या ७ जणांनी ऑलिम्पिकच्या मैदानातं भारताला पदके मिळवून दिली आहेत….

टोकियो ऑलम्पिक २०२० च्या स्पर्धेत एकून २०६ देशांनी सहभाग घेतला. ज्यात भारताने देखील उत्कृष्ट कामगिरी केली. भाला फेक, कुस्ती, हॉकी, नेमबाजी, बॅटमिंटन अश्या वेगवगेळ्या खेळांत भारतानं आपलं १२० खेळाडू उतरवले होते. यात ६८ पुरुष तर ५२ महिलांचा समावेश होता.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताच्या प्रत्येक खेळाडूने चुरशीची लढत दिली. काही खेळाच्या प्रकारात थोडक्यात जरी मेडल हुकलं असलं तरी त्या सगळ्यांचा खेळ कौतुकास्पद असाचं होता. या सगळ्यात भारताने एकूण ७ मेडल आपल्या नावावर केलेत. ज्यात १ गोल्ड, २ सिल्वर आणि ४ ब्रॉन्झ मेडलचा समावेश आहे. 

१. नीरज चोप्रा

जॅवलीन थ्रो अर्थात भाला भेक या प्रकारात भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळालंय. २३ वर्षीय नीरज चोप्राने ८७.५८ चे सर्वोत्तम अंतर कव्हर करून हे यश सांपादन केलय. २००८ नंतर म्हणजेच तब्बल १३ वर्षानंतर भारताला हे गोल्ड मेडल मिळालंय. तसेच टोकियो ऑलिम्पिकमधील देखील भारताचे हे पहिलेच गोल्ड मेडल ठरले आहे.

२. मीराबाई चानू

टोकियो ऑलम्पिकमध्ये भारताला पहिलं मेडल मिळालं ते वेटलिफ्टिंगमध्ये. वेटलिफ्टिंगच्या ४९ किलो वजनी गटात मणिपूरच्या मीराबाई चानूनं भारताला सिल्वर मेडल जिंकून दिल होतं. तिच्या खेळातल्या कामगिरीमुळं भारत सरकारनं तिचा पद्मश्री पुरस्कारानं गौरव देखील केलाय. ४ वर्षांपूर्वी मीराबाई चानू संपली असं लोक म्हणतं होते, पण तिने मेडल मिळवून हे म्हणणं खोडून काढलं होते.

३. रवीकुमार दहिया

ऑलम्पिकमध्ये कुस्तीच्या पुरुष फ्रीस्टाईल ५७ किलो गटात भारताला दुसरं सिल्वर मेडल मिळालंय. ROC चा पैलवान जावुर युगुऐव याच्याशी झालेल्या अंतिम सामन्यात रवी कुमार दहियानं जबरदस्त झुंज दिली, पण थोडक्यात आपलं गोल्ड हुकलं आणि रवीकुमारनं भारताला सिल्वर मेडल जिंकून दिलं.

४. पी.व्ही सिंधू

टोकियो ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधूने बॅटमिंटनमध्ये ब्रॉन्झ मेडल मिळवून दिलयं. चीनच्या बिन शियाओचा पराभव करून सिंधूने हे मेडल जिंकले. याआधीही २०१६ च्या ऑलम्पिक स्पर्धेत सिंधूने सिल्वर मेडलवर बाजू मारली होती. यासह ती दोंन ऑलंपिक स्पर्धेत मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बनलीये.

५. लोव्हलीना बोर्गोहेन

मुष्टीयुद्ध या खेळाच्या प्रकारात भारताला दुसरं ब्रॉंझ मेडल मिळालं. महिला बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटात सेमीफायनल मध्ये लोव्हलीना बोर्गोहेन आणि तुर्कीची बॉक्सर बुसेनाझ सुरमेनेली यांचा आमना-सामना होता. यात लव्हलीना बोर्गोहेनला ब्रॉंझ मेडलवर समाधान मिळावं लागलं.

६. बजरंग पुनिया

टोकियो ऑलिम्पिकमध्ये ६५ किलो फ्रीस्टाईल कुस्तीच्या प्रकारात बजरंग पुनियानं देशाला ब्रॉंझ मेडल मिळवून दिलं. कांस्य पदकाच्या लढतीत कांझाकस्तानच्या दौलत नियाझबेकोव्हला त्याने कोणतीही संधी दिली नाही आणि ८-० ने त्याचा पराभव करून बजरंगनं पदक जिंकलं.

७. हॉकी पुरुष संघ

भारतानं पुरुष हॉकी प्रकारात ब्रॉंझ मेडल जिंकून पुन्हा एकदा सिद्ध केली कि, हॉकीचा खरा बादशाह हा भारतच आहे. टोकियोच्या ऑलम्पिक खेळात भारताच्या हॉकी संघानं जर्मनीचा ५-४ ने पराभव करून जवळपास ४१ वर्षांनी मेडल जिंकून आणलं. याआधी हॉकी संघानं एकूण ८ वेळा गोल्ड, १ सिल्वर आणि ३ ब्रॉन्झ भारताला मिळवून दिलेत.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.