रोहितला तीन वेळा IPL जिंकून देणारा कोच टीम इंडियाची जबादारी घ्यायला नाही म्हणतोय…

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या हेड कोच पदासाठी मोठी स्पर्धा दिसून येत होती, याच कारण म्हणजे रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आला असून आता पुढे हेडकोच कोण असा सवाल उभा ठाकला आहे. टी- ट्वेन्टी वर्ल्डकप पर्यंतच रवी शास्त्री हे कोच असणार आहे. रोज नवीन नवीन नवे समोर येत आहे राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि नुकतंच समोर आलेलं नाव म्हणजे महेला जयवर्धने.

बीसीसीआयने महेला जयवर्धने याला भारताच्या हेड कोच पदासाठी निवेदन दिलं होतं पण जयवर्धनेने हा प्रस्ताव नामंजूर केला असल्याचं बोललं जातंय. द इंडियन एक्स्प्रेसच्या एका रिपोर्टच्या मते महेला जयवर्धने भारतीय संघाचं प्रशिक्षकपद जरी नाकारत असला तरी त्याने मुंबई इंडियन्सच्या कोचपदी कायम राहण्याचा निर्णय घेतलेला आहे. महेला जयवर्धनेचं असं मत आहे कि आयपीएलमध्ये तो कोच म्हणून खेळेल पण आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र तो फक्त श्रीलंकन क्रिकेटसाठी काम करेल. 

महेला जयवर्धने हा आयपीएलमधला सगळ्यात यशस्वी कोच मानला जातो त्याच कारण म्हणजे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाला ३ टायटल जिंकून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे. सोबतच हंड्रेड टुर्नामेंटमध्ये साऊदर्न ब्रेव्ह टीमचे कोच म्हणूनसुद्धा महेला जयवर्धनेने काम केलेलं होतं. या टीमने पहिल्याच सिजनचं जेतेपद पटकावलं होतं. रोहित शर्मा आणि जयवर्धने हे २०१७ पासून एकत्र काम करत आहेत.

याच दरम्यान रोहित शर्मा भारतीय टी ट्वेन्टी संघाचा कर्णधार बनेल अशी आशा व्यक्त केली जात आहे म्हणून बीसीसीआय महेला जयवर्धनेला कोच पदाचा मान देत आहे. पण जयवर्धनेने हि ऑफर धुडकावून लावलेली आहे. 

महेला जयवर्धनेच्या नकारानंतर अनिल कुंबळे या कोच पदाच्या रेसमध्ये सगळ्यात पुढे असल्याचं बोललं जातंय. जर अनिल कुंबळे भारतीय संघाचे हेडकोच बनले तर त्यांना आयपीएलमधलं किंग्ज इलेव्हन पंजाबचं प्रशिक्षकपद सोडावं लागेल. कारण एकाच कोचला दोन संघाचं प्रशिक्षक बनता येत नाही. द्रविड, जयवर्धने, अनिल कुंबळे यांच्यानंतर अजून एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे सनरायजर्स हैद्राबाद संघाचा मेंटॉर असलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणचं.

पण याच मोठं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे कि बीसीसीआयसारख्या श्रीमंत बोर्डाकडून आलेलं निवेदन केवळ देशप्रेमापोटी नाकारलं आहे. आता रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय संघाचे कोच कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.