अटलजींच्या मुलीने देखील अटलजींच्या अंत्यसंस्कारावेळी नवा पायंडा पाडला होता.

अलीकडेच मंदिरा बेदीचे तिच्या पती राज कौशल यांच्या अंत्यसंस्कारादरम्यानचे फोटो व्हायरल झाले होते. त्या फोटोत मंदिरा अस्थीविसर्जन करतांना दिसतेय. लोकं तिच्या धाडसाचे कौतुकही करीत आहेत. असो तिला आणि तिच्या कुटुंबियांना या कठीण काळात जगण्यासाठी बळ मिळो.

तसं तर हिंदू धर्माच्या परंपरेनुसार मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करणार्‍या व्यक्तीद्वारे हा विधी केला जातो.

हा मुद्दा मंदिरा बेदीच्या फोटोमुळे चर्चेत आला परंतु भिडूने याची माहिती काढली कि, याआधी अशा कोणत्या महिला होत्या ज्यांनी या विधीमध्ये सहभाग घेतला होता.

संपूर्ण देशभरात कोरोनाने परिस्थिती बिघडली होती, अनेक वाईट अनुभव आले, माणुसकीही संपत असल्याचं चित्र दिसत आहे. पण एकिकंडं नाती कामी येत नसताना काही जण अगदी जात-धर्म विसरून मदतीसाठी पुढं आल्याचेही अनुभव कित्येकांना आलेत. त्यात अनेकदा कोरोनामुळं मृत्यू झाल्यानंतर मृतदेहांची हेळसांड झाल्याचंही आपण पाहिलं पण त्यात माणुसकीचे दर्शन म्हणजे अनेक महिला कोरोनयोद्ध्यांकडून आपल्या जाती-धर्म विसरून या कोरोनाचे बळी गेले गेलेल्या मृतदेहांवर अंत्यविधी केले गेले.

smruti

तर २ वर्षांपूर्वी भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा देखील असाच काहीसा फोटो व्हायरल झालेला.  २०१९ च्या मे महिन्यातली हि गोष्ट होती. स्मृती इराणी यांनी त्यांच्या एका भाजप कार्यकर्त्याचे पार्थिवाला खांदा दिला होता. अजून एक अशीच घटना म्हणजे,

स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराचे सर्व विधी नमिता भट्टाचार्य यांनी केल्या.

त्यानंतर या नमिता भट्टाचार्य कोण आहेत? त्यांचे आणि अटलबिहारी यांचे काय संबंध आहेत? त्यांनी अटलबिहारी यांना मुखाग्नी का दिला असेल?  असे बरेच प्रश्न केले गेले होते. 

नमिता या राजकुमारी कौल आणि प्राध्यापक बी.एन.कौल यांची मुलगी आहे, आणि नमिताला लहानपणीच अटलबिहारी यांनी दत्तक घेतले होते. 

१९४० च दशक होतं ,अटलबिहारीं आणि राजकुमारी हडपसर हे ग्वाल्हेरच्या विक्टोरिया कॉलेजमध्ये शिकत होते. तेव्हाच त्यांच्यात प्रेम झालं, परंतु तो काळ होता जेंव्हा एक तरुण मुलगी आणि मुलगा यांच्यातली मैत्री झेपणार नव्हती. अशाच परिस्थितीतून हे दोघेही जात होते.

तेव्हा अटल बिहारी राजकुमारी यांना पत्र लिहायचे, अटलबिहारीं यांनी लिहिलेले पत्र राजकुमारी यांनी कॉलेज च्या लायब्ररीत लपवून ठेवले होते. राजकुमारी यांनीही अटलजींना पत्र लिहिली होती परंतू ती कधी अटलजी पर्यंत पोहचलीच नाहीत.

फाळणीच्या वेळी राजकुमारीच्या वडिलांनी जे कि काश्मिरी पंडित वडील गोविंद नारायण हकसर हे होते, त्यांनी तिचे लग्न ब्रिज नारायण कौल या काश्मिरी पंडितशी केले. वास्तविकपणे सांगायचं झालं तर,

हकसर यांना त्यांच्या मुलीचे लग्न अशा कोणत्या मुलासोबत लावायचे नव्हते जो राजकारणात सक्रिय आहे.

त्यानंतर अटल बिहारी आणि राजकुमारी हकसर हे दोघेही आपापल्या आयुष्यात रमले. काही काळानंतर मिसेस कौल दिल्लीला आपल्या पतीसमवेत शिफ्ट झाल्या आणि वाजपेयी ही त्या काळात लखनऊला होते. कोण यांचे पती रामजस कॉलेजमध्ये प्रोफेसर होते.

आणि त्याकाळात अविवाहित राहिलेले अटल बिहारी वाजपेयी सक्रिय राजनेता बनले. त्यानंतर एकदा त्यांची भेट राजकुमारी कौल यांच्याशी झाली आणि नंतर भेटीगाठी होतच राहिल्या. अटलजी कौल यांच्या घरी येत जात राहिले आणि तिथेच शिफ्ट झाले. १९७८ मध्ये अटलजी मोरारजी देसाई सरकार मध्ये विदेश मंत्री झाले तेव्हा मिसेस कौल  आणि त्यांचा परिवार सरकारी आवसा मध्ये शिफ्ट झाला. अटलजींनी कौल यांच्या दोन्ही मुलींना दत्तक घेतले.

पण या सर्व घडामोडी सुदैवाने मीडियाच्या नजरेपासून लांबच राहिल्या.

कौल यांनी स्वतःहून एका मुलाखतीत त्यांच्या मैत्रीविषयी सांगितलं होतं. आमच्या मैत्रीविषयी कोणालाही स्पष्टीकरण देण्याची कधीच गरजही पडली नाही. मिसेस कौल यांचे २०१४ मध्ये निधन झाले आणि तेव्हापासून अटलजी खूप बिमार पडू लागले. इतके आजारी होते की ते कौल यांच्या अंतिम संस्कारमध्ये देखील सामील होऊ शकले नव्हते. नंतर वाजपेयी गेले आणि त्यांच्या मानस कन्येने त्यांना मुखाग्नी दिला.

हे हि वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.