IPL वगैरे नंतर आले, त्याच्याही आधी यांनी जगाला क्रिकेट मधून पैसे कमवायला शिकवलं

एक काळ होता जेव्हा क्रिकेटला आजच्या काळाइतकं महत्व आलेलं नव्हतं. त्यावेळी क्रिकेटला फक्त खेळ म्हणूनच बघितलं जायचं. तेव्हा क्रिकेटमध्ये इतका पैसाही नसायचा आणि लोकप्रियताही नसायची. केवळ आपल्याला क्रिकेटची आवड आहे, त्या खेळाबद्दल माहिती आहे म्हणून क्रिकेट खेळलं जायचं.

टेस्ट क्रिकेट पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये खेळलं जायचं. प्रसिद्धी तर सोडाच पण चौकार मारल्यावर लोकांनी टाळ्या वाजवणं हे सुद्धा प्रसिद्धीचं लक्षण मानलं जाई. पण एका काळानंतर हे सगळं बाजूला सारून एका व्यक्तीने खेळाचं महत्व वाढावं म्हणून एक जबरदस्त शक्कल लढवली आणि ती आजतागायत सुरूच आहे. 

टेस्ट क्रिकेटचा फॉर्म चेंज करून आणि टेस्ट क्रिकेटला मागे टाकून वनडे क्रिकेटची दहशत आणि लोकप्रियता जगभर पसरवली. रंगीत कपडे, फ्लड लाईट,  व्हाईट बॉल, फिल्डिंग सर्कल, हेल्मेट, मैदानात कोल्ड्रिंक्स घेऊन येणारी मोटार, मीडियामध्ये क्रिकेटच्या जाहिराती अशा भव्य दिव्य स्वरूपात वनडे क्रिकेटचा आविष्कार केला आणि तो हिट झाला.

पण हे नक्की अचानकपणे कसं सुरु झालं, कोणी हा विलक्षण बदल केला जाणून घेऊया.

कॅरी पॅकरने सत्तर वर्षांपूर्वी क्रिकेटचा इतिहास बदलून त्याला नव्या ढंगात सामोरं आणलं.

या नवीन प्रकारच्या क्रिकेट फॉर्मला लोकांनी चांगलंच पसंत केलं आणि वनडे क्रिकेटने टेस्टला मागे टाकत आपली जागा कायम केली.

हा कॅरी पॅकर कोण होता ? कॅरी पॅकर हा ऑस्ट्रेलियामध्ये एका खाजगी टीव्ही चॅनलचा मालक होता. १९७४ साली जेव्हा चॅनलची सूत्रे त्याच्या हातात आली तेव्हा त्याने खेळांवर फोकस करत त्यातून आपलं चॅनल पुढे हि आशा बाळगली होती. सुरवातीला गोल्फ प्रसारण करण्याची हक्क त्याने घेतले आणि त्यातून तो गोल्फ प्रसारण त्याच्या चॅनल ९ वर दाखवू लागला. 

पॅकरचं पुढचं टार्गेट होतं क्रिकेट. त्याने ऑस्ट्रेलियन बोर्डाला भरघोस पैशांची लालच दाखवली मात्र ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने त्याची हि मागणी धुडकावून लावली. कारण सुरवातिच्या काळात खाजगी चॅनलमध्ये इतका पैसा नसायचा. यामुळे पॅकरने हे स्वतःसाठी चॅलेंज समजून नवीन क्रिकेट लीग उभारण्याचा निर्णय घेतला.

कॅरी पॅकरने क्रिकेट चेंज करायचा निर्णय घेतला खरा पण हे काम अशक्य दिसत होतं. पण यात खेळाडू जास्त त्रासलेले होते. कारण पैसे कमी मिळत असायचे, त्यातही संधी मिळाली तरचं खेळ आणि तेव्हाच पैसे इतर वेळी काहीच नाही. जे खेळाडू रिटायर व्हायचे त्यांच्यासाठी तर हे अधिकच त्रासदायी होतं. मग कॅरी पॅकरने हि संधी साधली. 

कॅरी पॅकरने घोषणा केली कि खेळाडूंना त्यांच्या टॅलेंटवर खेळायला मिळावं आणि पैसेही मिळावे. पॅकरने सगळ्यात आधी ऑस्ट्रेलियाच्या ग्रेग चॅपलला आपल्या ताफ्यात भरती केले. त्याच्या मदतीने सगळे त्रासलेले मोठे प्लेयर भरती केले. पुढे इंग्लंडचा कर्णधार टोनी ग्रेगलाहि सामील करून घेतले. एकूण ३५ लोकांची लीग त्याने तयार केली. आणि नाव दिलं वर्ल्ड सिरीज क्रिकेट.

हे सगळं इतक्या गुप्तपणे सुरु होतं कि याबद्दल कुणालाही माहिती नव्हतं. १९७७ साली वर्ल्ड सिरीज क्रिकेटची घोषणा पॅकरने केली आणि मीडियाने हि बातमी उचलून धरली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टोनी ग्रेगचं कर्णधारपद काढून घेतलं. कारण पॅकरने या खेळाडूंबरोबर करार केला होता. याबद्दल काहीच माहिती नसलेली ऑस्ट्रेलिया टीम ऍशेजची तयारी करत होती या बातमीने सगळं वातावरण गढूळ झालं आणि ऑस्ट्रेलिया या सिरीजमध्ये ०-३ ने पराभूत झाली. 

पुढे केस प्रकरण होऊन कोर्टापर्यंत हे कांड गेलं पण कोर्टाने खेळाडूंनी करार केला असल्याने आक्षेप नसल्याचं जाहीर केलं. पॅकरने त्याच्या लीगला सुपर टेस्ट म्हणून नाव दिलं. फुटबॉलच्या मैदानात ड्रॉप इन पिचवर सामने भरवले. ७० हजारांची प्रेक्षक क्षमता असलेल्या मैदानात २००० लोकं बघून पॅकर विचारात पडला.

यावर उपाय म्हणून त्याने डे नाईट सामने हि आयडिया आणली. संघाच्या जर्सीस वेगवेगळ्या रंगाच्या केल्या. यामुळे बराच फायदा झाला आणि प्रेक्षक मॅचेस बघायला येऊ लागले. सगळ्यात जास्त आणि सतत जर्सीचा रंग बदलत राहिला तो भारताचा. ऑस्ट्रेलिया पिवळा, इंग्लंड नेव्ही ब्ल्यू असे अनेक रंग खेळताना दिसून येऊ लागले. 

या कलर्ड जर्सीमध्ये पहिला सामना झाला तो वेस्ट इंडिज ११ आणि ऑस्ट्रेलिया ११ या दोन संघांमध्ये. पुढे वर्ल्ड सिरीज क्रिकेट हे वनडे क्रिकेट म्हणून कालानुरूप बदलत गेलं. आज आपण जे वनडे आणि टी ट्वेन्टी सामने बघतो ते सगळं श्रेय कॅरी पॅकरचं आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.