पुण्यातल्या बुधवार पेठेच्याही आधी ‘बावन्नखणी’ चाळ बदनाम होती.

लखनऊ मध्ये जसं मुजरा अजूनही जिवंत आहे, तशी पुण्यात बावनखणी का जिवंत नाही? बावन्नखणी  पुण्यात कधीपासून मुकी झाली ? असाच काहीसा प्रश्न सोशल मिडियावर वाचण्यात आला आणि हे बावन्नखणी काय आहे हे जरा विस्ताराने समजून घ्यावं म्हणलं…

तर हि बावनखणी होती पेशवेकालीन पुण्यात..असं म्हणतात कि, त्या काळात लढाई- युद्धाची धामधूम असो की सणासुदीची आतषबाजी असो शुक्रवारातल्या बावनखणीची रौनक कधीच कमी झाली नव्हती.  पुण्यावर कोणतंही संकट कोसळोत, तरीही शुक्रवारपेठेतली बावनखणी हे दर्दी लोकांचे हक्काचे ठिकाण होते. एवढंच नाही तर बावनखणी म्हणजे पेशवेकालीन पुण्यातलं सांस्कृतिक ठाणंच! भल्याभल्यांना घायाळ करणारी आणि छंदी लोकांचं विसाव्याचं हक्काचं ठिकाण म्हणजे बावनखणी!

शुक्रवार पेठेतील ही बावन्न खणांची दोन मजली चाळ होती जी आजूबाजूच्या इतर इमारतींपेक्षा फारशी वेगळी नव्हती. खास त्यांच्यासाठी बावन्न खणांची म्हणजे बावन्न खोल्यांची दुमजली-दुपाखी चाळ बांधली गेली. गाणाऱ्या आणि नाचणाऱ्या कलावंतीना हि इमारत भाड्याने देण्यात आली होती.

थोडक्यात हे ठिकाण त्या काळात शक्तिशाली पुरुषांच्या देहाच्या इच्छा पूर्ण केल्या जायच्या ? हे निश्चित सांगणे अवघड आहे पण १८ व्या आणि १९ व्या शतकातील पुण्यातील मोठ्या बदनाम चाळ म्हणून ओळखली जात होती.

काही इतिहासकार बावनखानीचे वर्णन तेंव्हाची बुधवार पेठ म्हणून करतात तर काही इतिहासकार आत्ताच्या बुधवार पेठेतील रेड लाइट एरियाला जन्म देणारी बावनखनी चाळ म्हणून त्याला दोष देतात.

काही इतिहासकारांच्या मते, बावनखणीची स्थापना बाळाजी बाजीरावांच्या कारकिर्दीत झाली, ज्यांनी त्यांच्या दरबारातील एक वरिष्ठ अधिकारी जिवाजीपंत खासगीवाले यांना तत्कालीन शहराच्या दक्षिणेला नवीन पेठ वसवण्याचा आदेश दिला होता. त्याकाळी शहरात बऱ्यापैकी प्रभाव असलेल्या खासगीवाले यांनी १७४८-१७५० मध्ये पेठची स्थापना केली. काही काळासाठी विसापूर म्हणून ओळखल्या जाणार्‍या शुक्रवार पेठेत पेशव्यांच्या स्वत:चा शुक्रवार वाडा, तालीमखाना म्हणजेच व्यायामशाळा आणि पायदळ आणि तोफखाना यासारख्या लष्करी इमारतींसह अनेक महत्त्वाच्या इमारती होत्या. हे त्या काळातील अनेक उच्चभ्रू व्यक्तींचे घर होते.

बावनखणीच्या खोल्या ‘कलावंतांना’ भाड्याने दिल्या होत्या पण इमारतीची मालकी पेशव्यांच्याकडेच राहिली होती.

१८६८मध्ये प्रकाशित झालेल्या नारायण विष्णू जोशी लिखित पुणे शहराचे वर्णन’ केलं आहे- जे कि मुख्यत्वे ऐतिहासिक घटनांच्या सार्वजनिक स्मृतीवर अवलंबून आहे. ते वर्णन असंय कि,

“नानासाहेब पेशवे यांच्या काळात तत्कालीन कोतवाल जिवाजीपंत अण्णा खासगीवाले यांनी उदमी लोकांस कौल देऊन ही पेठ वसवली व वाडा बांधला. शेजारी बावन्न खणांची दुघई दुमजली चा‍ळ बांधली आणि ती जागा कसबिणी व कलावंतिणी यांस राहण्यासाठी भाड्याने दिली. ह्याच्या पूर्वी कसबिणी सर्व शहरात पसरलेल्या होत्या. त्या सर्व ह्यांनी आपल्या सन्निध आणून ठेवल्या. त्याही सर्व एकदम तेथे राहण्यास आल्या. याचे कारण की त्या गृहस्थाकडे कोतवाली होती. त्यावेळच्या कोतवालाचा अधिकार इतका असे कीआता तितका कोणासही नाही. तेव्हा काही जरबेनेकाही खुशीनेकाही प्रीतीने व ममतेने आल्या असतील. ही बावन्नखणी पुण्यातील लोकांस व बाहेरील लोकांस माहीत नाहीअसे नाहीच. आबालवृद्धांस ही जागा ऐकून अथवा प्रत्यक्ष पाहून माहीत आहेच”.

काही समकालीन विद्वान बावनखानीने बुधवार पेठेतील सध्याच्या रेड लाईट एरिया निर्माण केला असचं मानतात जे या मध्यवर्ती ठिकाणाहून इतर भागात पसरलेल्या ‘वेश्यांची वस्ती’ म्हणून अस्तित्वात आली आहे. पण या तर या बावनखानीची निर्मिती देखील वेश्याव्यवसायासाठीच झालेली असेच संदर्भ इतिहासात सापडतात.

पुण्यात गावभर विखुरलेल्या नाच-गाणं करणा‍ऱ्या सा‍ऱ्या कसबिणी आणि कलावंतिणी या बावनखणीत एकत्र आणल्या गेल्या. का तर त्यांचा होणारा दंगाएकाच ठिकाणी व्हावा आणि सर्वासाठी ते सोयीचे आहे म्हणून. स्थानिक लोकं अनेकदा गुप्तपणे भेट द्यायचे, कामुक लावणी, गाणी आणि नृत्यांचा आनंद लुटण्यासाठी आणि ‘राघू-मैना’च्या प्रेमसंबंधांच्या कहाण्या ऐकण्यासाठी लोकं या बावनखानीत हजर व्हायचे.

बावनखनी इतकी प्रसिद्ध होती की, ती लहानतल्या लहान मुलाला देखील त्याची माहिती असायची.

पण काळाच्या ओघात याच प्रसिद्ध बावनखानीचे अस्तित्व सार्वजनिक स्मरणातून जवळजवळ मिटूनच गेले. त्यानंतर ‘घाशीराम कोतवाल’, विजय तेंडुलकर यांच्या नाटकाच्या निमित्ताने हि बावनखानी चर्चेत आली होती. १९७२ मध्ये पहिल्यांदा सदर झालेल्या प्रयोगात हि बावनखणीचे संदर्भ आणि दृश्य मोठ्या वादात सापडले होते.

पेशव्यांच्या कार्यालयात अभिलेखाच्या नोंदी आणि पत्रव्यवहाराचे संदर्भ पाहिले कि, बावनखानी किंवा त्याच्या परिसरात राहणारे काही प्रमुख दरबारी चंद्री नायकिन, सगुनी कलावंतीन आणि वेंकट नरसी होते, ज्यांना पेशव्यांच्या दरबारात विशेष प्रसंगी त्यांची कला सादर करण्यासाठी आमंत्रित केले जायचे.

समाज आणि सर्वसामान्यांच्या समजुतीनुसार, बावनखणीकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा विशेषतः स्त्रियांना बदनाम करणारे ठिकाण म्हणून पाहिले जात असायचे.

सुरुवातीच्या काळात बावनखणी म्हणजे पुण्यातलं एक सांस्कृतिक केंद्र होती. दिवसभर काम करून थकलेल्यांचं घटकाभर मनोरंजन करणारे केंद्र होतं. बावनखणी म्हणजे एकप्रकारे लखनौमधल्या गाणी-बजावणी करणा‍ऱ्या कोठ्यांसारखी कोठीच होती. फक्त लखनौमधली एकेक कोठी म्हणजे राजवाडाच आणि तिथे कोठेवाली एकाचवेळी अनेक नर्तकींना आश्रय द्यायची.

अशीच कलावंतिणींसाठीची कोठी पेशव्यांनी पुण्यात बांधली ती म्हणजेच हि एक मोठी कोठी बांधली ती  म्हणजेच बावनखणी होय. पण कालांतराने बावनखणी देहाचा व्यापार करणारं केंद्र बनत गेलं.

नानासाहेबाच्या काळात पेशवाई भरभराटीला आली. मात्र १७६१च्या पानिपतच्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि काही काळ पुण्याची रया गेली होती. पण थोरल्या माधवरावांनी पेशवाईची विस्कटलेली घडी पुन्हा बसवली आणि पुणं पुन्हा भरभराटीला आलं. अर्थातच बावनखणीला पुन्हा बहर आला. दुस‍‍ऱ्या बाजीरावाच्या काळात तर त्यांच्या स्वतःच्या मर्जीतल्या कलावंतिणींसाठी बावनखणी परिसरात माड्याही बांधल्या. त्याचे बरेच संदर्भ पेशवे दफ्तरांमध्ये आजही सापडतात.

पेशवाईत जन्माला आलेली बावनखणीतली ही नृत्य-संगीतपरंपरा १९६०-६५ पर्यंत कायम होती. कौसल्याबाई कोपरगावकरगोदावरीबाई पुणेकरभामाबाई पंढरपूरकर या लावण्यखणींचे दिवाणखाने याच बावनखणीत होते. खऱ्या अर्थाने बावनखणी संस्कृतीची खाणच होती. यादव काळानंतर तुटलेला महाराष्ट्रातला संगीताचा दुवा जोडून ठेवण्याचं काम खरंतर बावनखणीनेच केलं होतं. स्वतः बावनखणीविषयी नारायण विष्णू जोशी यांनी तसेच अनेकांनी या बावनखणीला नावं ठेवली.

पण त्या काळात बावनखणी आपलं काम चोख बजावत राहिली. इतरांच्या भोगांनी प्रसंगी स्वतः भ्रष्ट होत संस्कृतीवहन करत राहिली….

हे हि वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.