले. महिला टी-२० टूनामेंट मध्ये रवांडा संघाचा माली संघाशी सामना होता. या मॅच मध्ये माली टीम केवळ ६ धावा काढून ऑल ऑउट झाली.

women cricket

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये इतका कमी स्कोर बनण्याची ही पहिलीच वेळ होती. आजपर्यंत कुठल्याच पुरुष किंवा महिला क्रिकेट संघाने इतका स्कोर केलेला नव्हता. त्यामुळे माली महिला क्रिकेट संघाच्या नावे हा अनोखा इतिहास जमा झाला आहे.

यात ही मज्जा अशी की केवळ एक रन बॅटने तर बाकी पाच रन एक्सट्रा होत्या.

रवांडाची राजधानी किगाली सिटी मध्ये रवांडा आणि माली संघात ती-२० मॅच खेळवली गेली होती. या मॅच मध्ये माली संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याच्या निर्णय घेतला. पण कुणाला माहित होत की पूर्ण संघ ६ धावांवर बाद होऊन जाईल. तसे तर माली संघाने ९ ओवेर्स खेळल्या पण ९ ओवेर्स मध्ये त्यांच्याकडून फक्त एकच रन निघाला. तो एक रन सलामीची फलंदाज मरियम बनवू शकली होती. उरले दहा खेळाडू आपले खातेही न उघडता पॅवेलीयन मध्ये परतले होत्या. बाकी पाच रन्स एक्सट्रा रन्सच्या रुपात मिळाले होते.

रवांडाची १९ वर्षीय वेगवान गोलंदाज जोसीन नायरनकुंदीनेजा हिने एक रन हि न देता तीन विकेट्स घेतल्या. याशिवाय मैरी डीयाने व लेग स्पिनर मार्गेट वेमुलिया यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतलेल्या. बेमेनयिआमाना हिच्या तीन ओवेर्स मध्ये २ रन्स निघालेले, त्यातला एक रन बॅटने निघालेला तर दुसरा वाईड बॉलवर मिळालेला.

माली टीमच्या तीन फलंदाज बोल्ड तर तीन फलंदाज कॅच झाल्या होत्या. शिवाय दोन पायचीत व दोन रनऑऊट देखील झालेल्या. त्यानंतर रवांडा संघाने ६ धावांचे लक्ष्य केवळ ४ बॉल्स मध्ये पूर्ण केल. सलामीच्या फलंदाज एंटोनिएटी आणि जोसीन नायरनकुंदीनेजा यांनी संघाला १० विकेट्सनी विजय मिळवून दिला.

जेव्हा ४ धावांवर ऑल ऑऊट झाली होती U-१९ महिला टीम

माली टीमच्या नावावर तर हा इतिहास झाला आहे पण ही काही पहिली वेळ नाही ज्यात संघ ६ किंवा त्यापेक्षा कमी धावांवर ऑलऑऊट झालेला. याआधी सुद्धा मल्लापुरमच्या पेरिनथलमन्ना स्टेडीयम वर खेळल्या गेलेल्या महिलांच्या U-१९  मॅचमध्ये कसारागोडची पूर्ण टीम केवळ ४ धावांवर ऑलऑऊट झाली होती. या मॅच मध्ये सगळ्या फलंदाज बोल्ड झाल्या होत्या आणि जे चार रन्स मिळाले होते ते एक्सट्रा रन्सच्या रुपात मिळाले होते.

असे इतिहासात पहिल्यांदाच घडलेले की, संघाचा एकही फलंदाज खाते न उघडताच पॅवेलीयन मध्ये परतला होता आणि ते ही सगळे बोल्ड आउट झाले होते. ही मॅच वायनाड संघाविरुद्ध होती आणि वायनाड ती १० विकेट्सने जिंकली होती.

त्याआधी फेब्रुवारी २०१७ मध्ये एक अशी मॅच झाली होती ज्यात नागालंडची महिला U-१९ ची टीम फक्त २ रन्स काढून बाद झाली होती. केरळच्या विरुद्ध खेलेल्या या मॅचमध्ये नागालंडची ओपनर मेनका सिंह हिने केवळ रन काढला होता आणि एक रन वाईड बॉलवर मिळाला होता. ही मॅच केरळने २९९ बॉल शिल्लक ठेऊन जिंकली होती. केरळच्या पारीचा पहिलाच बॉल वाईड होता आणि पुढच्या बॉलवर अंशू एस राजूने चौका मारत संघाला विजय मिळवून दिला होता.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.