नेपाळच्या युवराजाने राजा राणी सकट सगळा राजपरिवार का संपवला, अजून पण कोडं उलगडल नाही..

नेपाळच्या इतिहासात २० वर्षापूर्वी जे घडलं,  ते कधीही  विसरण्यासारखं आहे. १ जून २००१ चा  दिवस नेपाळसाठी ‘काळा दिवस’ ठरला. नेपाळच्या राजा आणि राणीसह राजघराण्यातील ०९ लोक ठार झाली. आणि हा रक्तरंजित खेळ कोणा ऐऱ्यागैऱ्यानं नव्ह तर स्वतः राजपरिवाराच्या युवराजानं खेळला. मात्र, या हत्याकांडाशी  जोडल्या गेलेल्या अनेक थ्येरीज आणि रहस्य अजूनही उलगडलेली नाहीत.

आजपर्यंत कोणालाही समजू शकले नाही कि ,नेपाळ राजघराण्यात झालेल्या हत्याकांडामागं नेमका   कोणाचा हात होता. ज्यात सगळी रॉयल फॅमिली संपली.

सगळा विषय सुरु होतो युवराजाच्या लग्नाच्या चर्चेपासून..

राजकुमार दिपेंद्र तेव्हा असतील २८-२९ वर्षांचे. तसं बघायला गेलं तर लग्नाचं वय. घरच्यांना टेन्शनच काम. भारत असो नेपाळ असो, गरीब मुलगा असो की राजकुमार सगळीकडे हीच कंडिशन असते. असाच विषय नेपाळच्या राजवाड्यात सुरु झाला.  

दिपेंद्र यांच्या आईने म्हणजेच नेपाळची राणी ऐश्वर्याने लग्नाविषयी बोलण्यासाठी बोलवून घेतलं. राणी ऐश्वर्यानं सांगितलं कि, ती राजकुमारच्या लग्नासाठी वधू शोधतेय.

यावर राजकुमार दिपेंद्रनं म्हंटल  कि, त्याला त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न करायचंय. हे ऐकल्यावर राणीच डोकं फिरलं. राणी ऐश्वर्याने जेव्हा त्या मुलीविषयी विचारलं. तेव्हा राजकुमारांनी सांगितलं तीच नाव देवयानी राणा. तिची आणि माझी भेट इंग्लंडला झाली होती. तीसुद्धा राजघराण्यातली आहे. 

खानदान कि इज्जत वगैरे प्रश्न राजकुमाराच्या स्टोरीमध्ये आले. राणीने पोराच्या लग्नाला साफ नकार दिला. आणि तिथनं निघून गेली.

राजकुमारला माहिती होत कि, हा आक्षेप येणारच, पण हे सगळं इतकं अवघड होईल, याची कल्पना  नव्हती.

राजकुमार दिपेंद्रनं आपल्या आईची मनधरणी करण्याचा निर्णय घेतला. तो आपल्या आईकडं गेला आणि लग्नाचा विषय काढला, तेव्हा राणी ऐश्वर्यानं  नकार देत सांगितलं कि, तिने त्याच्यासाठी वधूची निवड केलीये. यावर नाराज राजकुमाराने स्पष्टपणे सांगितलं कि, तो लग्न करेल तर देवयानीसोबतच.

अनं सुरु झाला कलह…

माय – लेकात या प्रकरणामुळं जणू  काही युद्धच सुरु झालं होत. राणी ऐश्वर्यानी देखील सून म्हणून एक पोरगी शोधून ठेवली होती. ती मुलगी राजमाता रत्नाच्या बहिणीच्या खानदानातली होती.

राणी ऐश्वर्या म्हणाली, या राजघराण्यात  मुलगी येईल ती राजघराण्यातलीचं.

राजकुमार दीपेंद्रने शोधलेली देवयानी सुद्धा राजघराण्यातलीच होती. पण राणीच्या म्हणण्यानुसार तिच्या घराण्यात ती मुलगी फीट नव्हती.

पण, दीपेंद्र आणि देवयानी या दोघांची लग्नाची आशा संपलेली नव्हती. याच दरम्यान, राजकुमार दीपेंद्रनं वडिलांपुढे नेपाळच्या सुरक्षा विभागासाठी शस्त्रे व इतर उपकरणांच्या एका डीलचा प्रस्ताव ठेवला आणि आपला विचारही. राजकुमारचा हा प्रस्ताव त्याचे वडील आणि नेपाळचे राजा  बीरेंद्र  यांनी धुडकुन लावत, त्यामुळे इथंसुद्धा राजकुमार  दीपेंद्रच्या हाती अपयश आलं.

कुंडली अनं राणी राजकुमाराच्या विरोधात .. 

एक दिवस राजकुमार दीपेंद्र  आपली आणि देवयानीची कुंडली घेऊन  राणीजवळ गेला. त्याने ठरवलंच होत कि, लग्न करणार तर देवयानीसोबतच, मग भलेही आई – वडिलांची इच्छा नसेल. राणी ऐश्वर्याने राजकुमाराच्या या हट्टापायी दोघांच्या कुंडल्या जुळवल्या, तेव्हा ज्योतिषाचं म्हणणं होत कि,

जर राजकुमार दीपेंद्र ३५ वर्षाच्या आत बाप बनले तर महाराजांचा मृत्यू सुद्धा होवू शकतो.

इकडे राजकुमार आणि देवयानीचं प्रेमप्रकरण सुरूच होते. आपण तिच्याशीच  लग्न करणार, असं  आश्वासन दीपेंद्र यांनी दिलं होत.

मग एक दिवस राणी ऐश्वर्याने सांगितले की,  देवयानी ज्या सिंधिया कुटुंबातली आहे, ते पुण्याच्या पेशव्यांसाठी नोकरी करायचे, त्यामुळे राजघराण्याशी तुलना केली जात नाही.

युवराज दीपेंद्र म्हणाले की, राजकुमार निरंजनच्या लग्नावेळी याचा विचार केला नव्हता. यावर भडकलेल्या राणी ऐश्वर्यानं दीपेंद्राला नीट बोलायला सांगितलं. माय- लेक दोघही आपल्या निर्णयावर ठाम होते, तर दुसरीकडे दिपेंद्रचा राजकीय हस्तक्षेप आणि त्याच्या वडिलांचे निर्णयसुद्धा विरुद्ध होते.

राजकुमार नशेच्या आहारी… 

त्यानंतर २००१ चा जून महिना उजाडला. राजकुमार सगळीकडून नाराज होता आणि त्याला काय तो शेवटचा निर्णय हवा होता. याच दिवशी राजमहालात फॅमिली डीनर होतं. राजकुमाराकडे हीच संधी होती, सगळ्यांसमोर  काय तो तोडगा काढण्याची. पण निकाल काय वेगळाच लागला.

राजकुमारानं  संध्याकाळपासूनच नशा करायला सुरुवात केली. सगळ्यांच्या समोर त्यानं आई- वडिलांवर ओरडायला सुरुवात केली, काही नातेवाईकांनी त्यांना खोलीत सोडलं. आपल्या खोलीत गेल्यावर राजकुमार दीपेंद्र देवयानीला फोनवर बोलला कि

मी झोपायला निघालोय.

थेअरी १ : दीपेंद्र  खोलीच्या बाहेर आला तो भरमसाठ  शस्त्र घेऊनच. हॉलमध्ये येऊन त्यान धडाधड गोळीबार करायला सुरुवात केली. राजकुमारानं  आपल्या वडिलांसोबत राजघराण्यातल्या ९ लोकांना ठार केल अनं स्वतः वरही गोळी झाडली.

नेपाळचं प्रतिष्ठित घराण पशुपति शमशेर जंग बहादुर राणा आणि  उषाराजे सिंधिया यांची मुलगी देवयानी यांच्या कानावर ही बातमी येताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. हत्याकांडाच्या दुसऱ्याच दिवशी देवयानीन नेपाळ सोडलं आणि भारतात आली.

थेअरी २ : राजवाड्यात झालेल्या हत्याकांडाच्या ८  वर्षानंतर म्हणजे २००९ मध्ये तुल बहादूर शेरचन समोर आला आणि त्यान म्हंटल की त्या हत्याकांडाला तोच जबाबदार होता. शेरचनने  एका पत्रकारांशी झालेल्या बैठकीत नाट्यमय आणि संशयास्पद पद्धतीने याचा खुलासा केला.

थेअरी ३ : हत्येच्या वेळी नेपाळचे परराष्ट्रमंत्री असलेले चक्र बासटोला यांचे म्हणणे होते  की, हत्याकांडाच्या मागे  माजी पंतप्रधान गिरिजा प्रसाद कोइराला यांनाही ठार मारण्याचा कट रचला जात होता. कोइराला यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. चक्र यांनी याला एक मोठे षडयंत्र असल्याचं म्हंटल.

थेअरी ४ : पेशेने  पत्रकार असलेले  कृष्णा अबिरल यांनी रक्तकुंड ही कादंबरी लिहिली. कृष्णाने राजवाड्यातील एका महिलेची मुलाखती घेतली,  जी राणीची सेविका होती. यात लिहिलेय की,  दीपेंद्रच्या वेशात दोन मुखवटा  घातलेल्या माणसांनी गोळीबार केला. हे दोन मुखवटा घातलेले कोण होते? हे रहस्य अद्याप उलगडलेले नाही.

थेअरी  ५ : नेपाळचे तत्कालीन  राजा बीरेंद्र यांचा छोटा भाऊ ज्ञानेंद्र त्या रात्री राजवाड्यात नव्हता. हत्येत बीरेंद्रचे नातेवाईक मारले गेले पण ज्ञानेंद्र यांचे नातेवाईक वाचले. यानंतर  आरोप केला गेला की,  ज्ञानेंद्रला राजा व्हायचं होत  आणि त्याने राजाच्या गाडीवर  कब्जा करण्याचा कट रचला असावा.

थेअरी ६ : या घटनेच्या ९ वर्षानंतर नेपाळचे माजी पॅलेस मिलिट्री सेक्रेट्री जनरल बिबेक शाह यांनी एक पुस्तक लिहिले ‘माइले देखेको दरबार’ (राजमहाल, जो मी पहिला) . आणि यात दावा केला कि, या हत्याकांडामागे भारताचा हात होता. शाह यांच्याशिवाय नेपाळी नेता  पुष्प कमल दहाल  यांनीही दावा केला कि, रॉ ने  या हत्याकांडाचा कट रचला होता. 

थेअरी ७ : राजमहालाच्या  आवारात मोठ्या संख्येने  खतरनाक शस्त्रे असलेले सुरक्षा गार्ड  असायचे. त्यामुळे यामागे त्यांच्याही हात असल्याचे बोलले गेले. तसेच डॉक्टरांवरही संशय आला. डोक्यात  गोळी  लागल्यानंतर राजकुमार दीपेंद्र १ जून २००१ नंतर दवाखान्यात  तीन दिवस  कोमात होते. ३ दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला पण पोस्टमार्टम केले नाही.

थेअरी ८ : या शाही परिवाराच्या हत्येच्या वेळी नेपाळ राजपरिवाराचे राजकुमार पारसच्या भूमिकेवर संशय आला. कारण घटनेच्या वेळी राजकुमार पारस महालात होता, पण त्याला साधे खरचटले सुद्धा नाही . आणि पारसच्या आधीच्या प्रकरणांमुळे सुद्धा त्याच्यावर संशय गेला.

थेअरी ९ : याशिवाय आणखी एक चर्चा होती कि, ती सेल्फ बॉम्बिंगची.  असे म्हंटले जाते कि, या हत्याकांडामागे बॉम्बचा धमाका असू शकतो.

या सगळ्या गोष्टी समोर असूनही खर काय ते समोर आलं नाही. मात्र, या थ्येअरीमूळ अनेक प्रश्न निर्माण उभी राहिलेयत.

 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.