लहान मुलांची हत्या करून रक्त पिणाऱ्या सिरीयल किलरला आफ्रिकेत ठेचून मारण्यात आलंय..

सिरीयल किलर हे सिनेमात बघताना जितकं अद्भुत आणि थ्रिलर वाटत असलं तरी प्रत्यक्षात तसं ते किती क्रूर असतं याची प्रचिती येते. आजचा किस्सा आहे अशाच एका सिरीयल किलरचा तेही तो फक्त 20 वर्षाचा होता आणि तो लहान मुलांना मारून टाकून त्यांचं रक्त प्यायचा.

हा सिरीयल किलर अचानक चर्चेत आला कारण तो 15 ऑक्टोबर रोजी केनियातल्या ग्रामस्थांकडून ठेचला गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

मास्टेन वांजलाने वयाच्या सोळाव्या वर्षी पहिला खून केला होता तेही त्याच्याच समवयस्क मुलाचा. फुटबॉल खेळताना प्रशिक्षक म्हणून तो गेला असताना त्याने त्यातल्या खेळणाऱ्या मुलांपैकी एकाला निर्जन स्थळी बोलवून याचा खून केला.

नंतर मात्र तो एक सराईत गुन्हेगार झाला. गळा आवळून तो मुलांचे खून करत सुटला. फक्त सिरीयल किलिंगच नाही तर तो खून करून झाल्यावर त्यांचं रक्त देखील प्यायचा. व्यसन आणि रक्ताचं व्यसन याची त्याला चटक लागलेली होती. 20 वर्षांच्या मास्टेन वांजलाने 10 मुलांचा जीव घेतला होता. केनिया पोलिसांच्या कामगिरीवर ताशेरे ओढले जात होते आणि लोकही मास्टेन वांजलाच्या या प्रतापाने त्रस्त झाले होते आणि त्याला लवकरात लवकर पकडणं गरजेचं झालं होतं.

मास्टेन वांजलाने आपण 10 मुलांचा खून केल्याची कबुली दिलेली होती. खून प्रकरणाला थांबवणं गरजेचं आहे म्हणून सगळीकडे मास्टेन वांजलाचा शोध सुरू झाला होता. एक दिवस तो पोलिसांच्या हाती लागला आणि केनियाने सुटकेचा निश्वास टाकला पण इथं अजून एक गडबड झाली आणि तो जेलमधून पळून गेला. पश्चिम केनियामध्ये त्याला जेलमध्ये डांबण्यात आलेलं होतं. पळून गेल्यावर तो त्याच्या घरी गेला.

घरी आल्यावर घरच्यांनी त्याला नाकारलं पण शेजाऱ्यांनी त्याला पकडलं. पाठलाग सुरू झाला आणि मास्टेन वांजलाला ग्रामस्थांनी पकडलं आणि त्याला बेदम चोप दिला. यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना माहिती देण्यागोदरच लोकांनीच वांजलाचा निकाल लावला.

जेव्हा वांजला पळून गेला तेव्हा ड्युटीवर असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांवर संशयिताच्या सुटकेला मदत केल्याचा आणि निष्काळजीपणाचा आरोप ठेवण्यात आला. पोलिसांचे म्हणणे आहे की सकाळच्या रोल कॉल दरम्यान तो गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. तुरुंगाच्या कोठडीत असण्याची कोणतीही चिन्हे नव्हती.

सिरीयल किलर मारला गेला पण पोलिसांच्या अशा ढिलाई पणामुळे केनियाच्या लोकांकडून ताशेरे ओढण्यात आले. पण त्याहून भयंकर गोष्ट म्हणजे एका 20 वर्षाच्या सिरीयल किलरने दहा मुलांना ठार केलं होतं.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.