गरीब देशाचा श्रीमंत खेळाडू ज्याने सुवर्णपदक मिळवून देशाच्या अपमानाचा बदला घेतला.

आज ११ ऑगस्ट, या दिवसाला महत्वपूर्ण बनवते ते एक घटना ! ११ ऑगस्ट २००८ रोजी ऑलिम्पिकमध्ये भारताचे राष्ट्रगीत प्रथमच वाजवले गेले कारण आपल्याला पहिल्यांदाच या स्पर्धेत वैयक्तिक सुवर्णपदक मिळाले होते.

अभिनव बिंद्रा. बीजिंग २००८ ऑलिंपिक खेळांचे सुवर्णपदक विजेते.

अभिनव बिंद्राने भारतासाठी वैयक्तिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर ऑलिम्पिकमध्ये भारताचे राष्ट्रगीत प्रथमच वाजवले गेले. अभिनव आता देशातील एकमेव वैयक्तिक ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता राहिलेला नाही कारण आता नीरज चोप्राने अलीकडेच भालाफेकी मध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवले आहे. आणि याचा आनंद देखील अभिनव बिंद्राने त्याच्या सोशल मीडिया पोस्टवरूनव्यक्त केल्याचे  दिसत होते. नीरज चोप्राच्या विजयानंतर बिंद्राने अनेक ट्विट केले होते.

अभिनव बिंद्रा ! देशातल्या प्रत्येकाला जनरल नॉलेज पुस्तकांपासूनच ते माहिती झाले.

माहिती असायलाच पाहिजे, त्यांचा पराक्रमच तितका मोठा आहे. बिंद्रा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू होता. त्याआधी आपण फक्त हॉकीसारख्या सांघिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली होती. आणि या सोन्याच्या १३ वर्षानंतर आता नीरज चोप्रा देखील बिंद्राच्या क्लबमध्ये सामील झाला आहे.

संपूर्ण देश नीरज चोप्राच्या विजयाचा आनंद साजरा करत आहे. सगळीकडे उत्सवाच्या या वातावरणात आपण विसरायला नको कि, एक महत्वाची तारीख आली आहे. ११ ऑगस्ट आणि वर्ष २००८. आजच्याच दिवशी बिंद्राने बीजिंगमध्ये १० मीटर एअर रायफल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर जे काही घडले ते सर्वांना माहित आहे. पण त्याआधीही बरेच काही घडले होते.

अनेक संकटाचा सामना करत बिंद्रा यांनी, शूटिंगचा सराव सुरू करताच, भविष्यात त्याला ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकायचे आहे हे त्याच्या ठाम केले होते.

पण ते सगळं इतकं सोपं असतं का ?

बिंद्राच्याही या यशाच्या मार्गात अनेक अडचणी आल्या होत्या. या अडचणींपैकी एकाचा उल्लेख त्याने आपल्या एका ,मुलाखतीत केला होता. 

“माझे आयुष्यात फक्त आणि फक्त ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचेच लक्ष्य होते. जेव्हा मी वयाच्या १२/१३  व्या वर्षी शूटिंगला सुरुवात केली, जे कि खूप मुर्खपणा होता. मला आठवते की जेव्हा मी हेन्झ रेन्केमियर आणि गॅब्रिएल बुलमन (गॅबी) यांच्याकडे कोचिंगसाठी गेलो होतो, तेव्हा मी त्यांना भेटलो होतो, तेव्हा भारत नेमबाजीमध्ये खूप मागे होता. त्याने मला सांगितले- तुला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकायचे आहे का? तू हत्तीवर घरी का जात नाहीस? ‘

हा फक्त अभिनवचा अपमान नव्हता तर तो देशाचाही अपमान होता. त्याकाळात युरोप अमेरिकेत भारत म्हणजे झोपडपट्टी असलेला गरीब देश अशी कल्पना होती. भारतातले लोक हत्तीवर फिरतात आणि जवळ नाग बाळगतात असे अनेक गैरसमज पाश्चात्य देशात पसरले होते. यावरून गॅबीने नेमबाजी हा श्रीमंतांचा खेळ आहे आणि भारताला तो परवडणार नाही असं सूचित करत अभिनवला परत पाठवलं होतं.

पण अशा गोष्टी ऐकूनही बिंद्रा थांबले नाहीत, २००८ मध्ये सुवर्णपदक जिंकूनच थांबला.  ऑलिम्पिक चॅम्पियन बिंद्राच्या नेमबाजीतील कारकिर्दीचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य आहे, त्याने तिरंदाजी पाहिल्यानंतर ऑलिम्पिक खेळण्याचे मन तयार केले होते. यासंदर्भात, बिंद्राने प्रसिद्ध क्रीडा पत्रकार शारदा उग्रा यांना सांगितले होते कि,

“मी १९९२ चे ऑलिम्पिक टीव्हीवर पाहिले जिथे लिंबा राम शूट करत होते. ऑलिम्पिक आणि माझी ही पहिली ओळख होती. या ऑलिम्पिक खेळांशी निगडित प्रतिभा पाहून मी खूप प्रभावित झालो होतो”.

आणि या खेळांच्या प्रसिद्धीमुळे प्रभावित झालेले ऑलिम्पियन बनलेल्या बिंद्रालाही त्याच्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा मिळाला होता. त्याच्या घरचे चांगलेच श्रीमंत होते. अभिनवला सराव करता यावा म्हणून त्याच्या व्यावसायिक असणाऱ्या वडिलांनी घरी वातानुकूलित शूटिंग रेंज बांधली होती. तसेच, तो नियमितपणे सरावासाठी जर्मनीला जात असायचे.

अभिनव बिंद्रा वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी १९९८ साठी भारतासाठी राष्ट्रकुल खेळ खेळला होता.

आपल्या कारकिर्दीत २०० हून अधिक पदके जिंकणारा अभिनव आजकाल अभिनव बिंद्रा फाउंडेशनच्या नावाने स्वतःची स्वयंसेवी संस्था चालवतो. याद्वारे खेळाडूंना नवीन तंत्रज्ञान आणि उच्च कामगिरीचे शारीरिक प्रशिक्षण दिले जाते. या व्यतिरिक्त, बिंद्रा विविध प्रकारे क्रीडा विकासासाठी काम करत आहे.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.