भाजप-जेडीयू युती तुटणार होती पण एका माणसाने ठरवलं नितीश कुमार मुख्यमंत्री होतील

गोष्ट आहे २००५ सालची. बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आले होते. लालू यादव हारले होते. त्यामुळे सरकार स्थापन करायला आता नितीश कुमार यांना चांगलीच संधी होती. पण त्यांनाही पुर्ण बहुमत होतं असं ही नव्हतं.

ते बीजेपी सोबत मिळून सरकार स्थापन करायच्या तयारीत होते. कारण बीजेपी आणि जेडयु मिळवून ९२ जागा होत होत्या तर एकटया लालू यादव यांच्या पार्टीकडे २४३ मधून ७३ होत्या. आता समस्या अशी निर्माण झाली की सरकार कसं उभं करायचं. कोणत्याच पार्टीकडे पुर्ण बहुमत नव्हतं.

त्यात बिहारची जनता लालू राबडी सरकारला पार कंटाळली होती.

लालू यादव यांची राष्ट्रीय जनता पार्टी सोडून कुणीही सरकार स्थापन करावं अशी लोकधारा होती. पण भाजप आणि नितीश कुमार यांच्या जे डी युच अजूनही मुख्यमंत्री कोण यावर ठरत नव्हतं. भाजप मधले नेते स्वतःचा मुख्यमंत्री करू या मताचे होते. जेडीयू हा समाजवादी विचारसरणी मधून आलेला पुरोगामी पक्ष. त्यांच्याशी आपलं जुळेल का हा देखील अनेकांच्या समोरचा प्रश्न होता. गुजरात दंगल वरून त्यांचे मतभेद जगजाहीर होते.

काहीही असलं तरी नितीशकुमार यांना मुख्यमंत्री बनवायच्या तयारीत त्यावेळी भाजप मध्ये फक्त एकच व्यक्ती होते अरुण जेटली.

पण झालं असं की डॉक्टर मनमोहन सरकार ने शेवटी लालू यादवं यांच्या खेळीने राष्ट्रपती शासन लागू केलं. एक वर्षांनंतर निवडणूक घेण्याचं ठरलं. त्यात जेडयु आणि बीजेपी गठबंधन करून एकत्र लढण्याचं ठरलं होतं. मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून अरुण जेटली यांनी नितीशकुमार यांनाच पसंती दिली होती. विरोध खूप झाला पण नितीशकुमार मुख्यमंत्री करण्यास जेटली ठाम होते. पण अधिकृत रित्या जाहीर केलं नव्हतं. म्हणजे पार्टीत मतभेद चालुचं होते.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रचाराच्या सभेत नितीशकुमार यांचं नाव अधिकृत रित्या जाहीर करायचं हे ठरलं होतं. पण वाजपेयींनी अख्खी सभा बीजेपी गुणगान आणि वचने यांच्यातच घालवली. त्यावेळी नितीशकुमार फार नाराज झाले.

युती तुटायची वेळ आली. कोणीही माघार घेण्याची शक्यता नव्हती. पण अरुण जेटली यांनी मध्यस्ती केली, अटलजींना समजावून सांगितलं.

पण लगेच दुसऱ्याच दिवशी बिहार भाजपचे नेते सुशील मोदी यांनी एक सभा घेतली आणि त्यात नितीशकुमार यांचं नाव जाहीर केलं.

तेव्हा नितीशकुमार मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर जे बसले ते अजूनही आहेत. आणि त्यांच्यावर कृपा केली ती अरुण जेटली यांनी. म्हणजे त्यांचा खूप मोठा उपकार नितीशकुमार यांच्यावर होता. नितीश कुमार हे कधीहि विसरले नाहीत. मध्यन्तरी नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार झाल्या पासून नितीश कुमार यांनी भाजप ची साथ सोडली होती व लालूंच्या सोबत सरकार बनवलं.

तेव्हा सुद्धा नाराज नितीश कुमार याना भाजपच्या बरोबर आणणे, नरेंद्र मोदी यांच्याशी मनोमिलन घडवून आणणे हि कामे अरुण जेटली यांनीच केली.

अरुण जेटली यांच्यासारखा चाणक्य भाजप मध्ये होता, त्यांनी लवचिकता दाखवली यामुळे विरोधी विचारसरणी असूनही नितीश कुमार व त्यांचा संयुक्त जनता दल भाजपचा मित्र पक्ष बनला.

मागच्या वर्षी २४ ऑगस्ट रोजी त्यांचे दुःखद निधन झाले तेव्हा नितीश कुमार याना प्रचंड मोठा धक्का बसला. त्यांचा जिवलग मित्र त्यांनी गमावला होता. त्याचवेळी आपण अरुण जेटली यांचा पुतळा उभारणार आहे हे त्यांनी जाहीर केलं होतं.

आपल्या मैत्रीची परतफेड म्हणून नितीशकुमार यांनी अरुण जेटली यांचा मोठा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला असेल.

३१ ऑगस्ट २०१९ ला निर्णय घेऊन २८ डिसेंबर ला अरुण जेटलींचा पुतळा त्यांनी साकारला. म्हणजे जे बोलून दाखवलं ते केलं देखील. भले बिहार मध्ये अटलजींचा पुतळा नसेल पण अरुण जेटली यांचा पुतळा आहे याच एकमेव कारण म्हणजे नितीश कुमार.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.