जळणाऱ्याची आग शांत करणारा बरनॉल आला कुठून??

फेसबुक असो की ट्विटर. भारत असो की चीन. जगात भांडणारे लोक सोशल मिडियावर एकेमकाला बरनॉल लावायचा सल्ला देत असतात. निवडणुकीचा निकाल आला लावा बरनॉल, कोर्टाचा निकाल आला लावा बरनॉल, अगदी क्रिकेट, फुटबॉलची मॅच जरी झाली तरी जिंकणारे हरणाऱ्याना बरनॉल लावायला सांगतात.

अगदी परवा राम मंदिरच भूमीपूजन झाल्यावर तर बरनॉल ट्रेण्डीग टॉपीकच्या लिस्टमध्ये टॉपला होता. मिमचा राडा झाला. 

अशा वेळी बरनॉल पण विसरून गेला असेल की आपला जन्म नेमका कशासाठी झालाय? 

बरनॉलचा जन्म झाला रॅकीट बेनकिझर उर्फ आरबी ग्रुप या इंग्लंडच्या कंपनीमध्ये. एकेकाळी घरगुती वापराचा स्टार्च, नीळ असे प्रोडक्ट बनवणारी रॅकीट अंड सन्स ही कंपनी जर्मनीच्या जॉन बेनकिझर बरोबर मिळाली आणि डेटॉल बनवला.

ही गोष्ट १९३० मधली. डेटॉल हा जंतुनाशकांचा सर्वात मोठा ब्रँड बनला. जगभरात त्याला मागणी होती.

डेटॉल च्या तुफान यशानंतर रॅकीट बेनकिझरने दैनंदिन हेल्थकेअरच्या इतर गोष्टी बनवायला सुरु केल्या. उदाहरणार्थ हार्पिक टॉयलेट क्लिनर, स्ट्रेपसीलच्या गोळ्या, लायझॉल, मॉरटीन वगैरे वगैरे खूप काही. घरगुती प्रथमोपचाराची औषधे, वापरातल्या वस्तू हे रॅकीट बेनकिझरची स्पेशालिटी होती. त्यात त्यांच्याशी आजही कोणी स्पर्धा करणार नाही.

अशातच त्यांनी बरनॉल हे अँटीसेप्टिक क्रिम बाजारात आणलं. भाजल्यामुळे झालेली जखम असो किंवा काही कपल, खरचटलं यामुळे होणारी जळजळ असो बरनॉलच मुख्य काम इन्फेक्शनमुळे होणारी जळजळ थांबवणे हे होतं.

रॅकीट बेनकिझरच्या बाकीच्या प्रोडक्ट्सप्रमाणे हे देखील दर्जेदार होतं. त्याची खासियत म्हणजे कुठे काही भाजलं तर ते लगेच बर करायचं.

साठच्या दशकात भारतात बरनॉल प्रचंड हिट झालं.

इतर देशांच्या मानाने भारतीय स्वयंपाकघरात काम करणाऱ्या स्त्रीवर्गाला रोज चटका बसने, कापणे वगैरे छोट्या छोट्या अपघाताचा सामना करावा लागतो. अशावेळी हाताशी बरनॉल असला की बर असत. चटका बसला, भाजलं तर बरनॉल लावून भारतीय सुपरवूमन परत दैनंदिन लढाईला सज्ज व्हयाची. काम थांबायच नाही. आपल्यासाठी तर हा जांभळा पिवळा बरनॉल संकटमोचक होता.

भाजण्यावर लावण्याच्या मलमेला बरनॉल म्हणायची पद्धत पडली.

त्याकाळची जाहिरात सुद्धा फेमस होती,

“हाथ जल गया. शुक्र है घर मे बरनॉल है.”

भारतात बोरोलीन, विको वगैरे अनेक स्वदेशी मलम असताना देखील पुढची साठ वर्षे बरनॉलने राज्य केलं. भारत हेच त्यांचं सगळ्यात मोठ मार्केट होत. साधारण २००१ साली डॉक्टर मोरपेन या भारतीय कंपनीने बरनॉल साडे आठ कोटी रुपयांना विकत घेतलं.

पुढच्याच वर्षी बरनॉलने फक्त ३ वर्षात विक्रमी ४ कोटी रुपयांची कमाई केली. जलन के लिये बरनॉल है तो नो फिकर म्हणणाऱ्या सोनाली बेंद्रे यांनी केलेली जाहिरात आपल्या पैकी अनेकांना आठवत असेल.

अस करता करता android चा जमाना आला. प्रत्येकाच्या हातातल्या मोबाईलमध्ये फेसबुक ट्विटर आले, राजकीय विचारसरणी आली. बांधावर भांडणारी माणस तिथ भांडू लागली. एकमेकाला खिजवण्यासाठी बरनॉल वापरू लागली.

main qimg 1a2a71840668e245ca6a96763a8cebda

जलेगा तो सिर्फ बरनॉल चलेगा ही टॅगलाईन मेडिकल इमर्जन्सीसाठी नाही तर बाकीच्या गोष्टीसाठीच वापरला जाऊ लागली. बिचारा बरनॉल आपण प्रत्यक्षात इन्फेक्शन दूर करणारा अँटीसेप्टिक क्रिम आहे हेच विसरून गेलाय. 

बाकी काही का असेना बरनॉल रोज ट्विटरवर एवढा टॉपला असतो की त्याची कंपनी आता नवीन जाहिराती करायचं बंद केली आहे. इंटरनेटवर फुकट एवढी जाहिरात जगात फक्त काही नशीबवान प्रोडक्टची होते आणि यात बरनॉल एक नंबरला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.