जाती आधारित जनगणना झाली तर नितीश कुमार यांना हे ५ फायदे होणार आहेत…

लालू प्रसाद यादव यांचा जेल मध्ये मुक्काम होता त्याचा तेंव्हा सर्वात जास्त फायदा झाला तो म्हणजे नितीशकुमार यांना. बिहार निवडणुकीत नितीशकुमारांनी लालू यादव यांच्या कारागृहातील मुक्कामाचा पुरेपूर फायदा घेतला, आता राजद नेते जामिनावर सुटल्यानंतर राजकारणात सक्रिय झाले आहेत.

बिहारमध्ये बऱ्याच काळापासून जातीच्या जनगणनेची मागणी चालू आहे. पण बिहारच्या राजकारणात लालू यादव आणि नितीशकुमार सक्रिय झाल्यापासून या मागणीला अजूनच वेग आला आहे.

२०११ मध्ये जातीची जनगणना करण्यात आली होती, परंतु काही त्रुटींचा हवाला देऊन ती प्रकाशित केली गेली नाही. तथापि, १९३१ मध्ये स्वातंत्र्यापूर्वी पहिली जात जनगणना झाली होती. आरजेडी नेते लालू यादव जातीच्या आधारावर जनगणनेचा अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी बऱ्याच काळापासून करत आहेत.

१८ फेब्रुवारी २०१९ रोजी विधिमंडळात आणि २७ फेब्रुवारी २०२० रोजी बिहार विधानसभेत जाती जनगणनेचा प्रस्ताव मंजूर झाला तसेच  हा प्रस्ताव या आधी दोनदा केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.

नितीशकुमार यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन सादर केलं आहे.

अलीकडेच, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी बिहारच्या शिष्टमंडळाच्या नेतृत्वाला आणि मुख्यमंत्र्यांना भेट घेऊन, जाती आधारित जनगणनेची विनंती केली आणि नितीशकुमारांनी त्वरित स्वीकारली. त्यानंतर नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून बैठकीसाठी वेळ मागितली होती.

यानंतर विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे ते लगातार या गोष्टींचा पाठपुरावा घेत आहेत. जेंव्हा जेंव्हा ते मिडिया समोर येत आहेत, तेंव्हा तेंव्हा ते इतर मुद्द्यांवर भर न देता जातीय जनगणने वर आवर्जून बोलतात.

हे तर स्पष्ट आहे कि, नितीशकुमारांना जातीच्या जनगणनेवर चर्चा करण्यात अधिक रस आहे – कारण त्यांना याचे काही फायदे होणार आहेत. त्यातले मुख्य ५ फायदे असे कि,

क्र. १  नितीशकुमारांना मोदींसमोर समोरासमोर बोलण्याची संधी आहे.

जाती आधारित जनगणनेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीशकुमार समोरासमोर बसून चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ असेल आणि केवळ जातीच्या जनगणनेच्या मुद्द्यावर चर्चा केली जाईल. चर्चेसाठी नितीश यांच्यासोबत बिहारच्या सर्व पक्षांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ आणि  तेजस्वी यादव देखील सोबत असतील. ही संधी नितीशकुमारांसाठी ‘आरंभ है प्रचंड’ सारखी असेल.

क्र. २ बिहारमध्ये भाजपला मर्यादेत राहण्याचा संदेश आहे.

विशेष गोष्ट म्हणजे नितीशकुमार ज्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत त्यात भाजपलाही सामील व्हावे लागले आहे. आता जर नितीशकुमारांना असे वाटत असेल की भाजपाला यात भाग पाडले गेले आहे, तथापि, नितीशकुमारांचा असा संदेश देण्याचा प्रयत्न असेल की ते तेजस्वी यादव यांच्या पाठीशी उभे आहेत, जे वर्षभर बिहारसाठी शत्रूसारखे वागत आहेत – आणि तेही त्याच भाजपच्या विरोधात जे सरकार चालवण्यामध्ये त्यांचा हातखंडा कायम आहे.

क्र. ३ लालूंसोबत संबंध सुधारण्याचे निमित्त मिळेल.

तुरुंगातून परतलेले लालू प्रसाद यादव बरेच सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय राजकारणात आणि पूर्वीप्रमाणेच विरोधकांना एकत्र करत एकजूट करण्याच्या हालचालींमध्ये ते भाग घेत आहेत.

विधानसभा निवडणुकांमध्ये, नितीशकुमारांनी लालू यादव यांच्या कुटुंबावर अनेक वैयक्तिक हल्ले केले आहेत. पण भाजपला दाखवण्यासाठी नितीशकुमारांनी शत्रुत्व फक्त एवढे खेळले की भविष्यात मैत्रीला जागा ठेवली होती. तरीदेखील तेंव्हा भाजपमध्ये असा विश्वास होता की नितीश लालू कुटुंबीयांबद्दल मवाळ कायम असतात.

क्र. ४ एनडीएच्या पलीकडे जाऊन एक पर्याय असणे आवश्यक आहे.

बिहारच्या राजकारणात नितीशकुमार हे चाणक्य मानले जाऊ शकतात, पण त्यांनी अशी प्रतिमा निर्माण केली आहे की, प्रतिशोधाच्या बाबतीत त्यांच्याकडे नेहमीच संशयाने पाहिले जाते.

महाआघाडीने नितीशकुमार यांना अनेकदा एनडीए सोडून परतण्याचा सल्ला दिला आहे, परंतु लालू कुटुंबीयांनी त्यांना असे कधीच सांगितले नाही. एनडीएमध्ये सामील झाल्यानंतरही प्रशांत किशोर यांच्यामार्फत लालू कुटुंबीयांशी चर्चा सुरूच आहे अशा बातम्या आल्या होत्या. परंतु या सर्व गोष्टी त्या काळातील आहेत जेव्हा प्रशांत किशोर जेडीयूचे उपाध्यक्ष होते.

एनडीएमध्ये गेल्यानंतर, विरोधी शिबिराच्या नेत्यांशी बोलण्याची व्याप्तीही नितीशकुमार यांच्यासाठी कमी झाली आहे, पण जर लालू सहमत असतील, तरच गोष्टी घडू शकतात – असो

क्र. ५ मुख्यमंत्री पद टिकवून ठेवण्यासाठी जुगाड आणि पंतप्रधानापदाचा पर्याय खुला होण्याची शक्यता.

जेव्हा प्रत्येकजण जातीच्या जनगणनेच्या मागणीमध्ये मग्न असेल, तेव्हा नितीशकुमारांविरूद्ध होणाऱ्या  षडयंत्र होण्याची शक्यता कमी असेल. राजकारणाच्या मुख्य प्रवाहाच्या  स्पर्धेत टिकण्यासाठी हे एक प्रभावी युक्ती आहेच पण हि युक्ती वापरणे म्हणजे नितीशकुमारांसाठी डाव्या हाताचा खेळ आहे.

निवडणुकीत चिराग पासवान आणि इतर मदत असून देखील भाजपने नितीशकुमारांना बिहारच्या राजकारणात खूपच कमकुवत केले आहे. ते मुख्यमंत्री नक्कीच झाले आहेत, पण त्यांनी स्वतः कोणताही निर्णय घेण्याचा पर्याय ठेवलेला नाही.

तर हे सर्व फायदे घेऊन जर नितीशकुमारांच्या मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचे आयुष्य वाढत असेल तर यापेक्षा चांगली गोष्ट कोणती असू शकते ?

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.