भगतसिंगांच्या आई म्हणाल्या, “तुला बघून माझा मुलगाचं परत आल्यासारखं वाटतंय”

भारतात देशभक्तीपर चित्रपट बनवणाऱ्यांची काही कमी नाही. वर्षाकाठी चार पाच चित्रपट तरी आपल्याकडे बनतातच. पण भारतात सगळ्यात आधी देशभक्तीपर चित्रपटाचा ट्रेंड सुरु केला तो मनोज कुमारने. मनोज कुमारने सुरवातीच्या काही चित्रपटानंतर पुढचे बरेच चित्रपट देशावर आधारित असलेले केले. मनोज कुमारला लोकं त्याच्या चित्रपटातील पात्रांच्या नावावरून त्याला प्रेमाने भारत कुमार म्हणत असत. भारत कुमार हे नाव त्याला देशभक्तीपर चित्रपटांनी दिलं.

भारत का रेहनेवाला हूं भारत कि बात सुनाता हूं …

मेरे देश कि धरती सोना उगले…

पगडी संभाल…

ए वतन…

अशा अनेक सुपरहिट गाण्यांतून तो लोकांपर्यंत पोहचला.

मनोज कुमारने १९६५ साली शहीद नावाचा चित्रपट केला. या चित्रपटाने त्याला अमाप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटाने लोकांमध्ये देशभक्तीची आग पेटवली आणि देशाभिमानाचा जागर घडवून आणला. या चित्रपटाचा अतिशय मह्रत्वाचा किस्सा.

शहीद चित्रपट रिलीज झाला होता. एस राम शर्मा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होत. या चित्रपटात मनोज कुमारने भगतसिंगांची भूमिका साकारली होती. याच दरम्यान भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील धडाडीचे क्रांतिकारक भगतसिंग यांच्या आईशी मनोज कुमार यांची भेट झाली. चंदीगढच्या सरकारी दवाखान्यात त्यांना भर्ती करण्यात आलं होतं.

पुढे मनोज कुमारने एका मुलाखतीत सांगितलं होतं कि, ज्यावेळी आम्हला कळलं कि भगतसिंगांच्या आई चंदीगढच्या दवाखान्यात आहेत त्यावेळी मी आणि निर्माते असे दोघेच जण त्यांना जाऊन भेटलो. त्यावेळी भगतसिंगांचे बंधू कुलतार सिंग यांनी त्यांच्या आईला सांगितलं कि यांनी शहीद चित्रपटात भगतसिंगांची भूमिका साकारली होती.

त्यावेळी भगतसिंगांच्या आईने मनोज कुमारांकडे बघितले त्या ओळखू पाहत होत्या कि भगतसिंगांच्या भूमिकेत योग्य आहे कि नाही. मग त्या हळूच मनोज कुमारांना म्हणाल्या कि,

हा तू दिसतो भगतसिंग सारखा, तुला पाहून भगतसिंग परतून आल्यासारखं वाटतंय.

त्यांचं हे वाक्य ऐकून मनोज कुमारला अतिशय आनंद झाला होता.

या भेटीच्या वेळी मनोज कुमारांना कळलं कि डॉक्टरांनी असूनही भगतसिंगांच्या आई गोळ्या औषध घेत नाही. त्यावेळी मनोज कुमारने त्यांना गोळ्या खाण्याचा आग्रह केला तेव्हा भगतसिंगांच्या आई म्हणाल्या कि तू म्हणतोय म्हणून खाते. याच वेळी त्यांची भेट क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांच्याशी झाली. बटुकेश्वर दत्त यांनी भगतसिंगांबरोबर असेम्ब्लीमध्ये बॉम्ब टाकले होते.

शहीद चित्रपटातील मनोज कुमारने साकारलेली भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच डोक्यावर घेतली होती. या चित्रपटात प्रेम चोप्रा यांनी सुखदेव आणि अनंत पुरुषोत्तम मराठे यांनी राजगुरू यांची भूमिका साकारली होती. कामिनी कौशल यांनी भगतसिंगांच्या आईची भूमिका तर अभिनेते मनमोहन यांनी चंद्रशेखर आझाद यांची भूमिका साकारली होती.

शहीद हा असा पहिला भारतीय चित्रपट होता कि ज्याने तब्बल तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावले होते. मनोज कुमारने पुढे देशभक्तीपर चित्रपटांमध्येच काम करण्याचं ठरवलं. निर्माता आणि दिग्दर्शक झाल्यावरही त्याने देशभक्तीपर चित्रपट बनवले.

माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या आदेशानुसार त्यांनी ‘ उपकार ‘ नावाचा चित्रपट केला ज्यात लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेल्या जय जवान जय किसान या घोषणेवर आधारित हा चित्रपट होता.

पुढे मनोज कुमारने पथर के सनम, गुमनाम, उपकार, पूरब और पश्चिम, रोटी कपडा मकान , क्रांती अशा अनेक चित्रपटात तो झळकत राहिला. उपकार या चित्रपटासाठी मनोज कुमारला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. मनोज कुमारनंतर इतक्या मोठ्या संख्येने कुठल्याही अभिनेत्यांनी देशभक्तीपर चित्रपट केले नाही.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.