मौजे, खुर्द, बुद्रूक आणि कसबा, गावाच्या नावातला हा फरक कसला?

रिकाम्या डोक्यात काय ना काय घुसतच. असाच एक प्रश्न एका भिडूच्या डोक्यात घुमायला लागला.

आत्ता जिथं कमी तिथ आम्ही या न्यायानं फक्त टाईप करायचं कष्ट घेवून त्या फंटरने आम्हाला प्रश्न पाठवला ? 

प्रश्न काय होता तर, 

ते गावागावात खुर्द आणि बुद्रुक असा फरक कसाकाय असतोय. आणि मौजे हि काय पदवी आहे काय. बरं ते कसबा पण लागलीच सांगा. 

अरे मित्रा एका वेळी एक विचार की, सगळ्या गावाचा बाजार एकदम कशाला मांडायलायस. अस उत्तर ठोकून द्याव अस आमच्या मनात आलं पण म्हणलं राहूदे. असले प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडत असतात.

म्हणलं एकदा हा प्रकार काय असतोय ते विस्कटून सांगावच. 

तर सुरवातीला गाव. गाव हा शब्द गाई अथवा गो या शब्दापासून जन्माला आला आहे. म्हणजे सुरवात करायची झाली तर अश्मयुगापासून कराय लागेल. झालं अस की माणूस जंगलात भटकत होता. कालांतराने शेतीचा शोध लागला आणि माणूस स्थिर झाला. शेतीसाठी बैल हा उपयुक्त पशू. बैल आला म्हणजे गाई पण आलीच. तर माणूस एका ठिकाणी घर करून समूहाने राहू लागला आणि आजूबाजूची जागा शेतीसाठी वापरू लागला. या क्षेत्रात गाई चरायला जात. आत्ता ज्या क्षेत्रात गाई चरायला जात असत ते क्षेत्र गाईचं क्षेत्र म्हणून उल्लेखलं जावू लागलं. त्यावरूनच गाईची सिमा निर्धारित झाली. त्यालाच गावाचे क्षेत्र असे समजले जावू लागले.

गाई या शब्दाच्या अपभ्रंशातून गाव हा शब्द तयार झाल्याचं सांगितल जात. गाव या शब्दाच मुळ शोधत असताना फिल्मी वाटणारी हिच स्टोरी मिळते. 

आत्ता खुर्द आणि बुद्रुक यातला फरक.

काही गावांच्या पुढे खुर्द लिहलं जात तर काही गावांच्या पुढे बुद्रुक. उदा ऐतवडे खुर्द आणि ऐतवडे बुद्रुक. साधारण अशी गावे जुळी असतात. म्हणजे त्या दोन गावांमध्ये जास्त अंतर नसतं. पण वेगवेगळी ओळख निर्माण होण्याइतकं जास्त देखील असतं.

यापैकी ज्या गावापुढे बुद्रुक ते गाव मोठ्ठं. बुद्रुक हा बुजुर्ग या फारसी शब्दाचा अपभ्रंश आहे. बुजुर्ग म्हणजे मोठ्ठा किंवा थोरला. तर खुर्द देखील फारसी शब्द आहे. खुर्दचा अर्थ किरकोळ. मुख्य ठिकाणा शेजारी असणारी किरकोळ वस्ती म्हणजे खुर्द. 

आत्ता राहिलं मौजे, कसबा.

पैकी मौजे हा शब्द अरबी आहे. मौजअ अथवा मौझा या अरबी शब्दांवरुन हा शब्द भारतात आला. या शब्दाचा अर्थ गाव असाच होतो. तर दूसरा शब्द कसबा. कसबा हा शब्द उत्तर अमेरिकेतल्या Quasah या शब्दावरुन आला आहे. हे दोन्ही शब्द मुघल आक्रमणासोबत भारतात आले. कसबा या शब्दाचा अर्थ बाजारपेठेचं ठिकाण असा होतो. याचा दूसरा अर्थ मुळ गाव किंवा जूनं गाव असा देखील आहे. 

तर असा सगळा प्रकार आहे खुर्द, कसबा, मौजे आणि बुद्रुक मधला. तुमच्या गावात देखील हे शब्द असले तर चौकात जावून माहिती सांगा. एकतर इंप्रेशन तरी पडेल नायतर पोरगं रिकामे धंदे करायलय म्हणून दणकं तरी मिळतील. शुभेच्छा. 

हे ही वाच भिडू. 

4 Comments
  1. रोहन मोरे says

    तुमच्या पोस्ट नेहमी वाटत असतो. जेव्हा पोस्ट पूर्ण होते तेव्हा त्या पोस्टच्या Tagline एवढी विशेष अशी माहिती मिळत नाही काही तरी राहिले आहे असे वाटते. त्यामुळे जे वाचले आहे त्याचे पूर्ण समाधान मिळत नाही. म्हणून आपणांस एक विंनती आहे कि आपण पूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न करा.

  2. Harshad Satav says

    Pls find meaning of word ” Uruli”
    Uruli Devachi, Uruli Kanchan etc.
    It will help us to know meaning of name of native place.
    Thanks.
    You are posting very interesting and rare information.

  3. Arjun MS says

    Fake information, incomplete study and this is the result of above fake information

  4. Milind Desai says

    Very nice information. I thought….. khurd has been derived from खुद्द and बुद्रुक is inferior… but ots the opposite.
    One more query तर्फे काय प्रकार असतो.
    For ex. Vadavali tarfe poulbar

Leave A Reply

Your email address will not be published.