खरच शेतकरी केमिकल खतं वापरलेला विषारी भाजीपाला खायला देतात का..?

आमचं खतं कसदार आहे, ह्यावरून चालू आठवड्यात युवा राजकारण पहायला मिळालं. विषय शेतीचा आणि खताचा/मातीचा निघाला म्हणून सांगतो.

गच्चीवरील मातीविरहीत बाग, खिडक्यांच्या जाळीमधल्या फुलांच्या कुंड्यामधल्या भाजीपाला आणि हायड्रोपोनिक्स शेतीच्या गमती शहरी भागांत ऑफिस अनेक्सीत-कॅब मधल्या प्रवासात ते अगदी दोन बिल्डिंगच्या गॅलरी कट्यावर उभ राहत, फॅमिली व्हाट्सअप ग्रुपवर आलेल्या व्हिडीओ-फोटोग्राफ्सचे दाखले देत चर्चिले जातात.

ह्या चर्चांमध्ये शेतकरी केमिकल खतं वापरून पिकवलेला विषारी भाजीपाला खायला देतात हा असंवेदनशील आरोप तर आवडता झालाय हल्ली.

असो तर युवा नेत्यांच्या भाषणाच्या निमित्ताने खतं कसदार असतं की नसतं हे समजून घेऊ आधी. 

खतं दोन प्रकारची असतात सेंद्रीय आणि केमिकलयुक्त. 

दोन्ही खतांमध्ये NPK(नायट्रोजन,फॉस्फरस, पोटॅशियम) याच प्रमाण ठरवून बनवलं जातं. सेंद्रीय खतांमध्ये NPK सोबत मायक्रो न्यूट्रियंट आणि ट्रेस मिनरल्स जसे सल्फर,बोरॉन, कल्शियम,आयोडीन,आयर्न इत्यादी इत्यादी असे समाविष्ट असतात, जे कमर्शियल खतांमध्ये नसतात. खतांचा मुख्य फायदा जमिनीचं pH रेग्युलेट करणं, जमिनीचं टेक्सचर-मायश्यूर रेग्युलेट करणं आणि सूक्ष्म जिवाणूंची वाढ करून पिकाच्या मुळांना न्यूट्रियंट मिळवून देण हा असतो.

अॅनिमल वेस्ट जसं (कत्तल खाण्यामधील वेस्ट, हाडे खराब मांस इत्यादी), अॅनिमल एक्सक्रेटा(मलमूत्र,मानवी मलमूत्र), पीट(मॉसेसे-भुसा-पालपोचळा,व्हे />जिटेबल वेस्ट), मॅन्युर(शेण गाई-म्हैस-बैल-रेडा-शेळी मेंढी सर्व सारखं इथे गाईचं अस काही प्राध्यान्य नसत), बायो स्लरी, पोट्री वेस्ट(शीट वगैरे), फिश बोन इत्यादी चांगल्या प्रकारच्या सेंद्रिय खतांसाठी कंटेंट असावे लागतात.

सोशल मिडियावरच्या चर्चांमध्ये पेंग्विनच्या एक्सक्रेटा पासून खतं निर्मिती होतं असावी असा मोठा सूर पण आला तर, त्यांच्यासाठी आम्ही सांगू इच्छितो पेंग्विनमुळे कोणतंच खतं मिळतं नाही पण चित्रामध्ये पेंग्विन सारख्याच दिसणाऱ्या सीबर्ड पासून मात्र कम्पोस्ट मिळतं, ज्याला Guano Compost म्हणून संबोधतात. Guano Compost वटवाघूळ आणि सीबर्ड यांच्या एक्सक्रेटा पासून बनतं, ज्यात NPK च प्रमाण सर्वांत जास्त असल्याने परदेशात ऑरगॅनिक फार्मिंग मध्ये याची मोठी मागणी देखिल आहे.

केमिकल खतांमध्ये NPK च प्रमाण कस्टमाइज असल्याने ऍक्युरेट असतं, ज्याने कमर्शियल पिकांसाठी फायदा होतो, त्याबद्दल अधिक विस्ताराने बोलावं लागेल. (मी फक्त सेंद्रीय खतांचा वापर व्हावा या मताचा अजिबात नाही, मला स्वस्त पडत/वाटतं बनवतो आणि वापरतो)

जमिनीच्या pH बद्दल तर pH म्हणजे अॅसिडीक आणि अल्कलाईन यांच प्रमाण, हे प्रमाण शून्य ते १४ मध्ये मोजल जात, ज्यात pH ७ असणं म्हणजे न्यूट्रल असणं, याची लोवर व्हॅल्यू म्हणजे जास्त अॅसिडीक असणं आणि जास्त व्हॅल्यू म्हणजे जास्त अल्कलाईन असणं.

ह्यात अजून सूक्ष्म मृदा परीक्षण पद्धती आहेत.

जसं मातीच pH क्लासिफिकेशन, ज्यात pH ६.१ ते ६.५ म्हणजे कमी ऍसिडीक, pH ५.६ ते ६.० म्हणजे माफक प्रमाणात ऍसिडीक, ५ ते ५.५ म्हणजे जास्त ऍसिडीक, pH ४.५ ते ५ म्हणजे अधिक जास्त प्रमाणात ऍसिडीक, ३.५ ते ४.४ म्हणजे एक्सट्रीम ऍसिडीक आणि < ३.५ म्हणेज अल्ट्रा ऍसिडीक असं वेगवेगळ्या गटात केलं जातं.

मातीतल pH ओळखण्यासाठी काही पद्धती आहेत, ज्यात सर्वांत स्वस्त पद्धत म्हणजे pH ओळखण्याच सोल्युशन वापरून मृदा परीक्षण, ज्यात मातीच सॅम्पल सोल्युशन सोबत मिसळ जातं, त्यानंतर बदलणार सोल्युशनच्या रंगावरून ठरवलं जात माती ऍसिडीक आहे की अल्कलाईन. दुसरी पद्धत असते ती लिटमस पेपर टेस्ट ज्यात पाण्यासोबत माती मिसळून लिटमस पेपर द्वारे ठरवलं जातं मातीचा pH. तिसऱ्या पद्धती मध्ये इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस द्वारे pH ठरवलं जातो, ज्यात pH ची अचूक वर्गवारी देखिल माहीत होते आणि चौथी पद्धत आहे ती स्पेक्ट्रोफोटोमॅट्रिक पद्धत ज्यामुळे अधिक मृदपरिक्षणात पारदर्शकता येते.

माती अल्कलाईन असेल तर देखिल याची वर्गवारी होत असते, जसं pH ७.४ ते ७.८ असेल तर कमी अल्कलाईन, pH ७.९ ते ८.४ म्हणजे माफक प्रमाणात अल्कलाईन, ८.५ ते ९ म्हणजे अधिक अल्कलाईन. अल्कलाईन जागेत शेती करणं कठीण असतं, ज्यात भातशेती सारखी उत्पादन घेतली जातात पण ह्यात देखिल अधिक समस्या असतात.

कोणते फॅक्टर अफेक्ट करतात जमिनीचं pH कमी किंवा जास्त होण्यासाठी त्यात खूप कॉम्प्लेक्सिटी मध्ये असतात, जमिनीची धूप, मातीतलं प्रदूषण, अतिपाऊस इत्यादी काही कारण आहेत त्यातली.

तर माती कसदार असते जेंव्हा तीचा pH न्यूट्रल असतो आणि खतं दर्जेदार असतं जेंव्हा ज्यात NPK प्रमाणात असतो आणि मायक्रो न्यूट्रियंट आणि ट्रेस मिनरल्स समाविष्ट असतात.

शेतकरी वर्ग रक्ताचं पाणी करून कष्ट करतो, धान्य उगवतो आणि पोशिंदा बनतो देशातील जनतेचा. महाराष्ट्रातील आजही सर्वाधीक वर्ग हा शेती व्यवसायात आहेत, त्यामुळे राज्याच्या राजकारणात यायचं असेल तर किमान शेतीची माहिती असावी. महाराष्ट्र हिरवागार करण्याचं तंत्र शेतकऱ्यांकडे आहे. 

पंकज दळवी, गुहागर.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.