कैद्यावर प्रेम जडलं आणि ही बया 7 हजार किमीचा प्रवास करून त्याला भेटायला गेली…

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं अगदी सेम असतं अशी एक कविता आहे बघा मराठीत. प्रेमा बद्दल अनेक लोकं कविता लिहितात, प्रेयसी बद्दल चांगली चांगली वर्णनं लिहितात असं बरंच काय काय चालतं. देवदास पारो, जब्या शालू, परश्या आर्ची, लैला मजनू अश्या अनेक कपलची अजरामर उदाहरणं आपल्यासमोर उभी ठाकतात. लिव्ह इन रिलेशनशिप, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप हा एक प्रकार आहेच. प्रेमाच्याच बाबतीत ज्या पोराला कधी एक पोरगी पटलेली नसते तेसुद्धा ब्रेकअप झालेल्या पोराला प्रेमाबद्दल ज्ञान पाजून येत असतो अशा बऱ्याच कन्सेप्ट विनोदी, हळव्या ,मनाला चटका लावून जाणाऱ्या असतात. आता प्रेमाबद्दल एवढी चर्चा केलीय म्हणल्यावर किस्सा सुद्धा काहीतरी खतरनाक असणारच ना शेठ…

कैद्याची पत्रे वाचून ब्रिटनमधील एका महिला त्याच्या प्रेमात पडली आणि ती त्याला भेटण्यासाठी अमेरिकेत आली. साधासुधा प्रवास नाही तर या महिलेने 7 हजार किमीचा प्रवास करून तिच्या प्रियकराला येऊन भेटली. द सनच्या वृत्तानुसार, मूळची ब्रिटनची असलेल्या केटीने राईट अ प्रिझनर डॉट कॉम वेबसाइटवर डॅनी नावाच्या कैद्याला पत्रे लिहायला सुरुवात केली. पण, पत्रांच्या देवाणघेवाणीत दोघेही प्रेमात पडले. दोघांनी व्हिडिओ कॉल करायला सुरुवात केली. त्यानंतर चर्चेची मालिका लांबली. डॅनीवर शस्त्रासह चोरी, अवैध शस्त्र बाळगल्याचा आरोप आहे आणि त्याला 8 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. त्याने यापूर्वी 5 वर्षे तुरुंगात काढली आहेत.

प्रेम कर भिल्ला सारखं
बाणावरती खोचलेलं…

या उक्तीला जागणारं हे प्रेम म्हणावं लागेल. एवढा तगडा प्रवास करून आपल्या खऱ्या प्रेमाला भेटायला आले असलेली केटी म्हणते की ती डॅनीच्या प्रेमात इतकी पडली होती की ती त्याला भेटायला गेली होती. कॅटीने तिच्या टिकटॉक अकाउंटवर ब्रिटनच्या प्रवासाचा उल्लेख केला आहे. ती म्हणते की डॅनीला पाहून तिला धक्काच बसला. त्याला भेटण्यासाठी तिला फक्त ४ तासांचा अवधी देण्यात आला होता. जर डॅनी तुरुंगात शिक्षा भोगून बाहेर आला तर ती त्याच्याशी लग्न करेल, असे तिचे म्हणणे आहे. डॅनीने आपला टी-शर्ट केटीला दिला आहे आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून एवढं त्याचंही तिच्यावर प्रेम आहे.

केटीने आपल्या टिकटॉक अकाउंटच नाव बदललंय. आता ती तेथे स्वतःला @katiedanny१२ म्हणून ओळखली जाते. आणि आपल्या या अनोख्या लव्हस्टोरीजबद्दल सांगून बोअर करते.

केवळ पत्र व्यवहारातून प्रेम होणं तसं आजच्या काळात दुर्मिळच म्हणावं लागेल पण इतकं प्रेम आणि जिव्हाळा निर्माण झाला की भेटायला थेट केटीने जेल गाठलं आणि तेही चारच तासाचा अवधी असताना. प्रेमाचा नवा पायंडा या जोडप्याने पाडला आहे. एक अनोखी स्टोरी म्हणून या दोघांच्या लव्हस्टोरीचे भन्नाट किस्से जगभरात सुरू आहेत आणि आता या जोडीचे भरपूर फॅन्स तयार झाले आहेत आणि सगळे डॅनी भाऊच्या जेल वारीतून बाहेर पडण्याची वाट पाहत आहे. म्हणजे अशा लव्ह स्टोरी सिंगल पोरांना जळवण्याचं काम करतात बाकी काही नाही पण असो डॅनी भाऊ लवकर बाहेर पडो आणि दोघांचं शुभ मंगल सावधान होवो….

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.