नारदमुनी का राहिले, ‘आजन्म सिंगल’ ? 

नारायण नारायण !!! 

हसरमुख चेहरा. लावालावी करण्याची कला.. चेहऱ्यावर हास्य आणत अलगत हिकडची माहिती तिकडे देवून शंकराला देखील तिसरा डोळा उघडण्यासाठी मजबूर करणारे नारदमुनी… 

इतकं अष्टपैलू व्यक्तिमत्व एखाद्या सिंगल व्यक्तीचच असू शकतं. खरय नारदमुनी देखील सिंगलच होते. सिंगल लोकांची खरी देवता म्हणजे नारदच. पण का ? 

नारदमुनींना मुली पसंत पडल्या नाहीत ?

की नारद मुनी BCA, BBA, ER झालेले ? की नारद मुनींनी ऐन तारुण्यात MPSC,UPSC करण्याच कठोर व्रत हाती घेतलेलं. अस काय झालेलं कि नारदमुनी सिंगल राहिले.  

भिवू नका,

तेच सांगण्यासाठी आमचा जन्म झालाय. आम्ही आहोत न ऐतिहासिक धार्मिक संदर्भासहित स्पष्टीकरण द्यायला. तर ऐका सिंगल नारायणाची कथा !! 

तर अगोदर होता देवलोक. देवलोकात पृथ्वीवर लोकांची कमतरता भासू लागली की कोणालातरी वर (त्यातला नाही हा गॉड ब्लेस यू टाईप मधला वर) देवून लोकांची संख्या वाढवण्याचा उपक्रम चालायचा. असाच उपक्रम देवांनी हाती घेतला. मग काय दक्ष प्रजापति राजाला दिला हजार पोरांचा आशिर्वाद. दक्ष प्रजापती राजाचं लग्न झालं चे पंचजन राज्याची मुलगी असिंकी बरोबर. लग्नानंतर त्यांना एकावेळी दहा हजार मुलं झाली. राजाला ठावूक होतं की आपली मुलं पृथ्वीवर जनसंख्या वाढवण्यासाठी आली आहेत. साहजिक आत्ता या मुलांनी धार्मिक पण असलं पाहीजे तर सृष्टीत पुण्यवान माणसं जन्माला येतील. उत्तम संस्कार करण्यासाठी या राजानं आपल्या मुलांना जंगलातल्या एका साधू महारांजांच्या जवळ ठेवलं. आत्ता झालं अस की, हि गोष्ट समजली नारदमुनींना.. 

नारदमुनी होते सिंगल. त्यामुळे मज्जा करायची दांडगी हौस.

मग नारदमुनींनी काय केलं तर जंगलात जावून या दहा हजार पोरांना बोलबच्चन टाकले. खरा तो एकची धर्म जो संन्यास घेवून हिमालयात जातो.. घरदार सोडून सिंगल राहिलं कि किती गंम्मत येते हे नारदमुनीनी प्रॅक्टिकल सहित समजावून सांगितलं.. 

झालं.. हि मुलं नादाला लागली.. सगळीच्या सगळी मुलं संन्यास घेवून रिटायर झाली.. राजाला हे जेव्हा समजलं तेव्हा राजा भडकला पण करणार काय दूसरा काहीच उपाय नव्हता. परत देवतांना वर मागितला. देवता म्हणाले.. या वेळी हजार मुलांचाच वर… 

हे ही वाचा – 

पुन्हा राजाला हजार मुलं झाली. राजानं ती पुन्हा जंगलात गेली.. नारद पुन्हा त्यांच्या मागे गेला आणि म्हणाला, हे बघा खरा धर्म आपल्या मोठ्या भावांच्या पावलावर पाउल टाकणं. वाट खडतर आहे पण धर्म तोच. मोठ्यांना फॉलो करणं.. झालं पुन्हा सगळी मुलं संन्याशी झाले…. 

आत्ता मात्र राजाला आला राग. त्यांन दिला श्राप…

आत्ता तूझच लग्न होणार नाही. तूच सिंगल रहाशील… 

तेव्हापासून नारदमुनी सिंगल आहेत… अखंड सिंगल लोकांची हि देवता कायम हसतमुख असते.

पाठीमागे काय दुखं असतील ती असतील पण नारायण नारायण म्हणलं की ऑल इज वेलचा भास होतो… 

हे ही वाचा – 

Leave A Reply

Your email address will not be published.