पोलीस कॉन्स्टेबल, PSI ते थेट IPS ऑफिसर…

निशांत जैन. या नावापुढे आज IPS आहे. सुरवातीच्या काळात ते दिल्ली पोलीसमध्ये एक कॉन्स्टेबल म्हणजेच शिपाई होते. पोलीस शिपाई ते IPS अधिकारी असा त्यांचा प्रवास राहिला आहे. त्यांनी आपला प्रवास हिंदीमध्ये समाजमाध्यमांवर लिहला होता. त्यांचा प्रवास समजून घेण्यासाठी त्यांच्याच भाषेत देण्यात आला आहे.

ते लिहतात,

मी राजस्थानच्या झुंझून जिल्ह्यातल्या देवीपूरा गावचा. माझ्या वडिलांच नाव लक्ष्मण सिंह आणि आईचं नाव चंन्दा देवी. माझे वडिल शेतकरी होते. ५ भावा बहिणींमध्ये मी तिसरा. घरची परिस्थिती बेताचीच. वडिलांच्यापुढे मला शिक्षक करणं हेच ध्येय होतं. दहावी पास झाल्यानंतर माझ्या वडिलांनी मला संस्कृत स्कूलमध्ये पाठवलं. त्यांच्या मते संस्कृतमधून शाळा मास्तर होण्यासाठी जास्त स्कोप होता.

संस्कृतमध्ये B.A. केल्यानंतर मी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करु लागलो. पण राजस्थानच्या शिक्षक भरतीमध्ये मला अपयश आलं. त्यानंतरच्या सैन्याच्या भरतीचीसाठी ट्राय केला पण तिथेही अपयश आलं, सर्वात शेवटी राजस्थान पोलीस शिपाईसाठी मी प्रयत्न केला पण तिथेही अपयशच आलं.

सलग तिनवेळा मला अपयशाचे धक्के बसले.  

त्याचवेळी म्हणजे साधारण २००९ साली दिल्ली पोलीसमध्ये पोलीस कॉन्स्टेबलसाठी भरती निघाली. माझा एक मित्र दिल्ली पोलीसमध्ये शिपाई होता. त्याने मला सल्ला दिला की तू दिल्ली पोलीसमध्ये ट्राय कर. मी दिल्लीत आलो आणि कोचिंग क्लास लावला. लक बाय चान्स माझं दिल्ली पोलीसमध्ये सिलेक्शन झालं.

ज्या दिवशी दिल्ली पोलीसमध्ये मी सिलेक्ट झालो तो दिवस मला आजही आठवतो. माझ्या वडिलांनी गावभर पेढे वाटले होते. एका सामान्य कुटूंबातून आलेल्या मुलासाठी सरकारी नोकरी हीच सर्वस्व असते.

मी पण खूप खूष होतो. त्यानंतर मला थोडा कॉन्फिडन्स आला आणि मी दिल्ली पोलीसमध्ये PSI पदाची परिक्षा दिली. माझ्या प्रयत्नाने मी ती देखील पास झालो. जिथे मी पोलीस शिपाई म्हणून भरती झाल्याने खूष होतो ती जागा आता पोलीस उपनिरिक्षक या पदाने घेतली.

सब इन्स्पेक्टर म्हणून मी दिल्ली पोलीसमध्ये काम करू लागलो. तेव्हा अजून पुढच्या परिक्षा मला खूणावत होत्या. पण पोलीस स्टेशनमधलं १५-१६ तासांच काम करून वेळ मिळायचा नाही. तरीही मी स्टाफ सिलेक्शनचा अभ्यास करु लागलो. पुढच्याच वर्षी स्टाफ सिलेक्शनचा निकाल लागला आणि मला एक्साईज खात्यामध्ये नोकरी लागली. पण स्टाफ सिलेक्शनमध्ये मला केरळचं केडर मिळालं.

पुढचा मागचा विचार न करता मी दिल्ली पोलीसचा राजीनामा देवून केरळला गेला. इथे फायदा असा झाला की मला अभ्यासाठी वेळ मिळू लागला. मी पुन्हा स्टॉफ सिलेक्शनची परिक्षा दिली आणि २०१४ साली मी पुन्हा दिल्लीत आयकर निरिक्षक पदावर रुजू झालो.

आत्ता मला UPSC ची स्वप्ने पडू लागली. यापूर्वी मी यूपीएस्सीचे तीन अटेम्प्ट दिले होते. तिन्हीही प्रयत्नात मी पूर्व परिक्षेतूनच बाहेर पडलो होतो. दूसरीकडे माझा साखरपुडा झालेला तो २०१२ साली. पण अजूनही लग्न लांबल होतं. घरातल्यांच्या सांगण्यावरून मी २०१५ साली लग्न केलं.

आत्ता कुठेतरी थांबाव अस वाटत असताना बायकोने युपीएस्सी देण्यासाठी परत प्रोत्साहन दिलं.

एकदिवस असाच घरी बसलेला असताना बायको म्हणाली की इतका अभ्यास केलाय तर एक प्रयत्न द्यायला काय जातय. त्यामुळेच मी पुन्हा परिक्षेला बसायला निर्णय घेतला. २०१६ साली परिक्षा दिली आणि फक्त ८ मार्काने मी बाहेर पडलो.

आत्ता तर निश्चयच केला होता की थांबायचं. पण शेवटचा अटेम्प्ट म्हणून ट्राय करणायचा निर्णय घेतला. यावेळी परिक्षा दिली आणि ५७४ रॅन्कने मी IPS झालो. कधीकाळी पोलीस शिपाई पदाचं स्वप्न पाहिलेला माझ्यासारखा मुलगा पोलीस अधिक्षक झाला..

हे ही वाच भिडू 

 

1 Comment
  1. Sharadchandra says

    Please share the number of Nishant Jain IPS and his location for taking interview.

Leave A Reply

Your email address will not be published.