त्यानंतर रवी शास्त्रींनी दारूच्या नशेत कधीच कमिटमेंट दिली नाही.

यांनी बॉलिवूड स्टारला डेट केलंय पण हे विराट कोहली नाही, यांनी एका ओव्हरमध्ये सहा सिक्स मारलेत पण हे युवराज सिंग नाही,

दारूचा नाद आहे पण केश्तो मुखर्जी नाही…..

एवढं सगळं पाहून ओळखू नसेल  येत तर अवघड ए भावा, हे म्हणजे आपले  प्ले हार्ड, पार्टी हार्ड असा बाणा असणारे , मैदानात सिक्सर मारणारे आणि मैदानाबाहेर अभिनेत्रींना डेट करणारे, क्रिकेट कॉमेंट्री करता सगळ्यात जास्त पैशे घेणारे आपले एकमेव दिग्ग्ज म्हणजे रवी शास्त्री.

गेली चार दशकं त्यांनी गाजवली. त्यांनी आधी खेळाडू,कॉमेंटेटर आणि आता कोच अशी बरीच पद भूषवली आहे. त्यांच्या दारू पिण्याच्या मुद्द्यावरून त्यांना बरेच लोकं ट्रोल करतात, त्यांच्यावर MEME बनवतात पण याच दारू पिण्याच्या कारणावरून त्यांची बढती बॉलर ते डायरेक्ट सलामीवीर फलंदाज म्हणून झाली हा किस्सा माहिती नसेल आपल्याला पण आपण मजाक मजाक मध्ये त्यांना सिरियसली घेत नाही तर हा नेमका काय विषय झाला होता तो बघूया

रवी शास्त्रींचं भारतीय संघात पदार्पण झालं. सुरवातीला लेफ्ट आर्म स्पिनर आणि दहाव्या नंबरवर बॅटिंग अशी सुरवात त्यांची झाली. पण एका वर्षभरातचं ते सलामीवीर म्हणून बॅटिंगला येऊ लागले. नंबर दहा वरून डायरेक्ट एक येण्याची त्यांची गोष्ट मात्र मजेदार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांची मालिका कराची मध्ये चालू होती. या मालिकेत पाकिस्तानच्या भेदक गोलंदाजीने भारतीय फलंदाजीचं कंबरडं मोडलं होतं. इम्रान खान त्याच्या गोलंदाजीतून अक्षरशः आग ओकत होता. सर्फराज नवाज सुद्धा भारतीय फलंदाजांची पळापळ करत होता. या दोघांच्या स्विंग बॉलिंगने भारताच्या गोटात दहशत बसवली होती.

भारतीय संघाचा आधीचा ओपनर बॅट्समन गुलाम पार्कर सपशेल फ्लॉप ठरला होता. टेस्ट मॅचच्या दोन तीन दिवस अगोदर हॉटेलमध्ये रवी शास्त्री आणि संदीप पाटील बसले होते. संदीप पाटील हे रवी शास्त्रींचे रुम पार्टनर होते.

हॅम्स्टरिंगच्या इंज्युरीने ते दोघेही त्रस्त होते. पण खुश होते कारण आता त्यांना पाकिस्तानच्या गोलंदाजी फळीला तोंड देण्याचं टेन्शन नव्हतं. त्यावेळी पाकिस्तानची गोलंदाजीची तुलना हि वेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजी ताफ्याशी होत होती.

त्यावेळी रात्री रवी शास्त्री आणि संदीप पाटील औषधांबरोबरच दारुही पीत बसले होते. शास्त्री तर पार टिपेला पोहचले होते. आणि अचानक दरवाजावर थाप पडली आणि भारतीय संघाचे कर्णधार सुनील गावस्कर आत मध्ये आले, आधीच ते टेन्शनमध्ये आले होते.

त्यांना आत आलेलं बघताच संदीप पाटलांनी सगळ्या बाटल्या सोफ्याखाली दडवायला सुरवात केली आणि म्हणाले मी काहीच केलं सर, हॅमस्ट्रिंगमुळे त्रास होत होता म्ह्णून…..गावस्करानी संदीप पाटलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं.

शास्त्री आपले तसेच बसलेले. पण चेहऱ्यावर टेन्शन न दाखवता गावस्करानी थेट रवी शास्त्रींना विचारलं पुढच्या सामन्यात तू खेळतोय, जडावलेल्या डोळ्याने त्या धुंदीत शास्त्रींनीही येस कॅप्टन म्हणलं, पुढच्याच क्षणी गावस्कर म्हणाले आणि तू माझ्यासोबत ओपनिंग करतोय या वाक्यावर शास्त्री जवळजळ उडालेच. पुढच्या सामन्यात आपल्याला हा पाकिस्तानचा पेस अटॅक फोडून काढायचा आहे एवढं लक्षात ठेव. गावस्करांनी त्यांच्यातला आत्मविश्वास जागवला होता.

सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री या दोघांनी मिळून पाकिस्तानला जेरीस आणलं. पण कालांतराने सुनील गावस्कर बाद झाले मात्र

रवी शास्त्रींनी पाकिस्तानी गोलंदाजांचा समाचार घेत १२८ धावा तडकावल्या.

या खेळीनंतर अनेक टीकाकारांनी शास्त्रींवर टीका केली कि हा गावस्करचा चमचा आहे वैगरे वैगरे पण त्यावेळी शास्त्रींनी सांगितलं कि गावस्करांमुळे मला चांगलं खेळता आलं, त्यांच्यामुळे संघाला दिलासा मिळाला. गावस्कर माझ्यासाठी उत्तम कर्णधार आहे.

अशा प्रकारे पुढे रवी शास्त्रींनी यशस्वी घोडदौड चालू केली, सहा बॉल सहा सिक्स सुद्धा हाणले पण ते त्यावेळेस शुद्धीत राहून त्यांनी विक्रम केले. पुढे दारू पिताना कुठलंही वचन द्यायचं नाही हेही त्यांना कळलं. एकंदरीत रवी शास्त्रींचा पॅटर्नचं वेगळाय

प्ले हार्ड पार्टी  हार्डर….

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.