शरद पवारांपासून ते सुशिलकुमार, भाई वैद्य, राम नाईक…. सर्वांनी मिळून फसवलं ? 

राजकारण म्हणल्यानंतर फसवाफसवीचा उद्योग. पण कधीकधी ही फसवाफसवी इतकी प्रामाणिक आणि सोज्वळ असते की तिचे किस्से बनुन जातात. मग इतिहास चाळत असताना असा एखादा किस्सा आपल्या हाती लागतो की वाटतं, हे भिडू लोकं खरच हूशार आहेत.

त्यांच्या फसवण्यात देखील दूसऱ्याचं मन राखण्याची एक अदा आहे. 

हा किस्सा १९७८ सालचा.

तेव्हा शरद पवारांनी पुलोदचा कार्यक्रम केलेला. पुलोद गटामध्ये कॉंग्रेसविरोधी असणाऱ्या चाळीस आमदारांचा गट व त्या गटाला पाठिंबा देणारे समाजवादी, भाजप, कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष असे अनेकजण होते. त्याच वेळी एका जाहिर कार्यक्रमात हा फसवाफसवीचा उद्योग करण्यात आला. या किस्स्याचं रसभरं वर्णन “विनायक पाटील” यांनी आपल्या गेले लिहायचे राहून या पुस्तकात केलं आहे. 

कुसूम अभ्यंकर या त्यावेळी रत्नागिरीच्या आमदार होत्या. लोकप्रतिनिधी बरोबरच त्या उत्तम वक्त्या आणि लेखिका देखील होत्या. त्यांनी नविन कादंबरी लिहली होती व कादंबरीच प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते करण्याचं नियोजित करण्यात आलं होतं. शरद पवारांसोबतच व्यासपीठावर होते ते ग.प्र प्रधान, सुशिलकुमार शिंदे, संदानंद वर्दे, गोविंदराव आदिक, विनायक पाटील अशी वक्त्यांची यादी देण्यात आली होती. 

या यादीनुसार सर्वात पहिला उद्घाटक म्हणून शरद पवार बोलणार होते तर सर्वात शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ग.प्र. प्रधान मास्तर बोलणार होते. 

आत्ता गंम्मत म्हणजे, हे पुस्तक खुद्द शरद पवारांनी देखील वाचलं नव्हतं. तर पुढे असणाऱ्या वक्त्यांच्या यादीबद्दल वेगळं सांगण्याची गरज नाही. तेव्हा नुकतच सरकार स्थापन झाल्यानं सगळेच आपआपल्या कामात व्यस्त. वेळ तर कोणाला मिळणार. त्यातही हा कार्यक्रम दादरमध्ये. आत्ता इतक्या मोठ्या श्रोत्यांपुढे न वाचलेल्या कादंबरीबद्दल काय बोलणार. एकुणच काय तर आत्ता पुढे कस होईल म्हणून प्रत्येकालाच टेन्शन आलं होतं. आणि या शरद पवारांचा देखील नंबर होता. 

पण या यादीत अस एक नाव होतं की जे पुस्तक न वाचता कार्यक्रमाला येणं शक्य नाही हा विश्वास होता. ते नाव म्हणजे ग.प्र.प्रधान यांच. पण प्रधान हे कार्यक्रमाचे अध्यक्ष. अध्यक्षीय भाषण तर सर्वात शेवटी होणार होतं….. 

हे ही वाचा –  

व्यासपीठावर कुजबूज चालू झालेली. आत्ता कस होणार ? इतक्यात विनायक पाटील म्हणाले, मी करतो काहीतरी… 

ते तडक उठून आयोजकांकडे गेले आणि त्यांना रागातच म्हणाले, अहो चाललय काय ? आयोजकांना काय चुकलय ते नेमकं कळालं नाही त्यांनी विचारलं ? काय झालं ? 

विनायक पाटील म्हणाले, “अहो वक्यांची यादी बघा ग.प्र. प्रधान सर्वात शेवटी बोलणार आहेत. अध्यक्ष असले म्हणून काय झालं ? ते सर्वात सिनियर आहेत. त्यांनी अस सर्वात शेवटी बोलणं चुकिचं दिसतं. अस म्हणत, विनायक पाटलांनी कागद घेतला आणि वक्त्यांचा क्रम बदलला. 

कार्यक्रमाची सुरवात झाली ती ग.प्र. प्रधान यांच्या भाषणाने. ते कादंबरीवर तासभऱ बोलले तेही त्यांच्या नेहमीच्या शैलीप्रमाणे उत्तम. पुढच्या वक्त्यांना कादंबरीत नेमक काय आहे ? इथपासून बोलण्यासाठी खूप काही मिळालं. शरद पवारांपासून सुशिलकुमारांपर्यन्त सर्वांनी त्यांच्या भाषणातील मुद्दे उचलले व दहा पंधरा मिनटांच भाषण ठोकून दिलं. 

विनायक पाटलांच्या या आयड्याबद्दल देखील धन्यवाद मानण्यात आले. शेवटी एक कार्यकर्त्या त्यांना भेटल्या आणि म्हणाल्या, “प्रधानांच थोडं लांबल, पण सर्वांची भाषणं सुरेखच झाली. या सगळ्या राजकारणाच्या धबडग्यात वाचनासाठी वेळ कसा मिळतो वो तुम्हा सगळ्यांना ? 

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.